एक्स्प्लोर

Lochya Zala Re : आयुष्यात प्रेमाचे रंग उधळणार 'मेरी गो राऊंड' ; 'लोच्या झाला रे' मधील गाणे प्रदर्शित

'लोच्या झाला रे' (Lochya Zala Re) या चित्रपटातील 'मेरी गो राउंड' (Merry Go Round) हे गाणे नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे.

Lochya Zala Re : प्रेक्षक ज्यासाठी उत्सुक आहेत असा बहुचर्चित तुफान विनोदी चित्रपट 'लोच्या झाला रे' (Lochya Zala Re) या चित्रपटातील 'मेरी गो राउंड' (Merry Go Round) हे गाणे नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे आणि त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असतानाच आता ‘लोच्या झाला रे’ मधील 'मेरी गो राऊंड’हे मजेदार गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्यात सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav),अंकुश चौधरी (Ankush Chaudhari)आणि वैदेही परशुरामी (Vaidehi Parshurami) तुफान मस्ती करताना दिसत आहेत. या  गाण्यात सिद्धार्थ, अंकुश,वैदेही लंडनमधील निसर्गरम्य ठिकाणी आनंद लुटताना दिसत आहेत तर एका बाजूला प्रेमाचे रंगही उधळताना दिसत आहेत. तिघेही लंडनची सैर करतानाच स्थानिक लोकांची मजा घेतानाही पाहायला मिळत आहेत.

'मेरी गो राऊंड' हे गाणे उत्साहाने, आनंदाने भरलेले आहे. सकारात्मक दृष्टीकोन आयुष्यात किती महत्वाचा हे अधोरेखित करणारे हे गाणे आहे. तरूणांना भुरळ घालणारे हे गाणे मंदार चोळकर यांनी लिहले असून चिनार महेश या गाण्याचे संगीतकार आहेत तर अपेक्षा दांडेकर, हर्षवर्धन वावरे यांचा या गाण्याला आवाज लाभला आहे.  4 फेब्रुवारी रोजी 'लोच्या झाला रे' चित्रपटगृहात प्रदर्शित  होणार आहे . 

'लोच्या झाला रे' या चित्रपटाचे दिग्दर्शन पारितोष पेंटर आणि रवी अधिकारी यांनी  केले असून संजय मेमाणे यांनी छायाचित्रणाची धुरा सांभाळली आहे. नवीन चंद्रा, नितीन केणी, पारितोष पेंटर आणि शांताराम मनवे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे तर मंगेश रामचंद्र जगताप कार्यकारी निर्माता आहेत . लंडनमध्ये चित्रित झालेला हा चित्रपट मुंबई मुव्ही स्टुडिओज प्रस्तुत आयडिया दि एंटरटेनमेंट कंपनी आणि अभिनय मुंबई प्रोडक्शन अंतर्गत बनवण्यात आला असून वितरणाचे काम यूएफओ मुव्हीझने पाहिले आहे.

संबंधित बातम्या

Tu Tevha Tashi : स्वप्नीलचं चाहत्यांना सरप्राईज, जीवलगानंतर आता 'तू तेव्हा तशी' मालिकेत दिसणार

Malaika Arora, Amrita Arora : मलायकाची गर्ल गँग; बर्थडे विश करत बहिणीनं शेअर केला खास फोटो

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?

व्हिडीओ

Zero Hour Full नगराध्यक्षांच्या निकालाचा मनपा मतदानावर परिणाम होईल? मुंबईत महायुतीला कोणाचं आव्हान!
Special Report Manikrao Kokate माणिकराव कोकाटे संकटाच्या चक्रव्यूहात, कोकाटेंचं राजकीय भवितव्य काय?
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
Gold Rate : भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
Nagpur Butibori MIDC : टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
Embed widget