एक्स्प्लोर

Marathi Actor Angry On Who Burst Crackers Late Night: 'तू जाणारेस नरकात...'; रात्री-बेरात्री फटाके फोडणाऱ्यांवर मराठी अभिनेत्याचा संताप, थेट विराट कोहलीचं नाव घेत म्हणाला...

Marathi Actor Angry On Who Burst Crackers Late Night: 'ठरलं तर मग' फेम मराठी अभिनेत्यानं रात्री-बेरात्री फटाके फोडणाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

Marathi Actor Angry On Who Burst Crackers Late Night: सगळीकडे दिवाळी (Diwali 2025) मोठ्या उत्साहात साजरी केली जातेय. दिव्यांचा लख्ख प्रकाश, मोठमोठ्या रांगोळ्या, आकर्षक रोषणाई यामध्ये अवघा देश न्हाऊन निघाला आहे. त्यासोबतच फटाक्यांची आतिषबाजी आहेच, पण काहीजण मात्र उगाच कसेही वागतात, कधीही फटाके फोडतात. त्याचा नाहक त्रास मात्र इतरांना सहन करावा लागतो. असाच अनुभव एका मराठी अभिनेत्यालाही झालाय, त्यासंदर्भात अभिनेत्यानं सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. 

'ठरलं तर मग' फेम मराठी अभिनेता (Marathi Actor) चैतन्य सरदेशपांडेनं (Chaitanya Sardeshpande) रात्री-बेरात्री फटाके फोडणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. तसेच, यासंदर्भात एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे. अभिनेता चैतन्य सरदेशपांडेने व्हिडीओ शेअर करत रात्री फटाके फोडणाऱ्यांना नरकात पाठवणार असल्याचं म्हटलं आहे. 

सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये काय म्हणाला अभिनेता? 

मराठी टेलिव्हिजन अभिनेता चैतन्य सरदेशपांडे म्हणाला की, "सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा...सगळं मान्य आहे. पण म्हणून रात्री अडीच वाजता कोण फटाके फोडतंय? आणि का? रात्री अडीच ही कोणाची पहाट आहे? भाई तुला उठायचंय तर उठ... रात्री 1 वाजता उठ... माझं काहीच म्हणणं नाहीये. अभ्यंगस्नान कर, उटण्याने अंघोळ कर... सुतळी बॉम्बच्या सुतळीने अंग घास मला काहीच घेणंदेणं नाहीये... पण अडीच वाजता नको रे फटाके फोडू. अडीच ही पहाट नसते. तू काय जपानमध्ये जन्माला आलाय का? रात्री अडीच वाजता फटाके फोडले ना त्याच्यामुळेच विराट कोहलीची झोप झाली नाही. दुसऱ्या दिवशी तो आऊट झाला. दिवाळी पहाट आहे म्हणे..."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Chaitanya Sardeshpande (@sarchaitanya)

"मला मान्य आहे की नरकचतुर्दशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठावं लागतं नाहीतर तुम्ही नर्कात जाता. पण, तुला असं का वाटतंय की अडीच वाजता फटाके फोडून तू नरकात जाणार नाहीस? तू जाणारेस नरकात...तू नाही गेलास तर मी घेऊन जाईन आणि दारापर्यंत सोडून येईन. जर तुला त्यांनी घेतलं नाही तर मी वशिला लावीन... नरकाच्या दारात उभं राहून अशी लाथ घालेन तुला आणि मग ओरडेन हॅपी दिवाली... तेव्हा कळेल...", असंही त्याने पुढे म्हटलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Swapnil Joshi, Bhau Kadam in Premachi Goshta 2 Movie: स्वप्निल जोशी, भाऊ कदम पहिल्यांदाच एकत्र; प्रेक्षकांची दिवाळी दणक्यात, 'प्रेमाची गोष्ट 2'मधून नवी केमिस्ट्री उलगडणार

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Actress Mrunal Dusanis: 'नाचणारे सगळे जागेवरच स्तब्ध...', प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या लग्नाच्या वरातीत अचानक 'जन गण मन' वाजलं, मग काय घडलं?
'नाचणारे सगळे जागेवरच स्तब्ध...', प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या लग्नाच्या वरातीत अचानक 'जन गण मन' वाजलं, मग काय घडलं?
Anirudh Ravichander Kavya Maran Wedding Date Confirmed Rumours: काव्या मारनच्या लग्नाची तारीख ठरली? बॉलिवूड स्टारसोबत संसार थाटणार असल्याच्या चर्चा, रजनीकांत यांच्यासोबत खास कनेक्शन...
काव्या मारनच्या लग्नाची तारीख ठरली? बॉलिवूड स्टारसोबत संसार थाटणार असल्याच्या चर्चा, रजनीकांत यांच्यासोबत खास कनेक्शन...
OTT Crime Thriller Webseries: बॉडीची विल्हेवाट लावण्याच्या नादात अडकले 3 मित्र; मराठमोळ्या अभिनेत्याची OTTवर नवी डार्क कॉमेडी क्राइम थ्रिलर सीरिज, सस्पेन्स भंडावून सोडणार
बॉडीची विल्हेवाट लावण्याच्या नादात अडकले 3 मित्र; मराठमोळ्या अभिनेत्याची OTTवर नवी डार्क कॉमेडी क्राइम थ्रिलर सीरिज, सस्पेन्स भंडावून सोडणार
Shatrugan Sinha on Sonakshi Sinha: वडिलांच्या पावलावर लेक पाऊल ठेवणार? सोनाक्षी सिन्हा राजकारणात जाणार? नक्की खरं काय? शत्रुघ्न सिन्हा म्हणाले...
वडिलांच्या पावलावर लेक पाऊल ठेवणार? सोनाक्षी सिन्हा राजकारणात जाणार? नक्की खरं काय? शत्रुघ्न सिन्हा म्हणाले...

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
Embed widget