Marathi Actress Vandana Gupte: वंदना गुप्तेंच्या गळ्यातील हारात 'ते' मौल्यवान रत्न कुठून आलं? 30 वर्षांपूर्वी फक्त 9 हजारांना विकत घेतलं अन् रॉयल फॅमिलीचा फोन, नेमकं काय घडलं?
Marathi Actress Vandana Gupte: वंदना गुप्तेंच्या गळ्यात राजघराण्यातलं रत्न आहे. बरं ते वंदना गुप्तेंकडे कसं आलं, याचा एक भन्नाट किस्सा त्यांनी सांगितला आहे.

Marathi Actress Vandana Gupte: मराठी सिनेसृष्टीतल्या (Marathi Films) दिग्गज अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे, वंदना गुप्ते (Vandana Gupte). गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या वेगवेगळ्या भूमिकांनी त्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. 'मातीच्या चुली', 'बाईपण भारी देवा', 'फॅमिली कट्टा'पासून ते नुकताच रिलीज झालेल्या 'अशी ही जमवा जमवी' सिनेमापर्यंत वंदना यांचे अनेक सिनेमे प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलंय. त्याव्यतिरिक्त वंदना गुप्तेंनी अनेक नाटकांमधूनही प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. सध्या त्यांचं 'कुटुंब कीर्रतन' नावाचं नाटक रंगभूमीवर गाजतंय. नुकत्याच वंदना गुप्ते आणि त्यांचे पती शिरिष गुप्ते दिवाळी पाडव्या निमित्त एबीपी माझाच्या कार्यक्रमात आलेले. यावेळी त्यांनी अनेक गोष्टीं सांगतल्या. तसेच, त्यांनी यावेळी त्यांच्याकडे असलेल्या दागिन्यांबाबतही एक महत्त्वाचा खुलासा केलाय. जो ऐकून आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. वंदना गुप्तेंच्या गळ्यात राजघराण्यातलं रत्न आहे. बरं ते वंदना गुप्तेंकडे कसं आलं, याचा एक भन्नाट किस्सा त्यांनी सांगितला आहे.
नऊ हजारांना घेतलेला दागिना, राजघराण्याचं रत्न... नेमकं काय घडलेलं?
मराठी अभिनेत्री वंदना गुप्ते आणि त्यांचे पती शिरिष गुप्ते 'माझा दिवाळी पाडवा' कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी गप्पागोष्टींमध्ये वंदना गुप्ते यांनी सांगितलं की, त्यांचे पती शिरीष दर दिवाळीला एकटे जाऊन त्यांच्यासाठी एक साडी आणि दागिना घेऊन येतात. पुढे बोलताना वंदना गुप्ते यांनी त्यांच्या गळ्यातल्या हारात असलेल्या रत्नाबाबत सांगितलं. त्या म्हणाल्या की, "मी आणि शिरीष जयपूरला गेलेलो, त्यावेळी मला एक दागिना घेऊन दिला, त्यातला मणी जयपूरच्या राजघराण्यातला आहे. तिथे जे शॉप होतं, त्या शॉपमध्ये हा मणी मी पाहिला, शिरीष झोपलेला दुपारचा, मी म्हटलं की, हा ठेवून द्या बाजूला, तुम्हाला काय अॅडव्हान्स द्यायचे असतील तर मी देते, पण मला माझ्या नवऱ्याला विचारावं लागेल, तो हो म्हणाला की, मी घेऊन टाकीन... पाच हजार रुपये मी त्यांना देऊन ठेवले, त्यांनी मला याची किंमत त्यावेळी नऊ हजार रुपये सांगितली. या गोष्टीला आता पंचवीस-तीस वर्ष झाली..."
"त्यानंतर हा कधी उठतोय, याची वाट पाहिली आणि चहा तयार आहे, असं सांगून खाली घेऊन गेले त्याला मी... त्यानंतर तो म्हणाला अगं छान आहे गं... मग मी म्हटलं घ्यायचंय, बाकीचे पैसे दे... हा मणी मी घेतला, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी मला फोन आला. ते म्हणाले की, अहो हा नुसता शोचा होता, राजघराण्याचं कलेक्शन म्हणून तो ठेवलेला, पण आमच्या सेलरनं तो तुम्हाला विकला... मी म्हटलं आता तो माझ्याकडे आलाय, आता तुम्ही लाख रुपये दिले, तरी तो मी तुम्हाला देणार नाही... माझ्या सासुबाई म्हणायच्या, घारीची नजर आहे तुझी...", असं वंदना गुप्ते यांनी सांगितलं.























