एक्स्प्लोर

Malaika Arora Visits Jain Temple With Mistry Man: 17 वर्षांनी लहान रूमर्ड बॉयफ्रेंडसोबत जैन मंदिरात दिसली मलायका अरोरा; VIDEO पाहून चाहते म्हणाले, 'आता ठरलंय बरं का...'

Malaika Arora Visits Jain Temple With Mistry Man: सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये मलायका तिचा कथित प्रियकर, हर्ष मेहतासोबत स्पॉट झालीय.  हर्ष देखील तिच्या बाजूला उभा राहून पोज देताना दिसला.

Malaika Arora Visits Jain Temple With Mistry Man: बॉलिवूडची (Bollywood News) छैय्या छैय्या गर्ल मलायका अरोरा (Malaika Arora) पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून ती एका मिस्ट्री मॅनसोबत सातत्यानं स्पॉट होतेय. मलायका आणि मिस्ट्री मॅनचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण, अजूनही दोघांपैकी कोणीच याबाबत कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. सध्या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच आता पुन्हा एकदा दोघेही एकत्र स्पॉट झाल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. रविवारी राजस्थानमधील आदिनाथ जैन मंदिरात या जोडी एकत्र दिसल्यामुळे सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे. हा व्हिडीओ वेगानं व्हायरल होत असून, या दोघांचं नातं आता अधिकृतपणे पक्कं झालं असावं, अशा चर्चा लोकांमध्ये रंगल्या आहेत. 

जैन मंदिरात एकत्र स्पॉट झाले मलायका आणि मिस्ट्री मॅन

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये मलायका तिचा कथित प्रियकर, हर्ष मेहतासोबत स्पॉट झालीय.  हर्ष देखील तिच्या बाजूला उभा राहून पोज देताना दिसला. जैन मंदिरात स्पॉट झालेल्या मलायकानं अत्यंत साधा लूक केलेला. तिनं पांढऱ्या रंगाचा कुर्ता वेअर केलेला, तर हर्ष निळ्या रंगाच्या शर्टमध्ये दिसलेला. जरी मलायकानं ही भेट खाजगी ठेवण्याचा प्रयत्न केला असला, तरी केवळ तिची एक झलक पाहण्यासाठी तिथे असंख्य चाहते जमले होते आणि अनेकांनी अभिनेत्रीसोबत फोटो काढायला गर्दीही केलेली. परिस्थिती हाताळण्यासाठी आणि मंदिराच्या परिसराचं पावित्र्य राखण्यासाठी स्थानिक प्रशासनाला हस्तक्षेप करावा लागला. हर्ष आणि मलायका एकत्र दिसण्याची ही काही पहिलीच वेळ नाही, यापूर्वी, कृतिका कामरा आणि गौरव कपूर यांच्या रिसेप्शनमध्येही हर्ष दिसला होता. मात्र, त्यावेळी त्यानं पॅपाराझींच्या कॅमेऱ्यांपासून दूर राहण्याचा, म्हणजेच नजरेआड होण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आणि त्याच्या याच कृतीमुळे त्यांच्या नात्याबद्दलच्या चर्चांना आणि तर्कवितर्कांना आणखीच उधाण आलंय.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by B O L L Y W O O D (@filmyselfies.official)

मलायकासोबत स्पॉट झालेला हर्ष मेहता कोण?

मलायका अरोरासोबत सातत्यानं दिसणारा मिस्ट्री मॅन हर्ष मेहता असल्याचं सांगितलं जातंय. मीडिया रिपोर्टनुसार, 33 वर्षांचा हर्ष मेहता हिरे व्यापारी आहे. मलायका आणि हर्ष यांच्या डेटिंगच्या अफवा गेल्या वर्षापासूनच सुरू आहेत. त्यावेळी दोघेही मुंबईतील एनरिक इग्लेसियसच्या कॉन्सर्टमध्ये एकत्र दिसलेले. त्यावेळी मलायका फारच खूश दिसत होती आणि संपूर्ण शो दरम्यान दोघेही एकत्र होते. शो संपल्यानंतर दोघेही एकापाठोपाठ एक बाहेर पडले, तेव्हापासूनच दोघांच्या रिलेशनच्या जोरदार चर्चा रंगलेल्या. 

एअरपोर्टवरही एकत्र दिसलेले दोघे 

कॉन्सर्टमध्ये एकत्र दिसल्यानंतर मलायका आणि हर्ष 26 नोव्हेंबरला मुंबई एअरपोर्टवरही एकत्र दिसलेले. पण, तिथेही दोघे एकत्र बाहेर पडले नाहीत. मलायका पुढे होती, तर हर्ष तिच्या मागे तोंडावर मास्क लावून माध्यमांच्या कॅमेऱ्यांपासून दूर राहण्याच्या प्रयत्नात असतानाच स्पॉट झाला. त्यामुळे दोघांच्या नात्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, एअरपोर्टवरुन मलायका जेव्हा पार्किंग एरियामध्ये पोहोचली आणि गाडीत जाऊन बसली, त्यावेळी काहीच सेकंदात हर्षही त्याच कारमध्ये जाऊन बसला. 

दरम्यान, मलायका अरोराच्या लव्ह लाईफबाबत बोलायचं झालं तर, अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्यानंतरपासूनच मलायका चर्चेत होती. घटस्फोटानंतर मलायका अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. 2018 मध्ये दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केलेली आणि जवळपास सहा वर्ष एकत्र राहिल्यानंतर 2024 मध्ये दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. मलायकानं अभिनेता आणि निर्माता अरबाज खानसोबत आपली लग्नगाठ बांधलेली. 1998 मध्ये लग्नगाठ बांधल्यानंतर या कपलनं 2017 मध्ये घटस्फोट घेतलेला.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Sunil Pal Humiliated Old Event: आधी पुष्पगुच्छ देऊन सत्कार अन् नंतर स्टेजवरुन हाकलवण्याचा प्रताप; दिग्गज कॉमेडीयन सुनील पालचा जाहीर कार्यक्रमात अपमान VIDEO

महत्त्वाच्या बातम्या

Ramayan Release Date:4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
Mitali Mayekar Kanyadaan Onscreen Father: ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
Colors Marathi Serials: स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
CID Fame Actor Vivek: CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Supriya Sule: काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
Embed widget