Amit Shah vs Uddhav Thackeray : 'कोरोना'तले फोन,आरोपांचा टोन Special Report
अजित पवारांच्या पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमात, अमित शाहांनी कोरोना काळातील आठवणी सांगत अजितदादांचं कौतुक केलं तर उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागलं... उद्धव ठाकरेंनी त्या टीकेची परतफेड करताना, भाजपनं ७० हजार कोटींच्या घोटाळ्यावरून अजित पवार आणि राष्ट्रवादीवर केलेले आरोप उकरून काढले... त्यामुळे भाजप आणि उद्धव ठाकरेंमध्ये मोठं वाग्युद्ध रंगलंय.. पाहुयात त्याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट...
पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात,
सोमवारी दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पुतळ्याचं अनावरण झालं...
यावेळी अजित पवारांचं, त्यांच्या कार्यशैलीचं कौतुक करताना...
अमित शाहांना शब्द अपुरे पडत होते...
अजित पवारांची तोंडभरून स्तुती करताना,
अमित शाहांनी कोरोना काळाचा उल्लेख करत, तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची संधी साधली
उद्धव ठाकरेंवर टीका करताना अमित शाहा जसे भूतकाळात गेले...
तसंच उद्धव ठाकरेंनी देखील भूतकाळ उकरून काढत,
भाजपनं ७० हजार कोटींच्या घोटाळ्यावरून राष्ट्रवादीचा कसा उद्धार केला होता याची
आठवण करून दिलीय
अमित शाहांनी अजित पवारांच्या पुतळ्यासमोर नाक रगडून माफी मागायला हवी होती...
अशी अपेक्षा व्यक्त करताना उद्धव ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्र्यांवर कोणता घणाघात केलाय?
All Shows































