Madhuri Dixit : धक धक गर्ल माधुरीने फक्त एकाच वाक्यात राजकारणातील धक धक वाढवली!
भाजपने जाहीर केलेल्या यादीत अनेक सेलिब्रिटींना उमेदवारी देण्यात आली आहे. यातच आता धकधक गर्ल माधुरी दीक्षित यांनीदेखील लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरुन मोठं विधान केलं आहे.

पिंपरी-चिंचवड, पुणे : सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीच्या चर्चा (Loksabha Election 2024) सुरु आहे. त्यात भाजपने जाहीर केलेल्या यादीत अनेक सेलिब्रिटींना उमेदवारी देण्यात आली आहे. यातच आता धकधक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) यांनीदेखील लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरुन मोठं विधान केलं आहे. भाजपची ऑफर आहे का?, असं विचारल्यावर माधुरी दीक्षित यांनी ऑफर असली तरी तुम्हाला का सांगू असं म्हणत राजकारणात येणार की नाही या चर्चांचा सस्पेंस कायम ठेवला आहे. माधुरी दीक्षित पिंपरी-चिंचवडमधील निगडीतील पीएनजी ज्वेलर्सच्या नवीन दालनाचे उद्घाटनासाठी आल्या होत्या.
मी कलाकार आहे.माझी जी कला आहे, त्याच्यात माझा जम आहे. राजकारण ही माझी वृत्ती नाही. माझे ते क्षेत्र नाही, असं त्या कायम म्हणत असतात मात्र यावेळी पुण्यातील पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना माधुरी दीक्षितांनी अनेकांना विचार करायला भाग पाडलं आहे. अभिनय क्षेत्रात तर करतातच मात्र राजकारणात येणार का?, असा प्रश्न विचारल्यावर माधुरी दीक्षित म्हणाल्या की, याबाबत मला खूपवेळा विचारले जाते. मी एक कलाकार आहे. कला हे माझे क्षेत्र आहे. त्यात मला रस आहे. राजकारण माझे क्षेत्र नाही. लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी भाजपकडून ऑफर आहे का, असे विचारले असता ‘मी ते तुम्हाला का सांगू’ असं म्हणत त्यांनी शांतता पाळली आहे.
सध्या राज्यात लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची प्रत्येक पक्षाकडून चाचपणी सुरु आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होणार आहे. दोन्ही आघाडीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, यासाठी अनेक बैठका घेतल्या जात आहे. आपल्या पक्षाला जास्त जागा मिळाव्या यासाठी प्रत्येक पक्षाचे नेते प्रयत्न करताना दिसत आहे. त्यातच आघाडीतील काही पक्षांमध्ये काही मतदारसंघाच्या जागेवरुन रस्सीखेच पाहायला मिळत आहे. त्यातच भाजप अभिनेते, अभिनेत्री यांना लोकसभा निवडणुकीत उतरविणार असल्याची चर्चा आहे. मुंबईतील एका जागेवर माधुरी दीक्षितला निवडणुकीत उतरविण्यात येणार असल्याचे सांगितलं जात आहे.
भाजपच्या पहिल्या यादीत अभिनेत्री हेमा मालिनी स्मृती इराणी तसेच अभिनेता रवी किशन आणि मनोज तिवारी यांची नावं या यादीत जाहीर करण्यात आली आहेत. अभिनेत्री हेमा मालिनी या मथुरा लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणार आहेत. स्मृती इराणी या अमेठी या मतदारसंघातून आगामी निवडणूक लढवणार आहेत. तसेच गोरखपूरमधून रवी किशन यांना तिकीट देण्यात आलंय. अभिनेते मनोज तिवारी यांना उत्तर पूर्व दिल्लीतून उमेदवारी देण्यात आली आहे.
इतर महत्वाची बातमी-
























