महाकुंभतील सुंदर साध्वी हर्षा रिछारियाशी लग्न करणार बागेश्वर बाबा? साध्वीच्या Viral प्रपोजलवर बाबा म्हणाले...
Baba Bageshwar On Harsha Richhariya: महाकुंभ 2025 हा बराच चर्चेचा विषय राहिला आहे आणि तो उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथे आयोजित करण्यात आला आहे.
Baba Bageshwar On Harsha Richhariya: सध्या प्रयागराजमध्ये (Prayagraj) महाकुंभ मेळा (Maha Kumbh Mela) सुरू आहे. देश-विदेशातून साधू-संतांनी यावेळी प्रयागराजमध्ये हजेरी लावली आहे. महाकुंभ सुरू होऊन 9 दिवस झाले आहेत. या काळात सुमारे 9 कोटी लोकांनी त्रिवेणी संगमात स्नान केलं आहे. 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीत चालणाऱ्या महाकुंभात एकूण 6 स्नानगृहे आहेत, त्यापैकी तीन अमृत स्नान आहेत. तीन अमृत स्नानांपैकी एक आधीच झालं आहे, ज्यामध्ये सुमारे साडेतीन कोटी लोकांनी भाग घेतला होता. पण, यंदाच्या महाकुंभमध्ये सहभागी झालेले काही सन्यासी मात्र सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनत आहेत.
महाकुंभ 2025 हा बराच चर्चेचा विषय राहिला आहे आणि तो उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथे आयोजित करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाकुंभ मेळ्यासाठी अनेक ऋषी आणि संत देखील पोहोचले आहेत. साधू-संतांच्या मेळ्यामध्ये पुरूष संतांसोबतच महिला संतही सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी महाकुंभमेळ्यात सहभागी झालेली साध्वी हर्षा रिचारिया व्हायरल झाली आहे. महाकुंभमधील सर्वात सुंदर साध्वी म्हणून तिचे फोटो सध्या व्हायरल केले जात आहेत.
महाकुंभ मेळ्यातील हर्षा रिचारिया तिच्या सौंदर्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली. होस्ट असण्यासोबतच ती एक मॉडेल देखील आहे. पण सद्धा साध्वी हर्षा एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. बाबा बागेश्वर यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये असा दावा केला जात आहे की, साध्वी हर्षा हिनं बाबा बागेश्वरला लग्नाची मागणी घातली आहे.
साध्वी हर्षा रिचारियाची बागेश्वर बाबांना लग्नाची मागणी?
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये बाबा बागेश्वर काहीसे वैतागलेले पाहायला मिळत आहेत. त्यांच्या हातात मोबाईल आहे आणि ते बागेश्वर धामचं ऑफिशिअल युट्यूब चॅनलवरची कमेंट वाचत असल्याचं सांगत आहेत. बाबा बागेश्वर यांनी सांगितलं की, "एक विचित्र कमेंट माझ्याकडे आली आहे आणि त्यामध्ये लिहिलं आहे की, मी तुमच्याशी लग्न करण्यासाठी प्रस्ताव मांडला होता, माझ्या स्वप्नात बालाजी आला होता, मग मी तुमचा होकार समजू?"
View this post on Instagram
साध्वी हर्षा रिचारियाला बागेश्वर बाबांचा होकार?
कमेंट वाचून बागेश्वर बाबा वैतागतात आणि पुढे सांगतात की, "अजिबात होकार समजू नका ताई.... राखी ठेवून घ्या, रक्षाबंधनला नक्की भेटायला या... वेलकम टू यू... तुम्हाला लाज वाटत नाही की, मनात आलं म्हणून बागेश्वर धामसारख्या ऑफिशिअल अध्यात्मिक चॅनलवर अशी कमेंट करता... जर मला लग्नच करायचं असेल, तर आम्ही युट्यूबवरुन थोडीच करणार आहोत. आम्ही माता जींच्या आज्ञेनं लग्न करू..."
दरम्यान, आता असा दावा केला जात आहे की, ही कमेंट महाकुंभ मेळ्यातून व्हायरल झालेल्या हर्षा रिछारिया हिनं केली होती. पण, हा व्हिडीओ एडिट करण्यात आलेला असून खरा व्हिडीओ नाही. लोक या व्हिडीओवर सतत कमेंट करताना दिसत आहेत आणि हा व्हिडीओ पूर्णपणे खोटा असल्याचं सांगत आहेत.