एक्स्प्लोर

Prashanth Neel : ‘केजीफ’च्या प्रशांत नीलकडून ज्युनियर एनटीआरला खास भेट, ‘NTR 31’ या नव्या चित्रपटाची घोषणा!  

Jr.NTR, Prashanth Neel : ‘केजीएएफ’ फेम दिग्दर्शक प्रशांत नील आणि ‘आरआरआर’ फेम ज्युनियर एनटीआर लवकरच एकत्र काम करणार आहेत.

Jr.NTR, Prashanth Neel : साऊथ स्टार ज्युनियर एनटीआरने (Jr.NTR) नुकताच त्याचा 39वा वाढदिवस साजरा केला. त्याचा यंदाचा वाढदिवस त्याच्यासाठी आणखी खास बनला आहे. यंदाच्या वर्षी रिलीज झालेला त्याचा ‘RRR’ हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. आता या खास दिवसाच्या निमित्ताने त्याला 'KGF: Chapter 2'चे (KGF 2) दिग्दर्शक प्रशांत नील यांच्याकडून खास भेट मिळाली आहे.

‘केजीएएफ’ फेम दिग्दर्शक प्रशांत नील आणि ‘आरआरआर’ फेम ज्युनियर एनटीआर लवकरच एकत्र काम करणार आहेत. आता दोघांच्या नव्या प्रोजेक्टची तयारीही सुरू झाली आहे, त्याचा पुरावा म्हणजे प्रशांत नीलने शेअर केलेले एक खास पोस्टर. एनटीआरच्या वाढदिवशी प्रशांत नील यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. अद्याप नाव न ठरलेल्या या चित्रपटाला NTR31 म्हटले जाणार आहे. या पोस्टरमध्ये, ज्युनियर एनटीआरचा जबरदस्त अवतारात पाहायला मिळत आहे.

कधी सुरू होणार ‘NTR 31’चे शूटिंग?

ज्युनियर एनटीआर दिग्दर्शक कोर्टाला शिवाच्या ‘NTR 30’नंतर ‘NTR31’च्या प्रोजेक्टवर लक्ष केंद्रित करणार आहे. हा चित्रपट प्रशांत नील दिग्दर्शित करणार असून, पहिल्या लूकमधून ज्युनियर एनटीआर एका धडाकेबाज अवतारात दिसणार असल्याचे स्पष्ट होत आहे. पोस्टरमध्ये डार्क थीम आहे आणि एनटीआरच्या चेहऱ्यावर राग दिसतो आहे. त्याचा हा लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

निर्मात्यांव्यतिरिक्त, तरण आदर्शने देखील हे पोस्टर शेअर केले आहे. त्यांनी हे पोस्टर शेअर करताना लिहिले की, 'मोठी बातमी... ज्युनियर एनटीआर आणि 'केजीएफ' दिग्दर्शक प्रशांत नील एका पॅन इंडिया चित्रपटासाठी हात मिळवणी करत आहेत... #JrNTR च्या वाढदिवसानिमित्त, ही एक मोठी घोषणा आहे... #JrNTR आणि #KGF2चे दिग्दर्शक प्रशांत नील यांचे ‘NTR 31’साठी टीम अप.. एप्रिल 2023 पासून शूटिंग सुरू सुरु होणार आहे.’

‘NTR 30’ची ही घोषणा!

‘NTR30’ या नावाने चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. ज्युनियर एनटीआरच्या या नवीन चित्रपटाचे दिग्दर्शन कोर्टाला शिवा करणार आहेत. अभिनेता एनटीआर आणि कोर्टाला एकत्र काम करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2016 मध्ये 'जनता गॅरेज' या चित्रपटाचे दिग्दर्शनही कोर्टाला शिवा यांनी केले होते आणि हा चित्रपट यशस्वी ठरला होता.

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Divyanka Tripathi Shared Motherhood Experience: 'ब्रेस्टफिडिंगमुळे होणाऱ्या वेदना... बाळाला फायदा पण, आईचं काय?'; दिव्यांका त्रिपाठीचं स्तनपानाबाबतचं 'ते' वक्तव्य VIRAL
'ब्रेस्टफिडिंगमुळे होणाऱ्या वेदना... बाळाला फायदा पण, आईचं काय?'; दिव्यांका त्रिपाठीचं स्तनपानाबाबतचं 'ते' वक्तव्य VIRAL
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Satluj: रिलीजनंतर 48 तासांत हटवला; ‘सतलज’च्या नुकसानभरपाईसाठी गुरुद्वारांनी उचललं मोठं पाऊल! दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
रिलीजनंतर 48 तासांत हटवला; ‘सतलज’च्या नुकसानभरपाईसाठी गुरुद्वारांनी उचललं मोठं पाऊल! दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
Dashmi Marathi Movie Poster: महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Embed widget