Sahil Khan arrest : चार दिवस, सहा राज्यातून दिवस-रात्र प्रवास, राज्याबाहेर पळून जाण्याचा प्रयत्न ;साहिल खानच्या अटकेआधी नेमकं काय घडलं?
Sahil Khan arrest : महादेव बेटिंग अॅप प्रकरणात साहिल खानला अटक करण्यात आली असून तो सध्या पोलीस कठोडीत आहे.
Sahil Khan arrest : अभिनेता साहिल खान (Sahil Khan) हा महादेव बॅटींग अॅप (Mahadev Betting App) प्रकरणात 1 मे पर्यंत पोलीस कोठडीत असणार आहे. याच प्रकरणात न्यायालयाकडून त्याचा अटकपूर्ण जामीन फेटाळण्यात आला होता.अटक टाळण्यासाठी तो 25 एप्रिल रोजी राज्याबाहेर फरार झाला. पण त्याआधी जवळपास 72 तास पोलीस साहिलचा शोध घेत होते.
दरम्यान राज्याबाहेर विमानाने जाण्याचा प्रयत्न केल्यास पोलीस पकडतील या भितीने साहिल खान राज्याबाहेर खासगी गाडीने प्रवासात करत होता. त्याने आधी गोवा मग कर्नाटक असा प्रवास करत तो हुबळीवरुन हैदराबाद पोहचला. त्याने जवळपास चार दिवसांत सहा राज्यातून प्रवास दिवस-रात्र प्रवास केला. त्याने एकूण 1800 किमीची प्रवास केल्याची माहिती सध्या समोर आली आहे.
पोलिसांना संशय येऊ नये म्हणून साध्या कपड्यात वावर
या प्रवासात साहिल खान अत्यंत साध्या कपड्यात वावरत होता. उन्हाचा पारा तसेच कुणी ओळखू नये यासाठी तोंडाला स्कार्फ घालून आपली ओळख लपवत फिरत असल्याची माहिती तपासात समोर आली.हैद्राबाद येथे साहिल खान अर्धातासाच्या अंतरावर असताना पोलिसांना त्याचे लोकेशन मिळाले. पण पुन्हा तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटला.
नक्षलवादी भागातून जाण्यास चालकाचा नकार
साहिलची गाडी छत्तीसगड भागातील नक्षलवादी परिसरातून पुढे जाणार तोच चालकाने घाबरून रात्रीच्या वेळी नक्षलीभागातून पुढे जाण्यास नकार दिला. नक्षलवादी भागातून रात्रीच्या प्रवासाला साहिल खानचा चालक घाबरला आणि साहिल खान पोलिसांच्या हाताला लागल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.पर्यायी साहिल खानला छत्तीसगडच्या जगदलपूर परिसरातील आराध्य इंटरनॅशनल हाॅटेलमध्ये थांबावं लागलं. ही माहिती पोलिसांना मिळकाच मागावर असलेल्या मुंबई पोलिसांनी त्याला गाठत शनिवारी रात्री ताब्यात घेतले.
72 तास पोलीस साहिलच्या मागावर
तब्बल 72 तास मुंबई पोलीस साहिल खानच्या मागावर होते. साहिलकडून पोलिसांनी दोन मोबाइल आणि काही कॅश जप्त केली आहे.चौकशीत सोमवारपर्यंत पोलिसांच्या हाती न लागण्याचा त्याचा कट होता. यासाठी महाराष्ट्राबाहेर साहिल पळत असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
नेमकं प्रकरण काय?
महादेव बेटिंग या ॲप (Mahadev Betting App) प्रकरणात कारवाई करण्यात येत आहे. सर्वसामान्यांना विविध खेळांवर सट्टा लावून पैसे जिंकण्याचे आमिष दाखवण्यात आले. या बेटिंग ॲपसंबंधित सर्व संकेतस्थळे परदेशातून नियंत्रित केली जात होती. महादेव बेटिंग ॲप या ऑनलाइन सट्टेबाजी प्रकरणात अभिनेता साहिल खान याचं नाव बेटिंग ॲप ऑपरेटर म्हणून एफआयआरमध्ये नाव नोंदवण्यात आलं आहे. माटुंगा पोलिसांनील आधीच 31 जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. साहिल खानवर महादेव ऑनलाइन बेटिंग ॲपशी संबंधित आणखी एक बेटिंग ॲप चालवल्याचा आरोप आहे. याशिवाय साहिल खानवर फक्त ॲप प्रमोशनच नाही तर ॲप ऑपरेट करून प्रचंड नफा कमावल्याचा आरोप आहे.
ही बातमी वाचा :
मोठी बातमी : अभिनेता साहिल खानला 1 मे पर्यंत पोलीस कोठडी, महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अटक