एक्स्प्लोर

पत्रकार परिषदेनंतर सत्यजीत तांबेंकडून मित्रत्वाचा सल्ला, पण कमेंट बंद; रोहित पवारांनी एका वाक्यात विषय संपवला

सत्यजीत तांबे यांनी भाजपाच्या समर्थनार्थ पोस्ट केली आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे चांगले संबंध होते, अशी सत्यजीत तांबे यांनी ट्विटरवर पोस्ट केली आहे, असं पत्रकारांनी सांगितलं.

मुंबई : आमदार रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर विधानपरिषद आमदार सत्यजीत तांबे यांनी रोहित पवारांना (Rohit Pawar) मित्रत्वाचा सल्ला देत असल्याचे सांगत भलीमोठी फेसबुक पोस्ट केली. त्यामध्ये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या मैत्रीचा दाखला देत रोहित पवार यांनी केलेल्या आरोपावरुन त्यांच्यावर टीका केली होती. मोठा नेता होण्याची इतकी घाई चांगली नाही, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला होता. आता, सत्यजीत तांबे (Satyajeet tambe) यांच्या पोस्टवर रोहित पवारांनी एका वाक्यात आपली प्रतिक्रिया दिली.  

सत्यजीत तांबे यांनी भाजपाच्या समर्थनार्थ पोस्ट केली आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे चांगले संबंध होते, अशी सत्यजीत तांबे यांनी ट्विटरवर पोस्ट केली आहे, असं पत्रकारांनी सांगितलं. त्यावर रोहित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिलं, मी काल पत्रकार परिषदेतून सत्तेत असणाऱ्या नेत्यांना प्रश्न केला आहे. तुम्ही कार्यकर्त्यांची नावं घेत आहात. त्यामुळे त्यांनी काही पोस्ट करुन वक्तव्य केलं, त्यावर मी उत्तर द्यावं, असं मला तरी वाटत नाही. मी मोठ्या नेत्यांना फॉलो करत असतो. सगळेच ट्विट करतात आणि ते मी वाचले पाहिजे आणि फॉलो केले पाहिजे असं मला वाटत नाही, असं रोहित पवार म्हणाले.

रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप कार्यकर्त्यांपासून ते मंत्र्‍यांपर्यंत सर्वजण रोहित पवारांवर सडकून टीका करत आहेत. मात्र, या सगळ्यांच्या मांदियाळीत रोहित पवारांचे कान टोचणारे एका वेगळ्या नावाने सगळ्यांचे लक्ष वेधले. सोशल मीडियावर सर्जेराव म्हणत त्यांची पोस्टही चांगलीच व्हायरल झाली. राज्यातील उदयोन्मुख नेतृत्व अशी गणना होत असलेल्या आमदार सत्यजीत तांबे यांनी पोस्ट लिहून रोहित पवार यांना काही सल्ले दिले आहेत. घरातून काँग्रेसच्या राजकारणाचा दीर्घ वारसा असलेल्या मात्र मध्यंतरीच्या काळात भाजपच्या जवळ गेलेल्या सत्यजीत तांबे यांची ही पोस्ट टीकेची धनी ठरली. कारण, काही तासांतच सत्यजीत तांबे यांनी आपल्या पोस्टवरील कमेंट सेक्शन बंद केल्याचं पाहायला मिळालं. 

काय म्हणाले सत्यजीत तांबे

आज खरंतर देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मनात काय भावना असतील, त्यांना किती दुःख झालं असेल, याची कल्पनाही न केलेली बरी. कारण स्व. अजितदादा पवार आणि देवेंद्रजी यांच्यातील मैत्री, विश्वास आणि परस्परांमधील नातं मी अतिशय जवळून पाहिलं आहे. गेल्या काही वर्षांतील महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक चढ-उतारांमध्ये अजितदादांनी देवेंद्रजींना खंबीर साथ दिली. किंबहुना, अनेकदा स्वतःच्या राजकीय सोयीपेक्षा दिलेला शब्द महत्त्वाचा मानून, स्वकीयांचा विरोध पत्करूनही त्यांनी देवेंद्रजींच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेतली. देवेंद्रजी स्वतः नको म्हणत असतानाही, ‘मी शब्द दिला आहे आणि दिलेला शब्द पाळणारच,’ अशी ठाम भूमिका घेणारे अजितदादा होते. हे त्यांच्या स्वभावाचं आणि त्यांच्या मैत्रीचं मोठेपण होतं. अशा अजितदादांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर, कोणताही ठोस आधार नसताना या अपघाताला देवेंद्रजींशी जोडण्याचा प्रयत्न करणं, हा केवळ राजकीय आरोप नाही, तर अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी प्रकार आहे. अशा संवेदनशील प्रसंगाचं राजकीय भांडवल करणं हे मला अत्यंत चुकीचं वाटतं. रोहितजी, खरंतर एका अभ्यासू, बुद्धिमान आणि तरुण आमदार म्हणून तुमची ओळख निर्माण व्हायला हवी. तुमच्याकडे राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत, तुमच्याकडे क्षमता आहे आणि भविष्यात राज्याच्या राजकारणात मोठी भूमिका बजावण्याची संधीही आहे. परंतु प्रत्येक विषयावर तात्काळ प्रतिक्रिया देणं, प्रत्येक गोष्टीत टीका-टिप्पणी करणं आणि जणू काही संपूर्ण राज्याच्या विरोधी पक्षाची जबाबदारी आपल्याच खांद्यावर आहे, अशा आविर्भावात वावरणं मला तरी योग्य वाटत नाही.

हेही वाचा

रोहित पवारांच्या कारखान्यातील धुरामुळे अपघात; नवनाथ बन यांनी सांगितलेला कारखाना विमानतळापासून किती लांब?

 

एबीपी माझा या वृत्तवाहिनीमध्ये आणि पत्रकारिता क्षेत्रात गेली अकरा वर्षापासून कार्यरत आहेत. एबीपी माझा या वृत्तवाहिनीमध्ये सध्या "मुंबई ब्युरो चीफ" या पदावर कार्यरत आहे. या मागील अकरा वर्षाच्या कार्यकाळात राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील विविध प्रश्न आपल्या बातमीद्वारे महाराष्ट्रतल्या जनतेसमोर मांडत आहे. 

प्रत्येक विषयाची, बातमीची योग्य पद्धतीने मांडणी करून आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आपल्या बातमीची  छाप कशी पडेल आणि लोकांपर्यंत ती सहज त्यांना समजेल अशा भाषेत कशी जाईल यासाठी प्रयत्नशील आहे. 

छत्रपती संभाजी नगर हे मूळ गाव असून पहिली ते पदवीच शिक्षण करून पुणे विद्यापीठातून मास्टर ऑफ कम्प्युटर अप्लिकेशन (MCA) पूर्ण करत पदव्युत्तर शिक्षण घेतल. पदव्युत्तर शिक्षण आयटी क्षेत्रात घेतल्यानंतर  आपल्या आवडीच्या पत्रकारिता क्षेत्रात मुंबईच्या झेवीयर्स महाविद्यालयामध्ये पत्रकारिता डिप्लोमा कोर्स आणि त्यानंतर पत्रकारितेत सुद्धा एम ए (मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम ) छत्रपती संभाजी नगर -डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा विद्यापीठातून पूर्ण केला 

एबीपी माझामध्ये 2016 पासून काम करत आहे. 2019,2024 लोकसभा विधानसभा निवडणुका, पक्ष फुटी पासून ते सत्तांतराच्या बातम्या अगदी जवळून कव्हर केल्या, शिक्षण क्षेत्रात मुंबई विद्यापीठाचा गोंधळ, विद्यार्थी शिक्षकांचे प्रश्न, शिक्षण क्षेत्रातल्या रोजच्या घडामोडी इथपासून ते शिक्षक विद्यार्थी आंदोलनतले प्रश्न, दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेलं विद्यार्थ्यांचा आंदोलन असे अनेक विद्यार्थ्यांच्या युवांच्या निगडित घडामोडी, त्यांचे प्रश्न मांडण्याचे काम करत आहे 

विधानसभा निवडणुकीत 'पोस्टमन माझा' सारखा 'एबीपी माझा' वृत्तवाहिनीच्या विशेष कार्यक्रमात आपल्या करेक्टर रिपोर्टिंगद्वारे विविध मतदार संघातील मतदारांचे प्रश्न स्थानिक आमदार, राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मांडले. महानिर्वाणदिनी भीमगीत गायिका सुषमादेवी यांचा काळाच्या पडद्याआड गेलेला  बुलंद आवाज महाराष्ट्रसमोर आणला. 

कोरोना काळात शोध पत्रकारितेतून कोरोना रुग्णांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत "ऑपरेशन लुटारू" या स्टिंग ऑपरेशनच्या मालिकेतून बेड पासून रुग्णवाहिकेसाठी, कोरोना टेस्टसाठी कशी लूट केली जाते अश्या अनेक गोष्टी सरकार समोर मांडल्या. 

आतापर्यंत केलेल्या कामाबद्दल खालील पुरस्कार प्रदान करण्यात आले 

राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणारा महाराष्ट्र शासन पु.ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार -2019

ईएनबीए राष्ट्रीय पुरस्कार 2019

राज्यस्तरीय युवा पत्रकार संघ पुरस्कार 2024 

सांस्कृतिक कलादर्पण पुरस्कार 2026

सन्मान देवदूतांचा पुरस्कार 2021

श्रेष्ठ सन्मान एबीपी माझा पुरस्कार 2019

चौथा स्तंभ राज्यस्तरीय विशेष पत्रकारिता पुरस्कार 2019

श्रेष्ठ सन्मान एबीपी माझा पुरस्कार 2019

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रोहित पवारांच्या कारखान्यातील धुरामुळे अपघात; नवनाथ बन यांनी सांगितलेला कारखाना विमानतळापासून किती लांब?
रोहित पवारांच्या कारखान्यातील धुरामुळे अपघात; नवनाथ बन यांनी सांगितलेला कारखाना विमानतळापासून किती लांब?
Maharashtra Cabinet decisions: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय, पालघर जिल्ह्याचा झोन-4 काढून झोन- 1 मध्ये समावेश, चंद्रकांत पाटलांच्या खात्याबाबत महत्त्वाची घडामोड
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय, पालघर जिल्ह्याचा झोन-4 काढून झोन- 1 मध्ये समावेश, चंद्रकांत पाटलांच्या खात्याबाबत महत्त्वाची घडामोड
Uddhav Thackeray : अमित शाह यांचा चकाट्या पिटणारा गृहमंत्री असा उल्लेख, मणिपूर, अरुणाचल प्रदेशला जाण्याचं चॅलेंज, उद्धव ठाकरेंचा शाहांवर हल्लाबोल
अमित शाह यांचा चकाट्या पिटणारा गृहमंत्री असा उल्लेख, उद्धव ठाकरे यांच्याकडून शाहांवर टीका
Rohit Pawar and Satyajeet Tambe: आपण सर्वजण एकाच पिढीतील राजकारणी, प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षा असतात, पण त्यासाठी मर्यादा ओलांडायच्या नसतात; सत्यजीत तांबेंनी रोहित पवारांना सुनावलं
आपण सर्वजण एकाच पिढीतील राजकारणी, प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षा असतात, पण त्यासाठी मर्यादा ओलांडायच्या नसतात; सत्यजीत तांबेंनी रोहित पवारांना सुनावलं
Advertisement

व्हिडीओ

Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report
Natasha Awhad Controversy : पक्षाचा सशर्त पाठिंबा, नताशा आव्हाडांकडून 'ठेंगा' Special Report
Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti Solapur News: वाहतूक सुरू ठेवल्यास ट्रॅक्टरचे टायर फोडू; ऊसाला पहिली उचल 3500 मिळेपर्यंत कारखाने बंद ठेवा; राजू शेट्टींच्या इशाऱ्यानंतर सोलापुरातील शेतकरी रस्त्यावर
वाहतूक सुरू ठेवल्यास ट्रॅक्टरचे टायर फोडू; ऊसाला पहिली उचल 3500 मिळेपर्यंत कारखाने बंद ठेवा; राजू शेट्टींच्या इशाऱ्यानंतर सोलापुरातील शेतकरी रस्त्यावर
रोहित पवारांच्या कारखान्यातील धुरामुळे अपघात; नवनाथ बन यांनी सांगितलेला कारखाना विमानतळापासून किती लांब?
रोहित पवारांच्या कारखान्यातील धुरामुळे अपघात; नवनाथ बन यांनी सांगितलेला कारखाना विमानतळापासून किती लांब?
Supriya Sule On Rohit Pawar: रोहित पवारांनी मफलर मॅन म्हणून दाखवला देवेंद्र फडणवीसांचा फोटो; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
रोहित पवारांनी मफलर मॅन म्हणून दाखवला देवेंद्र फडणवीसांचा फोटो; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
Rohit Pawar and Satyajeet Tambe: आपण सर्वजण एकाच पिढीतील राजकारणी, प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षा असतात, पण त्यासाठी मर्यादा ओलांडायच्या नसतात; सत्यजीत तांबेंनी रोहित पवारांना सुनावलं
आपण सर्वजण एकाच पिढीतील राजकारणी, प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षा असतात, पण त्यासाठी मर्यादा ओलांडायच्या नसतात; सत्यजीत तांबेंनी रोहित पवारांना सुनावलं
Maharashtra Cabinet decisions: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय, पालघर जिल्ह्याचा झोन-4 काढून झोन- 1 मध्ये समावेश, चंद्रकांत पाटलांच्या खात्याबाबत महत्त्वाची घडामोड
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय, पालघर जिल्ह्याचा झोन-4 काढून झोन- 1 मध्ये समावेश, चंद्रकांत पाटलांच्या खात्याबाबत महत्त्वाची घडामोड
Rohit Pawar and Prasad Lad: आम्ही रोहित पवारांचा रस्त्यावर दिसतील तिथे कार्यक्रम करु, फडणवीसांवरील आरोपांनंतर भाजपचा नेता आक्रमक; शरद पवार-सुप्रिया सुळेंनाही म्हणाला...
आम्ही रोहित पवारांचा रस्त्यावर दिसतील तिथे कार्यक्रम करु, फडणवीसांवरील आरोपांनंतर भाजपचा नेता आक्रमक; शरद पवार-सुप्रिया सुळेंनाही म्हणाला...
Rohit Pawar and Navnath Ban: अजितदादांच्या विमान अपघाताला रोहित पवारांच्या साखर कारखान्याचा धूर कारणीभूत? भाजपच्या नवनाथ बन यांचा गंभीर आरोप
अजितदादांच्या विमान अपघाताला रोहित पवारांच्या साखर कारखान्याचा धूर कारणीभूत? भाजपच्या नवनाथ बन यांचा गंभीर आरोप
Mumbai Crime News: तंत्र-मंत्र अन् डायन-श्रापाची भीती दाखवली; वृद्ध दाम्पत्याचे 6.38 कोटींची रुपये लुबाडले; सोनं, फ्लॅट अन् शेअरही विकले, कर्ज काढलं, अघोरी पूजा, काळी बाहुली दिली, मुंबईतील घटना
तंत्र-मंत्र अन् डायन-श्रापाची भीती दाखवली; वृद्ध दाम्पत्याचे 6.38 कोटींची रुपये लुबाडले; सोनं, फ्लॅट अन् शेअरही विकले, कर्ज काढलं, अघोरी पूजा, काळी बाहुली दिली, मुंबईतील घटनातंत्र-मंत्र अन् डायन-श्रापाची भीती दाखवली; वृद्ध दाम्पत्याचे 6.38 कोटींची रुपये लुबाडले; सोनं, फ्लॅट अन् शेअरही विकले, कर्ज काढलं, अघोरी पूजा, काळी बाहुली दिली, मुंबईतील घटना
Embed widget