Kubra Sait On One Night Stand: 'मी स्वतः माझं अबॉर्शन केलंय...'; वन नाईट स्टँडदरम्यान 'त्याच्यामुळे' अभिनेत्री प्रेग्नेंट, म्हणाली...
Kubra Sait On One Night Stand: 41 वर्षांच्या अभिनेत्रीनं तिच्या वन नाईट स्टँडबाबत एका मुलाखतीत बोलताना खुलासा केला आहे.

Kubra Sait On One Night Stand: सेक्रेड गेम्स (Sacred Games) या गाजलेल्या वेब सीरिजमधून (Web Series) झळकलेली अभिनेत्री कुब्रा सैत (Kubra Sait) आपल्या क्लासी अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. नुकतंच तिनं तिच्या गर्भपाताबाबत वक्तव्य केलं आहे. 41 वर्षांच्या अभिनेत्रीनं तिच्या वन नाईट स्टँडबाबत (One Night Stand) खुलासा केला आहे. वन नाईट स्टँडनंतर ती गरोदर राहिल्याचा खुलासा अभिनेत्रीनं एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत बोलताना केला आहे.
आपल्या वन नाईट स्टँडबाबत बोलताना अभिनेत्री कुब्रा सैत म्हणाली की, वन नाईट स्टँडनंतर ती गरोदर राहिली, पण त्यानंतर गर्भपात करणं ही तिची स्वतःची इच्छा होती. कारण त्यावेळी तिला मूल नको होतं. त्यावेळी ती प्रचंड घाबरली होती. पण तरीसुद्धा तिनं अबॉर्शनची प्रोसेस एकटीनं केली आणि याबाबत तिनं कोणाला कधीच सांगितलं नाही.
View this post on Instagram
बॉलीवूड बबलशी बोलताना कुब्रा सैत म्हणाली की, "ज्यावेळी मी गर्भपात केला, त्यावेळी माझ्यात अजिबात ताकद नव्हती. ती संपूर्ण प्रोसेस पार पाडण्यासाठी मी स्वतःला फारच कमकुवत समजत होते. जर मी अवॉर्जनश केलं नाही, तरी ते सांगण्याचं धाडस किंवा जोश माझ्यात नव्हता." पुढे बोलताना ती म्हणाली की, "मी स्वतःला स्वतःसाठी निर्णय घेण्यास सक्षम बनवू शकले आहे. मी जे केलं, ते पूर्णपणे बरोबर होतं आणि मी स्वतःला पाठिंबा दिला. मी माझ्या निर्णयाचाही आदर करतो. मी स्टिरियोटाइप पॅटर्न तोडू शकलो आणि त्या सामाजिक बंधनातून मुक्तही होऊ शकलो."
View this post on Instagram
कुब्रा सैत बोलताना म्हणाली की, "मी स्वतः गर्भपातासाठी गेले होते आणि तेसुद्धा एकटी. माझ्यासोबत कोणीही नव्हतं. मी संपूर्ण अबॉर्शनची प्रोसेस एकटीनं केली."
दरम्यान, कुब्रा सैतच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, ती जवानी जानेमन आणि सेक्रेड गेम्स सारख्या वेब सीरिजमध्ये दिसली आहे आणि ती सध्या अविवाहित आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























