प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या घरात हलला पाळणा; गुड न्यूज शेअर करत म्हणाली.. बेबीची पहिली झलक व्हायरल
Marathi TV Actress Kunjika Kalwint Welcomes Her Baby: शुभ विवाह फेम अभिनेत्री कुंजिका काळविंट झाली आई. सोशल मीडियात पोस्ट व्हायरल.

Marathi TV Actress Kunjika Kalwint: स्टार प्रवाहवरील शुभ विवाह या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीनं गुडन्यूज दिली आहे. तिनं ही आनंदाची बातमी सोशल मीडियात शेअर केली आहे. माहितीनुसार, ही अभिनेत्री महिन्याभरापूर्वीच आई झाली आहे. परंतु, तिनं बाळाची झलक सोशल मीडियात शेअर केली आहे. तिनं बाळाची झलक शेअर करून चाहत्यांना गुडन्यूज दिली. तिनं याची माहिती देत, पोस्टला भावनिक कॅप्शन देखील दिलं आहे. अभिनेत्रीच्या पोस्टवर मराठी कलाकारांनी शुभेच्छा देत तिच्या आनंदात सामील झाले आहेत. सध्या अभिनेत्रीची गुडन्यूजची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
शुभ विवाह या मालिकेतून अभिनेत्री कुंजिका काळविंट घराघरात पोहोचली. या मालिकेतून तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. या मालिकेत तिनं खलनायिकेची भूमिका साकारली आहे. पण सध्या ही अभिनेत्री वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आहे, आणि चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे तिनं दिलेली गुडन्यूज. कुंजिका काळविंट आई झाली आहे. तिनं एका बाळाला जन्म दिला आहे. महिन्याभरापूर्वीच तिनं बाळाला जन्म दिला होता. परंतु, नुकतंच तिनं पोस्ट करत बाळाची झलक शेअर केली. तिनं या पोस्टवर लक्षवेधी कॅप्शन देखील शेअर केलं आहे.
मराठी अभिनेत्री झाली आई, सोशल मीडियात पोस्ट व्हायरल
View this post on Instagram
"अगदी महिन्याभरापूर्वी आमचं बाळ या जगात आलं. बाळाचे आगमन होताच आमचे ह्रदय इतके भरून आले की, ज्याची आम्हाला कल्पनाही नव्हती. गेले 4 आठवडे निद्राहीन रात्र, बाळाला शांतपणे खुशीत घेण्याचे क्षण, हे सगळं आमच्यासाठी प्रेमाने भरलेले होते. पालकत्व आपल्यात नम्रपणा आणते. आम्ही सध्या शिकतोय, वाढत आहोत. तसेच आमच्या चिमुकल्याच्या प्रेमात जास्त प्रेमात पडत आहोत. आमच्या नव्या अध्यायाबद्दल, कुटुंबाला दिलेल्या प्रेमाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत", असं अभिनेत्रीनं पोस्टमध्ये म्हटलं आहे.
अभिनेत्रीची सोशल मीडियावर ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली. या पोस्टवर मराठी कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. कुंजिका काळविंटच्या पोस्टवर सुबोध भावे, ऋतुजा धाराप, नक्षत्र मेढेकर, शर्वरी जोग, ऋतुजा बागवे, केतकी विलास यांसारख्या कलाकारांनी शुभेच्छा दिल्या. सध्या अभिनेत्रीची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. दरम्यान, बाळंतपणासाठी अभिनेत्रीनं शुभ विवाह या मालिकेतून ब्रेक घेतला होता. यामुळे तिच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. परंतु, तिनं दिलेली गुडन्यूज ऐकून अनेकांनी आनंद व्यक्त केला.
























