(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kshitee Jog : आईवडिल वेगळे झाले तेव्हा मला आनंद झाला, क्षिती जोगने पहिल्यांदाच व्यक्त केल्या भावना
Kshitee Jog : अभिनेत्री क्षिती जोग हिने पहिल्यांदाच तिच्या आई वडिलांच्या वेगळं राहण्यावर भावना व्यक्त केल्या आहेत.
Kshitee Jog : मराठी सिनेसृष्टीतले दिग्गज कलाकार अनंत जोग (Anant Jog) आणि उज्वला जोग (Ujwala Jog) यांची लेक म्हणजे अभिनेत्री क्षिती जोग (Kshitee Jog). क्षिती आतापर्यंत अनेक सिनेमा आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. क्षितीने अभिनयासह तिच्या निर्मितीचीही जबाबदारी अगदी सहज पेलल्याचं पाहायला मिळालं आहे. याच अभिनेत्रीने नुकतच तिच्या आईवडिलांच्या नात्यावर भाष्य केलं आहे. तसेच अनंत जोग आणि उज्वला जोग यांच्या वेगळं होण्यावरही क्षितीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
क्षिती 18 वर्षांची असताना तिचे आईवडिल वेगळे झाले. त्यावेळी मला खूप आनंद झाल्याचं क्षितीने म्हटलं आहे. नुकत्याच एका पॉडकास्टला क्षितीने मुलाखत दिली होती. त्यावेळी तिने यासगळ्यावर भाष्य केलं आहे. तसेच यावेळी तिने तिच्या आणि आईवडिलांच्या नात्यावरही अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
काय म्हणाली क्षिती?
त्यांच्या प्रवासात मी त्यांचा टोकाचा वादही पाहिला आहे. त्यांची सततची भांडणं पाहून मी अक्षरश: वैतागले होते. शेवटी त्यांनीच वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. तेव्हा मला आनंद झाला होता. कारण आम्ही तिघं एकत्र राहत असताना होणारे वाद, भांडण यासगळ्यामुळे आम्ही तिघेही दु:खी आयुष्य जगत होतो. पण ते आम्ही वेगळे झाल्यावर तिघेही सुखी झालोत. त्यावेळी सगळ्यांसाठीच ते योग्य होतं. पण आजही आम्ही तिघे एकत्र येतो, भेटतो, जेवतो. बाबा आईच्या हातचं खायला तिच्या घरी जातात, असं म्हणत क्षितीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पण ते एक जबाबदार पालक आहेत - क्षिती जोग
पुढे क्षितीने म्हटलं की,मी जरी त्यांच्यापासून वेगळं राहत असले तरीही त्यांना माहिती असायचं की त्यांची मुलगी कोणत्या वेळी कुठे आहे ते. कारण मी एक जबाबदार मुलगी आहे तसेच ते जबाबदार पालक देखील आहेत. जेव्हा एकटं राहायचे तेव्हा अनेकजण एकटी म्हणून सिंपथी द्यायचे. आजही माझी त्यांच्यासोबत तितकीच भांडणं होतात. आईसोबत तर पूर्वीसारखीच होतात, पण बाबांसोबत अजून त्या लेव्हलपर्यंत गेलेलं नाहीये.
View this post on Instagram