एक्स्प्लोर

Maharashtra Epstein Files Swaroop sawant: रुपाली चाकणकरांनी धाडली नोटीस, 'महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स' च्या दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमच्यावर दड'पण'

Maharashtra Epstein Files: दिग्दर्शक स्वरुप सावंत यांनी हा चित्रपट सामाजिक प्रबोधनासाठी असून, कुणाचीही मानहानी करण्याचा हेतू नसल्याचे स्पष्ट केलं आहे.

Maharashtra Epstein Files Swaroop Sawant:  स्वरुप सावंत (Swaroop Sawant) दिग्दर्शित 'महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स' (Maharashtra Epstein Files) सध्या प्रचंड चर्चेत आहे. या सिनेमाचा टीझर रिलीज होताच वादाच्या भोवऱ्यात अडकला. सिनेसृष्टीसह राजकीय वर्तुळात या सिनेमाची प्रचंड चर्चा झाली.  दिपाली सय्यद यांचा सिनेमातील फर्स्ट लूक पाहायला मिळाला.  अभिनेत्रीने साकारलेले पात्र महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्याशी साधर्म्य असल्याची चर्चा रंगू लागली. यानंतर रुपाली चाकणकर यांनी कायदेशीर कारवाईचा मार्ग स्विकारत सिनेमाचे दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेत्री दिपाली सय्यद यांना नोटीस पाठवली. नोटीशीतून अब्रुनुकसानीचा दावा करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणावर आता 'महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स' या सिनेमाचे दिग्दर्शक स्वरुप सावंत यांनी प्रतिक्रिया दिलीये. 2 ऑक्टोबरला हा सिनेमा रिलीज होणार, असं त्यांनी म्हटलं आहे.

'महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स' सिनेमाच्या दिग्दर्शकाने नेमकं काय म्हटलं? (Maharashtra Epstien File Director Swaroop Sawant)

'महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स' या सिनेमाचे दिग्दर्शक आणि कलाकारांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या सिनेमाचे 70 टक्के चित्रीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती सिनेमाच्या दिग्दर्शकांनी दिलीये.  हा सिनेमा 2 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार, असंही त्यांनी सांगितलं. मात्र, महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शक , कलाकार आणि तंत्रज्ञांना नोटीस बजावल्यानं, सर्वजण दडपणाखाली आले असल्याचं चित्रपटाचे दिग्दर्शक स्वरुप सावंत यांनी म्हटलं आहे.

'महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स'  या सिनेमाचे दिग्दर्शक स्वरुप सावंत म्हणाले, 'आम्हाला या सिनेमाला थांबवण्याच्या संबंधित कायदेशीर मानहानीची नोटीस पाठवण्यात आली होती.  चित्रपटाचं शूट आम्ही थांबवलेलं नाहीये. सिनेमा चालू राहणार आहे. 2 ऑक्टोबरला हा सिनेमा रिलीज होणार, हे नक्की', असं पत्रकार परिषदेत स्वरुप सावंत यांनी म्हटलं आहे. 'आम्ही सामाजिक प्रबोधनासाठी हा सिनेमा करतो आहे.   कुणाचीही मानहानी करण्यासाठी हा सिनेमा करत नाहीये.  आम्ही देखील कलाकार आहोत. समाजाला संदेश देण्यासाठी आम्ही चित्रपट करतो', असंही स्वरुप सावंत यांनी म्हटलं.

'हा सिनेमा Inspired by true event नाहीये.   ज्या गोष्टी समाजात घडतात.  त्या गोष्टींना धरुन आम्ही सिनेमा तयार करुन प्रबोधन करत असतो. आमचा सिनेमा 100 टक्के 2 ऑक्टोबरला सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार.  काही नोटीस आली तर आमची Legal टीम आहे, ती उत्तर देईल', असंही स्वरुप सावंत म्हणाला. सिनेमाची कथा लिहिणारे सागर जैन आणि निर्माते देवेंद्र भट हे देखील या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. तर अभिनेत्री दिपाली सय्यद या पत्रकार परिषदेत ऑनलाईन उपस्थित होत्या .

महत्त्वाच्या इतर बातम्या:

बाबांपासून विभक्त, आईच्या वागण्यात रहस्यमय बदल अन्... 'ही' हॉरर फिल्म एकट्याने पाहू नका, अंगावर काटा अन्...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satluj: रिलीजनंतर 48 तासांत हटवला; ‘सतलज’च्या नुकसानभरपाईसाठी गुरुद्वारांनी उचललं मोठं पाऊल! दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
रिलीजनंतर 48 तासांत हटवला; ‘सतलज’च्या नुकसानभरपाईसाठी गुरुद्वारांनी उचललं मोठं पाऊल! दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
Dashmi Marathi Movie Poster: महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
OTT Webseries: 7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
Advertisement

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget