Mahesh Babu's House Price: दक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूच्या घराची किंमत ऐकून बसेल धक्का
Mahesh Babu's House Price: दक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू (Mahesh Babu) यांची दिग्गज कलाकारांमध्ये गणना केली जाते. त्याची स्टाइल आणि अभिनयानं अनेकांच्या मनात घर केलंय.
Mahesh Babu's House Price: दक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू (Mahesh Babu) यांची दिग्गज कलाकारांमध्ये गणना केली जाते. त्याची स्टाइल आणि अभिनयानं अनेकांच्या मनात घर केलंय. त्यांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. महेश बाबू त्याच्या उत्कृष्ट अभिनयासोबतच अलिशान जीवनशैलीसाठीही प्रसिद्ध आहे. दरम्यान, कोरोनामुळं लागलेल्या लॉकडाऊनदरम्यान महेश बाबू त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवत होता. त्यावेळी त्यानं सोशल मीडियावर त्याच्या अलिशान घराचे अनेक फोटो शेअर केले होते. महेश बाबूचे घर पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. महेश बाबूच्या या घराची किंमत ऐकून आता सर्वांनाच धक्का बसणार आहे.
महेश बाबूचे घर हैदराबाद येथे आहे. मीडियाच्या रिपोर्टनुसार, त्याच्या या घराची किंमत तब्बल 60 कोटी इतकी आहे. त्याच्या घरात सर्व सुखसोयी आहेत, ज्याची आपण कल्पना सामान्य माणूस करू शकत नाही. त्याच्या घरात होम थिएटर, जिम, स्विमिंगपूल यांसारख्या अत्याधुनिक सुविधा आहेत. या घरात महेश बाबू त्याची पत्नी नम्रता शिरोडकर आणि मुले गौतम आणि सितारासोबत राहतो. महेश बाबूच्या घराची आणखी एक खास गोष्ट म्हणजे या घराच्या भिंतींवर आर्टवर्क करण्यात आलंय.
दरम्यान, महेश बाबूने काही दिवसांपूर्वी बाहुबली फेम दिग्दर्शक एसएस राजामौलीसोबत चित्रपट करण्याची घोषणा केली होती. यानंतर साऊथ इंडस्ट्रीत खळबळ उडाली. महेश बाबूचे प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवा रेकॉर्ड बनवतो. फोर्ब्सला दिलेल्या एका मुलाखतीत महेश बाबूने एसएस राजामौलीसोबत चित्रपट करण्याबद्दलचा आनंद व्यक्त केला होता. याशिवाय, त्याने अनेक गोष्टींवर भाष्य केले. “मला नेहमीच योग्य चित्रपट योग्य वेळी करायचे होते. मग तो हिंदी चित्रपट असला तरी चालेल. माझा पुढचा चित्रपट एसएस राजामौली सरांसोबत आहे आणि तो अनेक भाषांमध्ये बनवला जाईल, असं त्याने म्हटलं होते.
सन 1983 साली 'पोरातम' या चित्रपटातून बाल भूमिकेच्या माध्यमातून महेश बाबूने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. त्यानंतर 1999 साली 'राजा कुमारुदु' या चित्रपटातून पहिल्यांदा मुख्य भूमिका साकारली.