Mandana Karimi : बुरखा परिधान करुन डान्स केल्यानं मंदाना करीमी ट्रोल; सडेतोड उत्तर देत म्हणाली, 'हे जग पागल...'
Mandana Karimi : सध्या मंदाना तिच्या डान्सच्या व्हिडीओमुळे चर्चेत आहे. या व्हिडीओमुळे तिला अनेकांनी ट्रोल केलं.
Mandana Karimi : प्रसिद्ध अभिनेत्री मंदाना करीमी (Mandana Karimi) तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते. मंदानाच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आहे. मंदाननं एकता कपूर (Ekta Kapoor) आणि कंगना रनौत (Kangana Ranaut) यांच्या लॉकअप (Lock Upp) शोमध्ये सहभाग घेतला होता. सध्या मंदाना तिच्या डान्सच्या व्हिडीओमुळे चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये मंदाना ही बुरखा परिधान करुन डान्स करताना दिसत आहे. ज्यामुळे मंदानाला अनेकांनी ट्रोल केलं. या ट्रोलर्सला मंदानानं सडेतोड उत्तर दिलं आहे.
मंदानानं दिलं उत्तर
मंदानानं इंस्टाग्राम एक स्टोरी शेअर केली. या स्टोरीमध्ये तिनं लिहिलं, 'बुरखा रिलवर आलेले सर्व कमेंट्स मी वाचले. हे लोक पागल आहेत. हे जग पागल आहे. माझं काम झालं.' या पोस्टमध्ये तिनं एका यूनिकॉर्न इमोजीचा देखील वापर केला आहे. मंदानानं शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिचा ब्लॅक शॉर्ट ड्रेस लूकमधील फोटो दिसत आहे.
मंदानानं शेअर केला होता डान्सचा व्हिडीओ
मंदानानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती एका मॉलमध्ये डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओला मंदानानं कॅप्शन दिलं, 'शूटिंग करणं हे BTS शूट करण्यासारखं सोपं असलं पाहिजे. ' लोकांनी या व्हिडीओला कमेंट करुन मंदानाला ट्रोल केलं. मंदानाला याआधी तिच्या फॅशन स्टाईलमुळे देखील अनेकांनी ट्रोल केले.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
मंदाना करीमीने जानेवारी 2017 मध्ये बिझनेसमन गौरव गुप्तासोबत लग्न केले होते. लग्नापूर्वी दोघे दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. पण, लग्न झाल्यानंतर काही महिन्यांनी दोघे वेगळे झाले. मंदानाने गौरव आणि त्याच्या कुटुंबावर घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला. गेल्या वर्षी दोघांचा घटस्फोट झाला.
हेही वाचा:
- Mandana Karimi : मंदाना करीमीचे दिग्दर्शकासोबत होते सिक्रेट अफेअर, अभिनेत्रीच्या आयुष्यातील ‘ती’ घटना ऐकून कंगनाच्या डोळ्यात पाणी!
- मी कपडे बदलताना त्यांनी दरवाजा उघडला, मंदना करीमीचा निर्माते धारिवाल यांच्यावर आरोप
- Raksha Bandhan : कोणाला व्हायचं होतं इंजिनियर तर कोण आहे मॉडेल; पाहा कोण आहेत 'रक्षा बंधन'मधील अक्षयच्या चार बहिणी