Dattu More Welcomes Baby: हास्यजत्रा फेम दत्तू मोरेच्या घरी पाळणा हलला, चिमुकल्या पावलांनी नवा पाहुणा आला; पाहा PHOTO
Dattu More Welcomes Baby Boy: दत्तू मोरेनं इन्स्टाग्रामवर बाळासोबतचे फोटो शेअर करत चाहत्यांना गूड न्यूज दिली आहे. लग्नानंतर दोन वर्षांनी दत्तू मोरेच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं.

Maharashtrachi Hasya Jatra Star Dattu More Welcomes Baby Boy: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasya Jatra) कार्यक्रमातून सर्वांना खळखळून हसवणाऱ्या अगदी सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या दत्तू मोरेनं (Dattu More) आपल्या चाहत्यांना गूड न्यूज (Good News) दिली आहे. दत्तू मोरच्या घरात पाळणा हलला असून त्याला पुत्रप्राप्ती झाली आहे. स्वतः दत्तू मोरेनं इन्स्टाग्रामवर बाळासोबतचे फोटो शेअर करत चाहत्यांना गूड न्यूज दिली आहे. लग्नानंतर दोन वर्षांनी दत्तू मोरेच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं. त्यामुळे दत्तू मोरेच्या आयुष्यात आनंदाचा बहर आलाय.
अभिनेता दत्तू मोरेला मुलगा झाला असून त्यानं इन्स्टाग्रामवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. दत्तूने इन्स्टाग्रामवर आपल्या बाळासोबतचा फोटो शेअर करुन बााची झलकही चाहत्यांसोबत शेअर केली आहे. दत्तू मोरेच्या या फोटोंवर कमेंट्स करत चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दत्तूनं आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करताना सुरुवातीला आपल्या बायकोसोबत फोटो शेअर केले आहेत. दत्तू आणि त्याच्या बायकोचे फोटो हे प्रेग्नेंसी शूट दरम्यानचे आहेत. तसेच, या फोटोंसोबत दत्तूनं आपल्या गोंडस नव्या पाहुण्याचे दोन सुंदर फोटो शेअर केलेत.
एका फोटोमध्ये दत्तू मोरे आणि त्याच्या पत्नीनं एकमेकांच्या हातावर हात ठेवला असून त्यांच्या हातांवर बाळाचा इवलासा हात आहे. हा परफेक्ट फॅमिली फोटो दोघांनी शेअर केला आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये दत्तूचं बोट त्याच्या लाडक्या लेकानं घट्ट पकडल्याचं दिसतंय.
View this post on Instagram
दत्तू मोरेनं आपल्या चिमुकल्यासोबतचा गोंडस फोटो शेअर करुन एक क्युट कॅप्शनही दिलं आहे. त्यानं या फोटोवर कॅप्शन देत लिहिलंय की, "फायनली… तो आला! We now officially have a tiny human to blame. माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण… मी सदैव कृतज्ञ आहे." दत्तू मोरेच्या या पोस्टवर त्याच्या सहकलाकारांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तसेच, दत्तू आणि त्याच्या बायकोला शुभेच्छाही दिल्या आहेत.
दत्तूची फिल्मी लव्हस्टोरी
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम दत्तू मोरेनं आपल्या विनोदी शैलीनं अवघ्या महाराष्ट्राची मनं जिंकली आहेत. याच दत्तू मोरेनं 2023 मध्ये आपली लग्नगाठ बांधली. त्यानं डॉक्टर स्वाती घुनागेसोबत संसार थाटला. स्वाती पेशानं डॉक्टर असून स्त्रीरोगतज्ज्ञ आहे. पण, दत्तू आणि स्वातीची लव्हस्टोरी हटके आणि तितकीच भन्नाट आहे. दत्तू व स्वातीची भेट साधारण पाच ते सहा वर्षांपूर्वी एका मित्रामुळे झाली. या भेटीनंतर दोघं एकमेकांशी बोलू लागले. स्वाती दत्तूच महाराष्ट्राची हास्य जत्रा मधलं स्कीट पाहायची. त्याबद्दल तिनं त्याला फेसबुकवर मेसेजसुद्धा केलेले. पुढे दोघांमध्ये मैत्री झाली, मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यानंतर दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले.























