Marathi Actor Varad Chavan On Suraj Chavan Zapuk Zupuk Movie: 'ही तर भिकार मेंटॅलिटी...'; सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' सुपरफ्लॉप, मराठी अभिनेत्याची केदार शिंदेंवर जोरदार टीका
Marathi Actor Varad Chavan On Suraj Chavan Zapuk Zupuk Movie: मराठी अभिनेते विजय चव्हाण यांचा मुलगा अभिनेता वरद चव्हाणनं आपल्या युट्यूब चॅनलवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्यानं दिग्दर्शक केदार शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Marathi Actor Varad Chavan On Suraj Chavan Zapuk Zupuk Movie: 'बिग बॉस'च्या (Bigg Boss) पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणनं (Suraj Chavan) ट्रॉफी उंचावली आणि अवघ्या महाराष्ट्रानं (Maharashtra News) जल्लोष साजरा केला. सूरजला ट्रॉफीपर्यंत जाण्याचा त्याचा मार्ग दाखवण्याचं काम महाराष्ट्रातील त्याच्या फॅन्सनी अगदी चोख पार पाडलं. सूरज चव्हाणनं ट्रॉफी उंचावल्यानंतर त्याच मंचावर त्याला घेऊन सिनेमा बनवणार असल्याची घोषणा मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केली. त्यानंतर सूरजसह दिग्गज कलाकारांची (Marathi Actor) मोठी फौज घेऊन केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी 'झापुक झुपूक' (Zapuk Zupuk Movie) सिनेमा बनवला. पण, सूरजवर भरभरून प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातल्या जनतेनं मात्र याकडे पाठ फिरवली. बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) सिनेमा जोरात आदळला.
'झापुक झुपूक'नं बॉक्स ऑफिसवर गंटागळ्या खाल्ल्यानंतर एका मुलाखतीत बोलताना केदार शिंदे यांना सिनेमाच्या अपयशाबाबत विचारण्यात आलं. त्यावर बोलताना ते म्हणालेले की, "माझ्या विचारातच काहीतरी खोट असेल... मी हा विचार करू शकत नाही की, समोरच्यांना काही अक्कलच नाही... उलट समोरच्यांना जास्त अक्कल होती, ज्यांनी मला रिजेक्ट केलं... त्यामुळे आता त्यांच्या मनामध्ये मी माझं स्थान कसं निर्माण करेन, यासाठी मी माझे प्रयत्न सुरू केलेत.", अशातच आता मराठी अभिनेता वरद चव्हाणनं केदार शिंदे यांना 'झापुक झुपूक' सिनेमावरुन खडे बोल सुनावले आहेत. तसेच, अभिनेत्यानं केदार शिंदे यांना अनेक गोष्टींवर सल्ला दिला आहे. तसेच,
वरद चव्हाण नेमकं काय म्हणाला?
वरद चव्हाणने स्वतःच्या युट्युब चॅनलवर केदार शिंदे आणि 'झापुक झुपूक' या सिनेमावर टीका केली आहे. वरद म्हणाला की, "नमस्कार मी वरद विजय चव्हाण. अलीकडेच मी केदार शिंदे यांचा इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पाहिला. त्यामध्ये केदार यांना विचारण्यात आलं की, तुम्ही झापुक झुपूकचं अपयश कसं पचवलं. त्यावेळी त्यांचं पहिलं उत्तर हेच होतं की, माझ्या मनातच काहीतरी खोट असेल. हे वाक्य मला पचलं नाही. अहो सर! तुम्ही इंडस्ट्रीत इतकी वर्षे आहात. अपयश काय तुम्ही पहिल्यांदा बघितलं असं नाही. तुम्ही जेव्हा या सिनेमाचा ट्रेलर, टीझर, पोस्टर रीलीज केलात, तेव्हा प्रेक्षकांनी त्या हिरोला रिजेक्ट केलं. असं पहिल्यांदा तुमच्यासोबत घडलं असेल. याच्याआधी तुमच्यासोबत हे घडलं नसेल, असंही नाही. पण तुम्ही अॅक्सेप्ट करत नाही, हे जरा कुठे खटकतंय. जर हे अपयश तुम्हाला पचवता येत नसेल, तर आमच्यासारख्यांनी काय करायचं."
"हा सिनेमा जेव्हा रीलीज झाला, तेव्हा प्रेक्षकांनी त्याला विरोध केला. केदार शिंदे यांच्यावर प्रश्न उपस्थित केले. पण जेव्हा प्रेक्षक सांगतो की, आम्हाला नाही बघायचं हिरो म्हणून तर मग कुठेतरी ते एक्सेप्ट करा. केदार शिंदे यांच्या मावशीने जेव्हा सूरजची बिग बॉसमध्ये एन्ट्री झाली, तेव्हा त्यांचा आणि त्यांच्या मावशीचा फोन कॉल झाला तेव्हा, सूरजला सिनेमात का घेतलं? असं विचारलं तेव्हा केदार शिंदे म्हणाले, माझ्या पुढच्या सिनेमाचा हिरो आहे तो. जेव्हा सिनेमा रीलीज झाल्यानंतर केदार शिंदे यांनी इन्स्टाग्रामवर लाइव्ह सेशन घेतलं तेव्हा ते सुरुवातीलाच म्हणाले मी, ट्रोलर्सना विचारात नाही. पण, त्यानंतर ते त्यांच्याबद्दलच बोलत होते. पुढे केदार शिंदे यांचा बालीशपणा म्हणजे, केदार शिंदे यांनी सूरजला ट्रोलर्स काय म्हणतात, हे दाखवलं होतं.", असं वरद चव्हाण म्हणाला.
ही तर भिकार मेंटॅलिटी निर्मात्यांची: केदार शिंदे
'झापुक झुपूक' फ्लॉप होण्यासाठी वरद चव्हाणनं निर्मात्यांना जबाबदार धरलं. तो म्हणाला की, "सूरजच्या सिनेमा त्याच्या फॅन्सना पाहता यावा यासाठी 99 रुपयाला सिनेमाची तिकीट विक्री सुरू होती. ही तर भिकार मेंटॅलिटी निर्मात्यांची मला कळली नाहीये. मराठी माणूस हा सिनेमा बघायला चाचपडतो. का तर, हजार रुपयांचं तिकीट परवडत नाही. पण तुमचा सिनेमाच त्या कॅलिबरचा नसेल तर... कारण, हाच मराठी प्रेक्षक तेवढेच पैसे देऊन साऊथचे हिंदी सिनेमे बघतो. मराठी नाटकं बघतो, तेव्हा तो पैशांचा विचार करत नाही. तुमचंच नाटक 'सही रे सही' पहिल्या दिवसापासून हाउसफुल होतं. त्यामुळे हे आता सोडून द्या. एका या अपयशामुळे तुमच्या आधीच्या कार्यावर पाणी सोडू नका..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :























