Lok Sabha Result 2024 : यंदा निवडणुकीसाठी कल्याणची निवड, श्रीकांत शिंदेंसमोर दंड थोपटणाऱ्या अभिजित बिचुकलेंना किती मतं मिळाली?
Lok Sabha Result 2024 : अभिजीत बिचुकले यांनी यंदा कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. आतापर्यंतच्या कलानुसार, त्यांना 700 च्या पुढे मतं पडली आहे.
Lok Sabha Result 2024 : अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) हे यंदा कल्याण लोकसभा मतदारसंघातून मैदानात होतं. दरम्यान याच मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे हे देखील मैदानात होते. त्यांच्यासमोर ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर या मैदानात होत्या. पण यामध्ये विशेष लक्ष वेधून घेतलं ते अभिजीत बिचुकले यांच्या उमेदवारीने. दरम्यान आतापर्यंतच्या कलानुसार, अभिजीत बिचुकले यांना आतापर्यंत 900 च्या पुढे मतं पडली आहेत.
दरम्यान अभिजीत बिचुकले यांनी यंदा देखील कल्याणमधून विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता. पण यंदा देखील त्यांचं हे स्वप्न अधुरच राहणार असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे यानंतर अभिजीत बिचुकले काय प्रतिक्रिया हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अनेक निवडणुका लढवल्या, डिपॉझिट म्हणून हजारोंचे चिल्लर भरले
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी आजवर अनेक निवडणुका लढवल्या आहेत. आपल्या वेगवेगळ्या स्टंट आणि वक्तव्याने ते कायम चर्चेत असतात. साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांनाही त्यांनी निवडणुकीच्या माध्यमातून अनेकदा खुलं आव्हान दिलं आहे. अनेक निवडणुका लढवल्या असल्या तरी बिचुकलेंना अद्याप यश आलेलं नाही. '2019 चा मुख्यमंत्री मीच ठरवणार', असं बेधडक वक्तव्यही त्याने केलं होतं. गेल्या लोकसभा निवडणुकीत बिचुकले यांनी अपक्ष अर्ज दाखल करत अनामत रक्कम म्हणून 12 हजार 500 रुपयांची चिल्लर जमा केली होती.
महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री ही आपली पत्नी, अलंकृता बिचुकले असेल असं वक्तव्य केल्याने अभिजीत बिचुकले चर्चेत आले होते. आपल्यासोबत जो येईल त्याला आपण राज्याचा उपमुख्यमंत्री करणार अशीही ऑफर त्यांनी दिली होती.
शिवरायांच्या विचारांचा खरा वारसदार असल्याचा दावा
शिवाजी महाराजांच्या विचारांचे खरे वारसदार आपणच असल्याचा दावा अभिजीत बिचुकले यांनी अनेकदा केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वैचारिक वारस म्हणून माझ्या पाठीशी उभे राहा असं आवाहन बिचुकलेंनी केले आहे.विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव संसद भवनला द्या अशी मागणी अभिजीत बिचुकले यांनी केली होती.
ही बातमी वाचा :
Lok Sabha Result 2024 : स्मृती इराणींच लोकसभेतील आव्हान शमणार? 54 हजार मतांनी पिछाडीवर