एक्स्प्लोर

Lagnanantar Hoilach Prem Star Pravah Marathi Serial: स्टार प्रवाहच्या 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेत मोठा ट्वीस्ट; जीवा-नंदिनीच्या आयुष्यात 'ती' येणार, कथानक कोणतं वळण घेणार?

Lagnanantar Hoilach Prem Star Pravah Marathi Serial: अखेर वैद्यकीय सल्ल्यानंतर जीवा आणि नंदिनीने सरोगसीचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या महत्त्वाच्या प्रवासात साथ देण्यासाठी मालिकेत एका नव्या व्यक्तिरेखेची एण्ट्री होणार आहे.

Lagnanantar Hoilach Prem Star Pravah Marathi Serial: स्टार प्रवाहवरील (Star Pravah) 'लग्नानंतर होईलच प्रेम' (Lagnanantar Hoilach Prem) मालिकेत सध्या जीवा आणि नंदिनीच्या आयुष्यातील अत्यंत भावनिक टप्पा प्रेक्षक अनुभवत आहेत. एकीकडे काव्या आणि पार्थच्या आयुष्यात बाळाच्या आगमनाची चाहूल लागलेली असतानाच दुसरीकडे नंदिनी मातृत्वाच्या अपूर्ण स्वप्नाशी झुंज देत आहे. आई होण्याची तीव्र ओढ, त्यासाठी केलेले प्रयत्न आणि प्रत्येक वेळी पदरी पडलेली निराशा यामुळे जीवा-नंदिनीचा प्रवास अधिकच भावनिक बनला आहे.

अखेर वैद्यकीय सल्ल्यानंतर जीवा आणि नंदिनीने सरोगसीचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या महत्त्वाच्या प्रवासात साथ देण्यासाठी मालिकेत एका नव्या व्यक्तिरेखेची एण्ट्री होणार आहे. लोकप्रिय अभिनेत्री अनघा अतुल डॉ. आर्या या भूमिकेतून मालिकेत दाखल होत आहे. तिच्या आगमनामुळे कथानकाला एक महत्त्वपूर्ण कलाटणी मिळणार असून प्रेक्षकांना अनेक भावनिक आणि अनपेक्षित वळणं अनुभवायला मिळणार आहेत.

Lagnanantar Hoilach Prem Star Pravah Marathi Serial: स्टार प्रवाहच्या 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेत मोठा ट्वीस्ट; जीवा-नंदिनीच्या आयुष्यात 'ती' येणार, कथानक कोणतं वळण घेणार?
 
रंग माझा वेगळा मालिकेतील श्वेता या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेली अनघा जवळपास तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा स्टार प्रवाह कुटुंबात परतत आहे. या भूमिकेबद्दल सांगताना अनघा अतुल म्हणाली, "स्टार प्रवाहसोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळाल्याचा खूप आनंद आहे. रंग माझा वेगळामध्ये खलनायिका साकारल्यानंतर ठरवून सकारात्मक भूमिकेची वाट पहात होते. डॉ. आर्याच्या रुपात तो शोध संपला असं म्हणेन. डॉ. आर्या ही अतिशय संवेदनशील, समजूतदार आणि सकारात्मक व्यक्तिरेखा आहे. जीवा आणि नंदिनीच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर ती त्यांच्या सोबत उभी राहणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. ट्रेनने प्रवास करताना मोबाईलवर मालिका पहाणाऱ्या असंख्य स्त्रिया मी पाहिल्या आहेत. मी सुद्धा ही मालिका आवर्जून पहाते. आपल्याच आवडीच्या मालिकेत काम करायला मिळणं हा दुग्धशर्करा योग आहे असं मला वाटतं. या भूमिकेमध्ये भावनांची खूप सुंदर गुंफण आहे. प्रेक्षकांनी माझ्या आधीच्या भूमिकांवर भरभरून प्रेम केलं, तसंच प्रेम डॉ. आर्यालाही मिळेल अशी आशा आहे..."

जीवा-नंदिनीचं मातृत्वाचं स्वप्न पूर्ण होणार का? डॉ. आर्याच्या आगमनामुळे त्यांच्या आयुष्यात नेमके कोणते बदल घडणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Surbhi Jyoti Stunning Look: 38व्या वर्षी आई होणार 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री; राणीसारखं सजून फ्लॉन्ट केला बेबी बंप, गोल्डन साडी अन् केसात माळलेल्या गजऱ्यात खुलून दिसतंय सौंदर्य

ABP Majha च्या बातम्या LIVE:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
Advertisement

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget