Kiran Mane on Dhruv Rathee Video : 'इस व्हिडीओने आग लगा दी भाई', ध्रुव राठीच्या व्हिडिओवरील किरण मानेंची पोस्ट चर्चेत
Kiran Mane Post on Dhruv Rathi : युट्युबर ध्रुव राठी याने पंतप्रधान मोदी यांच्यावर केलेल्या व्हिडिओवर किरण माने यांनी पोस्ट करत त्याचं कौतुक केलं आहे.
Kiran Mane Post on Dhruv Rathi : अवघ्या काही दिवसांवर लोकसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाकडून जोरदार तयारी केली जातेय. 2024 मध्ये बाजी कोण मारणार हे अवघ्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईलच, पण सध्या राज्यासह देशात सुरु असेलेल्या राजकीय परिस्थितीवर बराच आक्षेप घेतला जातोय. नुकताच युट्युबर ध्रुव राठी (Dhruv Rathi) याने पंतप्रधान मोदी (Narendra Modi) आणि सध्या देशात सुरु असलेल्या राजकीय परिस्थितीवर त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून भाष्य केलं आहे. त्याच्या याच व्हिडिओवर किरण माने (Kiran Mane) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
निवडणुकांच्या काळामध्ये त्याचा हा व्हिडीओ सध्या बराच चर्चेत आलाय. पण यावर किरण माने यांनी केलेली पोस्टही तितकीच चर्चेत आलीये. किरण माने यांनी काही दिवसांपूर्वी ठाकरे गटात प्रवेश करत राजकारणात एन्ट्री केली. त्यानंतर त्यांच्या बऱ्याच पोस्ट या अनेकदा चर्चेत आल्या आहेत. पण ध्रुव राठीवर त्यांनी केलेली ही पोस्ट विशेष चर्चेत आली आहे.
किरण माने यांनी काय म्हटलं?
ध्रुव राठी ! इस व्हिडीओने आग लगा दी भाई.संविधानावर आणि आपल्या देशावर प्रेम असणार्या प्रत्येकानं बघा. बघाच. पुन्हा पुन्हा बघा. शेअर करा. चर्चा करा, असं म्हणत किरण माने यांनी ध्रुव राठीच्या व्हिडिओची लिंक या पोस्टच्या कमेंटमध्येही टाकली आहे. देशातलं राजकीय वातावरण कशा प्रकारे बदललं आहे आणि या परिस्थितीला मोदी - शाह जबाबदार असल्याचं ध्रुव राठीने या व्हिडिओमध्ये म्हटलंय.
जबरी प्रभाव त्याच्या व्हिडिओने साधलाय - किरण माने
ध्रुव राठी याच्या व्हिडिओवर किरण माने यांनी पुढे म्हटलं की, दोन वर्ष करू शकणार नाहीत एवढा जबरी प्रभाव ध्रुव राठीच्या एका व्हिडीओनं साधलाय. जगभर व्हायरल होतोय. भारतातल्या वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतर होतेय. मराठीमध्ये कुणी करतंय का?
किरण माने यांच्या पोस्टवर कमेंट
किरण माने यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. त्यामुळे सध्या किरण माने यांची ही पोस्ट बरीच चर्चेत आलीये. किरण माने यांच्या बऱ्याच पोस्ट कायमच चर्चेत असतात. पण त्यांची ही पोस्ट सध्याच्या राजकीय परिस्थितींमुळे जास्त चर्चेत आली आहे.