Kunickaa Sadanand on Kumar Sanu : 'कुमार सानू मला नवऱ्यासारखा होता, पहिल्या बायकोला माहीत होताच..' एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्रीचा सनसनाटी खुलासा
Kunickaa Sadanand on Kumar Sanu : कुनिका सदानंदच्या म्हणण्यानुसार, उटीहून परतल्यानंतर कुमार सानू आपल्या पत्नीपासून वेगळे राहू लागला. त्यादरम्यान ती आणि कुमार सानू जवळ आले. त्यांचे नाते 5 वर्षे टिकले.
Kunickaa Sadanand on Kumar Sanu : प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचे अभिनेत्री कुनिका सदानंदसोबत विवाहबाह्य संबंध होते. कुनिकाने काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीत याची कबुली दिली होती. आता पुन्हा एकदा कुनिकाने सनसनाटी खुलासा केला आहे. कुनिका सदानंदने सांगितले की, कुमार सानू दारू पिऊन हॉटेलच्या खिडकीतून उडी मारणार असतानाच त्यांच्या पत्नीने हॉकी स्टिकने अभिनेत्रीची गाडी फोडली. एवढेच नाही तर ती त्यांच्या घराबाहेर येऊन ओरडायची. कुनिका सदानंदने सिद्धार्थ काननशी संवाद साधताना सांगितले की, 90 च्या दशकात ती कुमार सानूला भेटली जेव्हा ती इंडस्ट्रीत आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत होती. उटीमध्ये दोघेही एकमेकांच्या जवळ आले. कुनिका तिथे शूटिंगसाठी गेली होती आणि कुमार सानू सुट्टीवर होता.
दारू पिऊन कुमार सानू खिडकीतून उडी मारणारच होता
कुनिकाने सांगितले की, कुमार सानू आणि त्याची पत्नी रिटा यांच्या नात्यात तणाव होता. तो बहीण आणि पुतण्यासोबत उटीला आला होता. हे सर्वजण हॉटेलमध्ये मद्यपान करत असताना कुमार सानूने दारू पिऊन हॉटेलच्या खिडकीतून उडी मारण्याचा प्रयत्न केला. कुनिकाच्या म्हणण्यानुसार, कुमार सानू रडू लागला आणि उडी मारणार होता. तो डिप्रेशनने त्रस्त होता. मग कसेतरी त्यांनी कुमार सानूला पकडले.
कुमार सानू मला पतीसारखा आणि मी त्याच्या पत्नीसारखी
कुनिका सदानंदच्या म्हणण्यानुसार, उटीहून परतल्यानंतर कुमार सानू आपल्या पत्नीपासून वेगळे राहू लागला. त्यादरम्यान ती आणि कुमार सानू जवळ आले. त्यांचे नाते 5 वर्षे टिकले. कुनिका म्हणाली, 'आम्ही आमचे नाते सार्वजनिक केले नाही. पण कुमार सानूसाठी मी पत्नीसारखी होते आणि ते माझ्या पतीसारखे होते.
'कुमार सानूची पत्नी माझ्या घराबाहेर ओरडायची'
कुमार सानूच्या पत्नीला खूप राग आला कारण मुलांसाठी पैसे पाठवणे बंद केले होते. जेव्हा कुमार सानू आपल्या पत्नीला वेळेवर पैसे देऊ शकत नव्हता, तेव्हा ती त्यासाठी कुनिकाला जबाबदार धरायची. कुनिकाने सांगितले की, 'कुमार सानूच्या पत्नीने हॉकी स्टिकने माझी कार फोडली. ती माझ्या घराबाहेर येऊन ओरडायची. पण मला त्यांच्या वेदना समजल्या. तिला मुलांसाठी पैसे हवे होते. तिची चूक नव्हती. कुमार सानू परत नको, असे पत्नीने सांगितले होते.
कुमार सानूचे दुसरे लग्न आणि मुले
कुमार सानूने 5 वर्षांच्या अफेअरनंतर कुनिका सदानंदसोबत ब्रेकअप केले आणि नंतर सलोनीशी लग्न केले. कुमार सानू आणि सलोनी यांना दोन मुली आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या