एक्स्प्लोर

Manoj Jarange Sangharsh Sangharsh Yodha : 'बायकोला सांगितलंय, आलो तर तुझा...गेलो तर समाजाचा; मनोज जरांगे यांच्या आयुष्यावरील 'संघर्ष योद्धा'चा धमाकेदार टीझर लाँच, पाहा व्हिडीओ

Manoj Jarange Sangharsh Sangharsh Yodha : मनोज जरांगे यांच्या आयुष्यावर आधारीत असलेल्या 'संघर्ष योद्धा' चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच करण्यात आला आहे.

Manoj Jarange Sangharsh Sangharsh Yodha Movie :   मागील काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावर निर्णायक आंदोलन उभारणारे  मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्या आयुष्यावर आधारीत असलेल्या 'संघर्ष योद्धा' (Sangharsh Yodha) चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला आहे. मराठा समाजाचे प्रश्न, आरक्षणाची मागणी आणि त्यासाठी मनोज जरांगे यांनी उभे केलेले आंदोलन या भोवती चित्रपट बेतला असल्याचे टीझरवरून स्पष्ट होत आहे.  

मनोज जरांगे पाटील बऱ्याच वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष करत आहेत. मात्र काही महिन्यांपूर्वी मनोज जरांगे प्रसिद्धीस आले. त्यांचे उपोषण, भाषणे, दौरे यांना राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला. मराठा समाजाच्या ताकदीचं दर्शनच या निमित्ताने झालं. मनोज जरांगे पाटील यांना मिळत असलेल्या प्रतिसादामुळे राज्य सरकारातील मंत्री, मुख्यमंत्री, अन्य नेत्यांनाही त्यांची दखल घ्यावी लागली. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेला एल्गार धमाकेदार "संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील" या चित्रपटाच्या टीजरमधून दिसत आहे. लाखोंची गर्दी, उधळला जाणारा गुलाल यामुळे आंदोलनाचे वातावरण चित्रपटातही टिपला गेला आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना राज्यभरातून मिळालेला तुफान प्रतिसाद या चित्रपटालाही मिळणार हे या टीजरमधून स्पष्ट होत आहे. 

चित्रपट कधी रिलीज होणार? ( Sangharsh Yodha Movie Release Date )

मराठा समाजाच्या मुद्द्यावर गेले काही महिने महाराष्ट्र आणि राज्यातील राजोकारण अक्षरशः ढवळून निघालं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांची कहाणी आता "संघर्षयोद्धा"- मनोज जरांगे पाटील  या चित्रपटातून मांडली जाणार आहे. या चित्रपटाचा धमाकेदार टीजर लाँच करण्यात आला आहे. हा चित्रपट पुढील महिन्यात 26  एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. 

सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी या चित्रपटाचं लेखन आणि निर्मिती केली आहे. सहनिर्माते रामदास मेदगे, जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे कार्तिक दोलताडे , नर्मदा सिनेव्हिजन्स हे आहेत , शिवाजी दोलताडे यानी दिग्दर्शनाची जबाबदारी पेलली आहे. डॉ.सुधीर निकम यांची संवाद आणि पटकथा आहे. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे,  माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर , सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके, यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Exclusive : जे आपला पक्ष सांभाळू शकत नाहीत ते देश काय सांभाळणार? नरेंद्र मोदींची पवार-ठाकरेंवर टीका
जे आपला पक्ष सांभाळू शकत नाहीत ते देश काय सांभाळणार? नरेंद्र मोदींची पवार-ठाकरेंवर टीका
Sanjay Raut : 'कितीही सभा घ्या, रोड शो घ्या, महाराष्ट्र तुमच्यामागे उभा राहणार नाही'; संजय राऊतांचा नाशिकमधून पीएम मोदींवर घणाघात
'कितीही सभा घ्या, रोड शो घ्या, महाराष्ट्र तुमच्यामागे उभा राहणार नाही'; संजय राऊतांचा नाशिकमधून पीएम मोदींवर घणाघात
Sanjay Patil : माझं नशीब उलटसुलट करणारा जिल्ह्यात अजून राजकीय पुढारी जन्माला आला नाही; संजय पाटलांचा विश्वजित कदमांवर पलटवार
कपटी मित्रापेशा दिलदार शत्रू कामाला आला; लीड कमी होईल, पण...! संजयकाका पाटील काय म्हणाले?
Ajit Pawar : पीएम मोदींच्या रॅलीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांची अनुपस्थिती; कारणही आलं समोर!
पीएम मोदींच्या रॅलीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांची अनुपस्थिती; कारणही आलं समोर!
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

PM Modi Interview : मुंबईत येताच ठाकरे-पवारांवर जहरी वार; Road Show मधून पीएम मोदी EXCLUSIVENarendra Modi vs Farmer in Nashik : मोदींच्या सभेत शेतकरी ओरडला, कांद्यावर बोला! पुढे काय झालं?Eknath Shinde Speech Kalyan : अग्निपथ अग्निपथ अग्निपथ... मोदींसमोर एकनाथ शिंदेंचा फिल्मी अंदाजPM Narendra Modi Mumbai Road Show : मोदींच्या एन्ट्रीला DJने वाजवलं.. मेरे भारत का बच्चा बच्चा...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi Exclusive : जे आपला पक्ष सांभाळू शकत नाहीत ते देश काय सांभाळणार? नरेंद्र मोदींची पवार-ठाकरेंवर टीका
जे आपला पक्ष सांभाळू शकत नाहीत ते देश काय सांभाळणार? नरेंद्र मोदींची पवार-ठाकरेंवर टीका
Sanjay Raut : 'कितीही सभा घ्या, रोड शो घ्या, महाराष्ट्र तुमच्यामागे उभा राहणार नाही'; संजय राऊतांचा नाशिकमधून पीएम मोदींवर घणाघात
'कितीही सभा घ्या, रोड शो घ्या, महाराष्ट्र तुमच्यामागे उभा राहणार नाही'; संजय राऊतांचा नाशिकमधून पीएम मोदींवर घणाघात
Sanjay Patil : माझं नशीब उलटसुलट करणारा जिल्ह्यात अजून राजकीय पुढारी जन्माला आला नाही; संजय पाटलांचा विश्वजित कदमांवर पलटवार
कपटी मित्रापेशा दिलदार शत्रू कामाला आला; लीड कमी होईल, पण...! संजयकाका पाटील काय म्हणाले?
Ajit Pawar : पीएम मोदींच्या रॅलीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांची अनुपस्थिती; कारणही आलं समोर!
पीएम मोदींच्या रॅलीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांची अनुपस्थिती; कारणही आलं समोर!
विश्वचषकाआधी नेपाळला गुड न्यूज, रेप केस प्रकरणात Sandeep Lamichhane ला क्लीन चिट  
विश्वचषकाआधी नेपाळला गुड न्यूज, रेप केस प्रकरणात Sandeep Lamichhane ला क्लीन चिट  
राजस्थानच्या संघात बटलरची जागा कुणी घेतली? पंजाबच्या ताफ्यात कोण कोण?
राजस्थानच्या संघात बटलरची जागा कुणी घेतली? पंजाबच्या ताफ्यात कोण कोण?
Ghatkopar Hoarding : अनधिकृत होर्डिंग हटवण्याची कारवाई युद्ध पातळीवर सुरु, रेल्वे हद्दीतील नियमबाह्य होर्डिंग हटवण्याची नोटीस जारी
अनधिकृत होर्डिंग हटवण्याची कारवाई युद्ध पातळीवर सुरु, रेल्वे हद्दीतील नियमबाह्य होर्डिंग हटवण्याची नोटीस जारी
Amit Shah on Arvind Kejriwal : 'अरविंद केजरीवालांसाठी एक वाईट बातमी आहे...' अमित शाह नेमकं काय म्हणाले?
'अरविंद केजरीवालांसाठी एक वाईट बातमी आहे...' अमित शाह नेमकं काय म्हणाले?
Embed widget