Mukta Barve on Marriage: 46 वर्षांची झालीस, लग्नाचं काय? त्या प्रश्नांबाबत मुक्ता बर्वे स्पष्टच म्हणाली, ' वैयक्तिक आयुष्याबद्दल उत्तरं द्यायची गरज वाटत नाही'
Mukta Barve on Marriage: नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीवेळी मुक्ताने या विषयावर उत्तर देत स्वतःच्या निवडीमागची कारणं स्पष्ट केली आहेत.

Mukta Barve on Marriage: मराठी प्रेक्षकांची आवडती आणि बहुमुखी अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वेचं (Mukta Barve) नाव सातत्याने घेतलं जातं. तब्बल २५ वर्षांपासून नाटक, मालिका आणि चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये तीने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. दमदार अभिनय, विविधतेने भरलेल्या भूमिका आणि प्रेक्षकांशी जोडणारा सहज संवाद यामुळे मराठीतल्या सक्षम अभिनेत्रींपैकी एक म्हणून तिची ओळख पक्की झाली आहे. व्यावसायिक आयुष्यात इतकं यश मिळूनही मुक्ताचं वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलं आहे. वयाच्या ४६व्या वर्षी ती अविवाहित आहे, आणि यावरून तिला वारंवार प्रश्न विचारले जातात. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीवेळी मुक्ताने (Mukta Barve) या विषयावर उत्तर देत स्वतःच्या निवडीमागची कारणं स्पष्ट केली आहेत.(Mukta Barve)
Mukta Barve on Marriage: कोणाच्या वैयक्तिक आयुष्याविषयी का विचारावं
एका मराठी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीवेळी मुक्ता बर्वे (Mukta Barve) म्हणाली, "मी या प्रश्नाचं उत्तरच देत नाही. मला कोणी समोर येऊन विचारतही नाही. मला वाटतं तशी गरजही नाही. कारण कोणाच्या वैयक्तिक आयुष्याविषयी का विचारावं आणि कोणी आपल्या खाजगी आयुष्याविषयी का उत्तर द्यावं. केवळ मी समाजमाध्यमात काम करते म्हणून कोणीही मला काहीही विचारु शकेल असा त्याचा अर्थ नाही."
ती पुढे बोलताना म्हणाली, "माझं वैयक्तिक आयुष्य मी माझ्या कामापेक्षा कायमच लांब ठेवलं आहे. ते एकत्र करण्याची मला गरजही वाटत नाही. जोपर्यंत त्याचा माझ्या जगण्या वागण्यावर परिणाम होत नाही तोवर तो माझा अत्यंत वैयक्तिक प्रश्न आहे आणि तो आदरपूर्वक लोकांनीही जपला पाहिजे. माझ्याबाबतीत लोक ते नेहमीच जपतात. पूर्वी ते गंमत म्हणून विचारलं जायचं कारण तेव्हा स्थळं यायची आणि ती अजूनही येतात. पण त्याची चर्चा किंवा तो विषय असू नये कारण वैयक्तिक आयुष्य हे नेहमीच खाजगी असतं आणि माझं क्षेत्र म्हणून जे काम आहे ते वेगळं आहे."
मुक्ता बर्वेचा नुकताच 'असंभव' हा मराठी सिनेमा प्रदशित झाला आहे. यामध्ये तिच्यासोबत सचित पाटील, प्रिया बापट यांचाही समावेश आहे. हा एक थरारक सिनेमा आहे. सोबतच मुक्ता आता हिंदीसाठीही ऑडिशन्स देत आहे. वेबसीरिज, हिंदी सिनेमांमध्येही तिला एक्स्प्लोर करायचं असल्याचं ती काही मुलाखतींमध्ये म्हणाली आहे. मुक्ताला आणखी नव्या भूमिकांमध्ये आणि हिंदीतही पाहण्यासाठी चाहते कायमच उत्सुक आहेत.
























