एक्स्प्लोर

'देवमाणूस'मध्ये झळकणार महेश मांजरेकर, रेणुका शहाणेंची जोडी; 25 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला

Marathi Movie DevManus: देवमाणूस या चित्रपटामध्ये कॉन्ट्रास्टींग कॅरेक्टर्स आणि उत्कृष्ट अभिनयासह, अविश्वसनीय कलाकार आहेत.

Marathi Movie DevManus: 'देवमाणूस' हा नव्या वर्षातील सर्वाधिक प्रतिक्षीत मराठी चित्रपटांपैकी एक आहे, हा बहुप्रतीक्षित सिनेमा 25 एप्रिल 2025 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तू झुठी मैं मकार, दे दे प्यार दे, मलंग, सोनू के टीटू की स्वीटी, आणि वध यांसारख्या ब्लॉकबस्टर सिनेमा बनवणारे पॉवरहाऊस म्हणजेच लव रंजन आणि अंकुर गर्ग यांचा लव फिल्म्स हा प्रोडक्शन हाऊस या मराठी सिनेमाची निर्मिती करत आहे. तेजस देऊस्कर दिग्दर्शित 'देवमाणूस' हा एक मल्टिस्टारर सिनेमा आहे, ज्यामध्ये अभिनेते महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक नवी आणि आकर्षक कथा घेऊन येणार आहे हे नक्की.
 
देवमाणूस या चित्रपटामध्ये कॉन्ट्रास्टींग कॅरेक्टर्स आणि उत्कृष्ट अभिनयासह, अविश्वसनीय कलाकार आहेत. आतापर्यंत निर्मित केलेल्या हिंदी सिनेमांच्या यशापलीकडे जाऊन लव फिल्म्स मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत, प्रॉडक्शन हाऊसची सर्जनशील क्षितिजे वाढवतो आहे हे मात्र खरय. यंदा प्रेक्षकांना, मराठीशी जोडलेला अस्सल अनुभव देऊन, या प्रदेशातील परंपरा, संस्कार आणि मूल्ये समोर आणून लव्ह फिल्म्स काहीतरी वेगळं देणार आहे.


देवमाणूस'मध्ये झळकणार महेश मांजरेकर, रेणुका शहाणेंची जोडी; 25 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला
 
देवमाणूसबद्दल बोलताना दिग्दर्शक तेजस देऊस्कर म्हणतात, “देवमाणूस प्रेक्षकांना वेग वेगळ्या भावनांचा अनुभव देईल. महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ सारखे उत्तम कलाकार ह्यात आहेत ज्यामुळे चित्रपटात असलेली पात्र मी पडद्यावर अक्षरशः जिवंत करू शकलो आहे. आम्ही निर्माण केलेले हे जग प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी मी उत्सुक आहे.”
 
लव फिल्म्सच्या मराठी चित्रपटसृष्टीतील उपक्रमाबद्दल बोलताना, निर्माते लव रंजन म्हणाले, "महाराष्ट्राचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, कला, संगीत आणि कथाकथनाने पिढ्यान पिढ्या प्रेक्षकांना प्रेरणा दिली आहे. मराठी चित्रपटांच्या या जगात पाऊल ठेवताना आम्हाला आनंद होत आहे. देवमाणूस हा पहिला मराठी चित्रपट आम्ही निर्मित केला असून या मराठी परंपरेला आमची आदरांजली आहे. हा या मराठी भूमीचा आणि तिथल्या लोकांच्या भावनेचा उत्सव आहे."
 
इतकंच नव्हे तर निर्माते अंकुर गर्ग सांगतात, "लव फिल्म्समध्ये, आम्ही प्रेक्षकांना कथा सांगण्याचे प्रयत्न करतो जे खोलवर त्यांच्याशी जोडलेल्या असतात. देवमाणूस सारख्या सिनेमा सोबत मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश करणे हा आमच्यासाठी एक रोमांचक नवीन अध्याय आहे. हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीतील आकर्षक कथा, बारकावे आणि समृद्ध वारशाचा गौरव करतो पण सर्व काही अस्सल मुळाशी जोडून. महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे, सिद्धार्थ बोडके यांसारख्या कलाकार आणि तेजस यांच्या दिग्दर्शनाच्या उल्लेखनीय प्रतिभेने आम्ही एकत्रितपणे एक अविस्मरणीय अनुभव देण्याचे वचन देतो जो प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने गुंतवेल."
 
दरम्यान, लव फिल्म्स हे लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी 2012 मध्ये स्थापन केलेले एक भारतीय चित्रपट निर्मिती प्रोडक्शन हाऊस आहे जे आकर्षक चित्रपट तयार करण्यासाठी आणि वितरित करण्यासाठी समर्पित आहे. लव फिल्म्सने विविध प्रकारच्या व्यावसायिक ब्लॉकबस्टर आणि समीक्षकांनी प्रशंसित चित्रपटांची निर्मिती केली आहे, ज्यात छलांग, कुत्ते, वाइल्ड वाइल्ड पंजाब यांचा समावेश आहे. कंपनीच्या आगामी प्रकल्पांमध्ये बहुप्रतिक्षित दे दे प्यार दे 2, सौरव गांगुलीवरील बायोपिकचा आणि इतर अनेक चित्रपटांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Sai Tamhankar: व्हर्सेटाइल अभिनेत्री सई ताम्हणकर होणार पायलट; नव्या करिअरसाठी प्रशिक्षणाची आव्हानात्मक सुरुवात

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dhurandhar: 'धुरंधर' फेम राकेश बेदींनी नाकारला होता आदित्य धरचा 'हा' सुपरहिट सिनेमा, मुलीच्या प्रेमामुळे..नेमका किस्सा काय?
'धुरंधर' फेम राकेश बेदींनी नाकारला होता आदित्य धरचा 'हा' सुपरहिट सिनेमा, मुलीच्या प्रेमामुळे..नेमका किस्सा काय?
Aneet Padda: माझ्या आयुष्यातील एकमेव प्रेम..; 'सैयारा' फेम अभिनेत्रीने खास व्यक्तीला गमावले, पोस्ट शेअर करुन दु:ख व्यक्त
माझ्या आयुष्यातील एकमेव प्रेम..; 'सैयारा' फेम अभिनेत्रीने खास व्यक्तीला गमावले, पोस्ट शेअर करुन दु:ख व्यक्त
जमलं ! लोकप्रिय अभिनेत्रीची मालिकेतील हिरोसोबतचं जमली जोडी; राजकीय नेत्याशी जवळचा संबंध
जमलं ! लोकप्रिय अभिनेत्रीची मालिकेतील हिरोसोबतचं जमली जोडी; राजकीय नेत्याशी जवळचा संबंध
Namita Thapar: नमाजचे फायदे सांगणं भोवलं, शार्क टँक फेम नमिता थापर ट्रोल; सडेतोड उत्तर देत म्हणाली..
नमाजचे फायदे सांगणं भोवलं, शार्क टँक फेम नमिता थापर ट्रोल; सडेतोड उत्तर देत म्हणाली..

व्हिडीओ

Praful Patel Baramati Speech : बारामतीमधील सभेसाठी मी पवारसाहेबांचा मेसेज; प्रफुल पटेलांनी सांगता सभेत सांगितलं, रोहित पवारांबद्दलही बोलले
Devendra Fadnavis Speech Baramati : ...तर आपण करंटे ठरू, देवेंद्र फडणवीसांचं बारामतीकरांना आवाहन
Sunetra Pawar Speech Baramati : दादांच्या अपघातावर पहिल्यांदाच शंका, मुख्यमंत्र्यांसमोर भावूक भाषण
Uddhav Thackeray Speech : आम्ही हिंदू!आमचे बुरखे काय फाडणार? उद्धव ठाकरेंचं मुंबईत रोखठोक भाषण
Supriya Sule speech Baramati : सुनेत्रा पवारांच्या प्रचारसभेत कंठ दाटला, सुप्रिया सुळेंचं UNCUT भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Home Loan : 50 लाख रुपयांचं गृहकर्ज घेतल्यानंतर परतफेड करताना व्याजाचे 13 लाख कसे वाचवायचे? जाणून घ्या फॉर्म्युला
50 लाख रुपयांचं गृहकर्ज घेतल्यानंतर परतफेड करताना व्याजाचे 13 लाख कसे वाचवायचे? जाणून घ्या फॉर्म्युला
परभणीत धक्कादायक घटना, महिला अन् पुरुषाने शेतात संपवलं जीवन; 8 दिवसांनंतर समोर आलं प्रकरण
परभणीत धक्कादायक घटना, महिला अन् पुरुषाने शेतात संपवलं जीवन; 8 दिवसांनंतर समोर आलं प्रकरण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 एप्रिल 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 एप्रिल 2026 | मंगळवार
आजपासून जमिनीची NA प्रक्रिया सुलभ; बीपीएमएस प्रणालीचे लोकार्पण, ऑनलाइन अधिमूल्य भरण्याची सुविधा सुरू
आजपासून जमिनीची NA प्रक्रिया सुलभ; बीपीएमएस प्रणालीचे लोकार्पण, ऑनलाइन अधिमूल्य भरण्याची सुविधा सुरू
बारामतीच्या सांगता सभेवेळी शरद पवारांचं अचूक टायमिंग; रुग्णालयातून भावनिक आवाहन, 1967 पासूनचा उल्लेख
बारामतीच्या सांगता सभेवेळी शरद पवारांचं अचूक टायमिंग; रुग्णालयातून भावनिक आवाहन, 1967 पासूनचा उल्लेख
Mutual Fund : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात? दुर्लक्ष केल्यास मोठं नुकसान होण्याचं संकट, जाणून घ्या
म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात? आर्थिक नुकसान टाळण्यासाठी नेमकं काय करावं?
Video: ...तर आपण करंटे ठरू, देवेंद्र फडणवीसांचं बारामतीकरांना आवाहन; म्हणाले, अजित दादांच्या स्मृतीयज्ञात आहुती द्यायचीय
Video: ...तर आपण करंटे ठरू, देवेंद्र फडणवीसांचं बारामतीकरांना आवाहन; म्हणाले, अजित दादांच्या स्मृतीयज्ञात आहुती द्यायचीय
Crime News : लग्नानंतर लगेचच छळ; विभक्त झालेल्या पत्नीच्या परिवाराला संपवण्याचा कट, मीठ, मसाल्यात विष, सासूचा मृत्यू अन्...; नखांवरील पांढऱ्या रेषांनी गूढ उकललं
लग्नानंतर लगेचच छळ; विभक्त झालेल्या पत्नीच्या परिवाराला संपवण्याचा कट, मीठ, मसाल्यात विष, सासूचा मृत्यू अन्...; नखांवरील पांढऱ्या रेषांनी गूढ उकललं
Embed widget