एक्स्प्लोर

“लास्ट स्टॉप खांदा” चित्रपटाचं टायटल सॉंगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, थिरकायला लावणारं गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस

नुकतंच या चित्रपटाचं टायटल साँग लाँच करण्यात आलं असून ते सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. गाण्याची ठेक्याची चाल प्रत्येक प्रेक्षकाला थिरकायला भाग पाडत आहेत.

Marathi Film Song: सध्या जोरदार चर्चेत असलेला “लास्ट स्टॉप खांदा” हा आगामी मराठी चित्रपट आता आपल्या टायटल सॉंगमुळे आणखी चर्चेत आला आहे. नुकतंच या चित्रपटाचं टायटल साँग लाँच करण्यात आलं असून ते सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. गाण्याची ठेक्याची चाल प्रत्येक प्रेक्षकाला थिरकायला भाग पाडत आहेत.

21 नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाने आधीच चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. शिवम फिल्म क्रिएशन, सिग्नेचर ट्यून्स आणि स्नेहा प्रॉडक्शन्स यांच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. सचिन कदम आणि सचिन जाधव यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली असून, प्रदीप मनोहर जाधव हे निर्माता तर सचिन कदम आणि अमृता सचिन जाधव हे सहनिर्माते आहेत.

“शालू झोका दे गो मैना” नंतर हे गाणंही होतंय हिट 

“प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट” असा टॅगलाईन असलेला हा चित्रपट प्रेम, भावना आणि नात्यांच्या गुंतागुंतीतून प्रवास घडवून आणतो. यापूर्वीच प्रदर्शित झालेलं “शालू झोका दे गो मैना” हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. त्यानंतर आलेल्या टिझरलाही सोशल मीडियावर भरघोस प्रतिसाद मिळाला. आता या टायटल सॉंगने चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढवली आहे.

या गाण्याचे शब्द आणि संगीत श्रेयस राज आंगणे यांनी दिले आहेत, तर सुहास सावंत यांनी ते आपल्या सुरेल आवाजात गायले आहे. नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी राहुल बनसोडे आणि रवी आखाडे यांनी सांभाळली आहे. उडत्या चालीच्या या गाण्याला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून, हे गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे.

“लास्ट स्टॉप खांदा” या चित्रपटाचं लेखन श्रमेश बेटकर यांचं असून दिग्दर्शन विनीत परुळेकर यांनी केलं आहे. चित्रपटात श्रमेश बेटकर आणि जुईली टेमकर प्रमुख भूमिकेत आहेत. त्यांच्यासोबत निखिल बने, मंदार मांडवकर, शशिकांत केरकर, सुदेश जाधव, महेश करपेकर, प्रियांका हांडे, डॉ. सचिन वामनराव, गणेश गुरव, निशांत जाधव, गिरीश तेंडुलकर आणि जयश्री गोविंद अशी दमदार स्टारकास्ट आहे.

पाहुणे कलाकार म्हणून धनश्री काडगावकर, प्रभाकर मोरे आणि अशोक ढगे झळकणार आहेत. चित्रपटाचं छायांकन हरेश सावंत यांनी केलं असून, कलादिग्दर्शन केशव ठाकुर यांचं आहे. मनोरंजक कथा, आकर्षक संगीत आणि दमदार कलाकारांच्या अभिनयाने सजलेला “लास्ट स्टॉप खांदा” हा चित्रपट २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
FPI: विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले, पुढं काय घडणार? 
विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले
भाजप आणि शिंदे गटाचे 69 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
भाजप आणि शिंदे गटाचे 68 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
Embed widget