Marathi Serial : आता दुपारही होणार मनोरंजनात्मक; 'यशोदा-गोष्ट श्यामच्या आईची' ते 'लवंगी मिरची'; या मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीस
Marathi Serial : 'यशोदा-गोष्ट श्यामच्या आईची' आणि 'लवंगी मिरची' या नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहेत.
Upcoming Marathi Serials : मराठी मालिका (Marathi Serial) विश्वात वेगवेगळे प्रयोग होत आहेत. वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यात कौटुंबिक, ऐतिहासिक ते विनोदी अशा सर्व प्रकरच्या मालिकांचा समावेश आहे. लवकरच 'यशोदा-गोष्ट श्यामच्या आईची' (Yashoda) आणि 'लवंगी मिरची' (Lavangi Mirchi) या दोन नव्या मालिका (New Marathi Serial) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
'यशोदा-गोष्ट श्यामच्या आईची' (Yashoda) आणि 'लवंगी मिरची' (Lavangi Mirchi) या मालिका येत्या 13 फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या मालिका प्रेक्षकांची दुपार खास करणार आहेत. वेगळेपण जपणाऱ्या या मालिकांची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
View this post on Instagram
'यशोदा - गोष्ट श्यामच्या आईची' या मालिकेची कथा साने गुरुजींना घडवणाऱ्या त्यांच्या आईच्या आयुष्यावर आधारित आहे. तर 'लवंगी मिरची' ही मालिका एका डॅशिंग मुलीची आहे. अन्याया विरुद्ध आवाज उठवणाऱ्या मुलीची गोष्ट या मालिकेत दाखवण्यात आली आहे. आपल्या आईला हक्क मिळवून देण्यासाठी यशोदा लढताना दिसणार आहे.
View this post on Instagram
प्रबोधनपर मालिका आणि कौटुंबिक नाट्यामुळे 13 फेब्रुवारीपासून प्रेक्षकांची दुपार खास होणार आहे. 'यशोदा-गोष्ट श्यामच्या आईची' आणि 'लवंगी मिरची' या दोन्ही मालिका प्रेक्षकांना दुपारी पाहता येणार आहेत. 'यशोदा - गोष्ट श्यामच्या आईची' ही मालिका 13 फेब्रुवारीपासून प्रेक्षक दुपारी 12.30 वा. आणि 'लवंगी मिरची' ही मालिका दुपारी 1. वाजता प्रेक्षक पाहू शकतात.
आता मालिकाप्रेमींना दुपारीही मिळणार मनोरंजनाची मेजवानी!
गेल्या काही दिवसांपूर्वी फक्त प्राइम टाईमदरम्यान मालिका प्रसारित केल्या जात असे. पण आता चित्र बदलले आहे. दिवसेंदिवस मालिकांची संख्या वाढत चालली आहे. शहरी भागांतील मालिकांप्रमाणेच ग्रामीण भागांतील मंडळींना आवडतील अशा मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहेत. त्यामुळे आता मालिकाप्रेमींना दुपारीही मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. मालिकाप्रेमी आता त्यांच्या सवडीने मालिका पाहू शकतात.
संबंधित बातम्या