(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lochya Zala Re : आता परदेशातही होणार 'लोच्या' ; यु.एस, यु.ए.ई सह अनेक देशांमध्ये 'लोच्या झाला रे' होणार प्रदर्शित
'लोच्या झाला रे' (Lochya Zala Re) हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता
Lochya Zala Re : काही सिनेमे हे केवळ त्या सिनेमातील कलाकारांसाठीच पाहायचे असतात. त्या सिनेमातील कलाकारांचा कल्ला इतका मनोरंजक असतो की, सिनेमा पाहता पाहता त्या पडद्यावरील कल्ल्यात प्रेक्षकही सहभागी होऊन जातो. असाच एक चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. पारितोष पेंटर आणि रवी अधिकारी दिग्दर्शित 'लोच्या झाला रे' (Lochya Zala Re) हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांना भरभरून हसवले. अवघ्या महाराष्ट्रात असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आता अंकुश चौधरी (Ankush Chaudhari), सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav), सयाजी शिंदे, वैदेही परशुरामी(Vaidehi Parshurami), विजय पाटकर, प्रसाद खांडेकर, रेशम टिपणीस आता परदेशातही लोच्या करायला जाणार आहेत. परदेशातील प्रेक्षकांच्या मागणीनंतर आता 'लोच्या झाला रे' हा चित्रपट परदेशातही प्रदर्शित होणार आहे.
आदी, मानव, डिंपल आणि काका यांच्यात चाललेला गोंधळ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. आता हा लोच्या नक्की कोणाच्या आयुष्यात होतोय, हे मात्र चित्रपट पाहिल्यावरच कळेल. धमाल मस्ती आणि प्रेक्षकांना मनमुराद हसवणाऱ्या या चित्रपटाला रसिकप्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. हा चित्रपट इतका हिट ठरला की, परदेशातही हा चित्रपट प्रदर्शित करावा, अशी मागणी परदेशातील मराठी प्रेक्षकांकडून होऊ लागली. त्यामुळे ‘लोच्या झाला रे’ यु.एस, यु.ए. ई.सह अन्य देशांमध्ये तीसहून अधिक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता ही सगळी टीम परदेशातही कल्ला करणार आहे. या यशाबद्दल दिग्दर्शक पारितोष पेंटर म्हणतात, ‘’महाराष्ट्रात प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाल्यानंतर आता ‘लोच्या झाला रे’ परदेशवारी करणार आहे. आम्हाला अतिशय आनंद होतोय की, परदेशी प्रेक्षकांनी या चित्रपटाला पसंती दर्शवली आहे.’’ तर मुंबई मुव्ही स्टुडिओजचे नवीन चंद्रा म्हणतात, ‘’हा चित्रपट प्रेक्षकाचे मनोरंजन करण्यात यशस्वी झाला आहे आणि त्यामुळेच हा चित्रपट परदेशात प्रदर्शित करण्याची मागणी होत आहे. या परदेशी प्रेक्षकांचा मान राखत आम्ही ‘लोच्या झाला रे’ तिथे प्रदर्शित करण्याचा निर्णय घेत आहोत. आम्हाला आशा आहे की, तेथील प्रेक्षक असेच भरभरून प्रेम देतील.’’
लंडनमध्ये चित्रित झालेला हा चित्रपट मुंबई मुव्ही स्टुडिओज प्रस्तुत आयडिया दी एन्टरटेन्मेंट कंपनी व अभिनय मुंबई प्रोडक्शन अंतर्गत बनवण्यात आला असून नवीन चंद्रा, नितीन केणी, पारितोष पेंटर आणि शांताराम मनवे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर मंगेश जगताप कार्यकारी निर्माता आहेत. या चित्रपटाच्या छायाचित्रणाची धुरा संजय मेमाणे यांनी सांभाळली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Lochya Zala Re : आयुष्यात प्रेमाचे रंग उधळणार 'मेरी गो राऊंड' ; 'लोच्या झाला रे' मधील गाणे प्रदर्शित
-
Rannvijay Singh : 18 वर्षानंतर रणविजय 'रोडीज'मधून 'आऊट'; सांगितलं हे कारण
Gulhar : 'लहर आली, लहर आली गं...'; अजय गोगावलेचं धमाकेदार नवं गाणं
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha