Lata Mangeshkar Songs : 'अजीब दास्तां है ये' ते 'एक प्यार का नगमा', लता मंगेशकरांची 10 सदाबहार गाणी
Lata Mangeshkar Songs : लता मंगेशकर यांचा आवाज ऐकून कधी कुणाच्या डोळ्यात पाणी आले, तर कधी सीमेवर उभ्या असलेल्या जवानांना आधार मिळाला. लतादीदींनी स्वत:ला पूर्णपणे संगीतासाठी वाहून घेतले.
Lata Mangeshkar Songs : लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी अनेक दशकांपासून संगीत जगताला आपल्या सुरेल आवाजाने सजवले आहे. लता मंगेशकर यांचा आवाज ऐकून कधी कुणाच्या डोळ्यात पाणी आले, तर कधी सीमेवर उभ्या असलेल्या जवानांना आधार मिळाला. त्यांच्या आवाजातली शालीनता आणि गोडवा कधीही विरला नाही. त्यांच्या गाण्यांनी नेहमीच श्रोत्यांच्या कानांना मंत्रमुग्ध केले.
- अजीब दास्तां है ये
हे गाणे ‘दिल अपना और प्रीत पराई’ या चित्रपटातील आहे. ‘ट्रॅजेडी क्वीन’ अभिनेत्री मीना कुमारी हिने या गाण्यात आपले अतृप्त प्रेम गमावल्याची व्यथा मांडली आहे.
- लग जा गले
‘वो कौन थी’ या चित्रपटातील या गाण्याच्या सुरात सगळेच हरवून जातात. मनातील इच्छा व्यक्त गायलेले हे गाणे सर्वांनाच आवडते.
- एक प्यार का नगमा
लता मंगेशकरांच्या आवाजाच्या जादूने सजलेले हे गाणे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केले आहे. हे सदाबहार गाणे 1972मध्ये आलेल्या ‘शोर’ या हिंदी चित्रपटातील आहे.
- आजा पिया तोहे प्यार दूं
हे सुंदर गाणे 1967मध्ये आलेल्या राजेश खन्ना या ‘बहारों के सपने’ या चित्रपटातील आहे. हे गाणे राजेश खन्ना आणि आशा पारेख यांच्यावर चित्रित करण्यात आले होते.
- मेरे ख्वाबों में जो आए
शाहरुख खान आणि काजोल यांच्या 1995मध्ये आलेल्या 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या चित्रपटातील हे गाणे प्रत्येक मुलीला आवडणारे होते.
- भींगी भींगी रातों में
‘अजनबी’ चित्रपटाचे हिट गाणे ‘भिगी भींगी रातों में’ त्यांच्या काळातील रोमँटिक गाण्यांच्या यादीत शीर्षस्थानी होते. हे गाणे किशोर कुमार यांच्यासोबत लता मंगेशकर यांनी गायले होते.
- रंगीला रे
1970 मध्ये आलेल्या देवानंद यांच्या ‘प्रेम पुजारी’ या सुपरहिट चित्रपटातील ‘रंगीला रे’ या गाण्याचा व्हिडीओ आजही लोकांच्या हृदयात आहे.
- सलाम ए इश्क़
अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या ‘मुकद्दर का सिकंदर’ या चित्रपटातील ‘सलाम-ए-इश्क’ या गाण्याचे बोल प्रत्येकाच्या मनात घर करून आहेत. लतादीदींचा आवाज आणि रेखाच्या शैलीने गाण्यात वेगळीच नजाकत निर्माण केली.
- परदेसिया ये सच है पिया
अमिताभ आणि रेखा यांच्या सदाबहार जोडीवर चित्रित केलेल्या ‘परदेसिया ये सच है पिया’ या गाण्याला लता मंगेशकर यांनी आवाज दिला. हे गाणे 1979 मध्ये आलेल्या ‘मिस्टर नटवरलाल’ चित्रपटातील आहे.
- सत्यम शिवम सुन्दरम
राज कपूर निर्मित 1978चा सुपरहिट चित्रपट ‘सत्यम शिवम सुंदरम’चे शीर्षक गीत ‘सत्यम शिवम सुंदरम’ हे कोणीही कधीही विसरू शकत नाही. चित्रपट आणि गाणी दोन्ही ब्लॉकबस्टर ठरले होते.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha