Lata Mangeshkar: 13व्या वर्षी पहिलं गाणं गायलं, मधुबाला ते प्रियंका चोप्रापर्यंत अनेक अभिनेत्रींचा आवाज बनल्या लता मंगेशकर!
Lata Mangeshkar : भारतरत्न लता मंगेशकर यांचे वयाच्या 93व्या वर्षी निधन झाले. लता मंगेशकर यांनी आपल्या सुरेल आवाजाने सर्वांना वेड लावले होते.
Lata Mangeshkar : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे आज (6 फेब्रुवारी) सकाळच्या सुमारास निधन झाले. वयाच्या 93व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या. लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लता दीदींच्या प्रकृतीतही सुधारणा होत होती, मात्र शनिवारी प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
लता मंगेशकर यांचे वयाच्या 93व्या वर्षी निधन झाले. लता मंगेशकर यांनी आपल्या सुरेल आवाजाने सर्वांना वेड लावले होते. त्यांना संगीताचा वारसा लाभला होता. भारतरत्न पुरस्कार विजेत्या लता मंगेशकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक भाषांमध्ये 30 हजारांहून अधिक गाणी गायली आहेत.
13व्या वर्षी करिअरची सुरुवात
वयाच्या 13 व्या वर्षी लता मंगेशकर यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. एका मराठी चित्रपटासाठी त्यांनी पहिले गाणे रेकॉर्ड केले होते. लता मंगेशकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत मधुबालापासून ते प्रियंका चोप्रापर्यंत अनेक अभिनेत्रींसाठी गाणी गायली आहेत. त्यांनी अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना आपला आवाज दिला आहे.
वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण घराचा भार लता मंगेशकर यांच्या खांद्यावर आला. वडिलांच्या माघारी त्यांना संपूर्ण कुटुंबाला सांभाळावे लागले. लता मंगेशकर यांच्या वडिलांचे मित्र मास्टर विनायक यांनी त्यांना ‘बडी माँ’ या चित्रपटात भूमिकेची ऑफर दिली, ज्यासाठी त्या मुंबईत आल्या होत्या. येथेच लताजींनी उस्ताद अमान अली खान यांच्याकडून हिंदुस्थानी संगीत शिकून घेतले. लताजींनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक दिग्गज संगीत दिग्दर्शकांसोबत काम केले आहे.
लक्ष्मीकांत-प्यारेलाल ते एआर रहमानसोबत काम!
लता मंगेशकर यांनी संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्यासाठी 700हून अधिक गाणी गायली. त्यानंतर लता दीदींनी 1942मध्ये त्यांच्यासोबत ‘कुछ ना कहो'मध्ये काम केले. लता मंगेशकर आणि आरडी बर्मन यांनी 1994च्या ‘अ लव्ह स्टोरी’मध्ये शेवटचे एकत्र काम केले होते. त्यानंतर त्यांनी एआर रहमानसोबत काम केले. त्यांनी 2001मध्ये ‘लगान’मधील ‘ओ पालनहारी’ आणि 2006मध्ये ‘रंग दे बसंती’मधील ‘लुका छुपी’ ही गाणे गायली.
लता मंगेशकर यांनी ‘दो बिघा जमीन’, ‘मदर इंडिया’, ‘मुगल-ए-आझम’ अशा क्लासिक चित्रपटांमधील त्यांची गाणी खूप गाजली. जास्तीत जास्त गाणी रेकॉर्ड करण्याचा मानही लता मंगेशकरांच्या नावावर आहे. लता मंगेशकर यांनी 20 भाषांमध्ये 30,000 गाणी गायली आहेत. फिल्मी गाण्यांव्यतिरिक्त त्यांनी नॉन फिल्मी गाणीही उत्तम गायली आहेत.
संबंधित इतर बातम्या
- Lata Mangeshkar : 20 भाषांमध्ये तब्बल 30 हजारांहून अधिक गाणी, लता मंगेशकरांचा सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रम!
- Lata Mangeshkar passes away : युग संपले! लतादीदींच्या निधनानंतर संजय राऊत यांचे ट्वीट
- Lata Mangeshkar Death : गानकोकिळा लता मंगेशकर यांचे निधन, वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
- Remembering Lata Mangeshkar LIVE: स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha