Kesari Chapter 2 BO Day 7: दमदार कंटेंट, कौतुकही भरपूर, तरीसुद्धा अर्धी कमाईही करू शकला नाही 'केसरी 2'; सात दिवसांच्या कलेक्शनचे हादरणारे आकडे
Kesari Chapter 2 Box Office Collection Day 7: अक्षय कुमारचा 'केसरी 2' प्रदर्शित होऊन एक आठवडा उलटला आहे. आधी या चित्रपटाला भरपूर प्रशंसा मिळूनही, या चित्रपटाला चांगली कमाई करता आलेली नाही.

Kesari Chapter 2 Box Office Collection Day 7: 'केसरी चॅप्टर 2: द अनटोल्ड स्टोरी ऑफ जालियनवाला बाग' (Kesari Chapter 2) चा ट्रेलर रिलीज होताच चित्रपटाबद्दल लोकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली होती. 'केसरी 2' (Kesari 2) चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. चित्रपटाच्या कथेपासून ते स्टारकास्टच्या अभिनयापर्यंत, प्रत्येक गोष्टीचं सर्वांनी भरभरून कौतुक केलं. पण, चित्रपट रिलीज होताच प्रत्यक्षात मात्र वेगळंच काहीतरी झालं. जेवढी चर्चा झाली, तेवढा 'केसरी चॅप्टर 2'ला काही गल्ला जमवता आला नाही.
दरम्यान, हा चित्रपट सध्याच्या चर्चेप्रमाणे व्यवसाय करू शकत नाही. आठवड्याच्या दिवसात, चित्रपटाचं कलेक्शन दिवसागणिक कमी होत आहे. अक्षय कुमार स्टारर या चित्रपटानं रिलीजच्या सातव्या दिवशी म्हणजेच, बुधवारी किती कमाई केली? सविस्तर जाणून घेऊयात...
'केसरी 2'नं सातव्या दिवशी किती गल्ला जमवला?
'केसरी 2' हा हिस्टॉरिकल ड्रामा असलेला सिनेमा करण सिंह त्यागी यांनी दिग्दर्शित केला आहे आणि त्यात अक्षय कुमार, आर. माधवन आणि अनन्या पांडे मुख्य भूमिकेत आहेत. 18 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर, समीक्षकांनी या चित्रपटाचं भरभरुन कौतुक केलं आणि नंतर काही काळ का होईना या चित्रपटानं प्रेक्षकांवर जादू केली.
दरम्यान, भरपूर प्रशंसा मिळूनही, 'केसरी 2' प्रदर्शित झाल्यानंतर आठवडा उलटूनही त्याची निम्मी किंमतही वसूल करू शकलेला नाही. या सगळ्यात, जर आपण 'केसरी 2' च्या कलेक्शनबद्दल बोललो तर, चित्रपटानं 7.75 कोटींची सुरुवात केली, दुसऱ्या दिवशी चित्रपटानं 9.75 कोटी, तिसऱ्या दिवशी 12 कोटी, चौथ्या दिवशी 4.5 कोटी, पाचव्या दिवशी 5 कोटी आणि सहाव्या दिवशी चित्रपटानं 3.6 कोटींची कमाई केली.
सॅक्निल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'केसरी 2'नं रिलीजच्या सातव्या दिवशी 3.50 कोटी रुपये कमावले आहेत.
यासह, 'केसरी 2' ची 7 दिवसांत एकूण कमाई 46.10 कोटी रुपये झाली आहे.
View this post on Instagram
'केसरी 2' हिट होईल का?
'केसरी 2' चित्रपटानं थिएटरमध्ये एक आठवडा पूर्ण केला आहे आणि त्याची आठवड्याची कमाई 46 कोटी रुपये झाली आहे. चित्रपटाचं बजेट 150 कोटी रुपये आहे. या बाबतीत, अक्षय कुमार स्टारर या चित्रपटानं अद्याप त्याच्या बजेटच्या निम्मेही पैसे वसूल केलेले नाहीत. आता जर चित्रपट हिट व्हायचा असेल, तर दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाला खूप कमाई करावी लागेल. जर 'केसरी 2' असं करण्यात अयशस्वी झाला, तर सकारात्मक चर्चांनंतरही, हा चित्रपट अक्षय कुमारच्या कारकिर्दीतील आणखी एक फ्लॉप ठरण्याची भिती आहे.
'केसरी 2' ची पटकथा जालियनवाला बाग हत्याकांड आणि त्यानंतर ब्रिटिश साम्राज्याविरुद्धच्या न्यायालयीन खटल्यावर आधारित आहे. हा चित्रपट रघु पलात आणि पुष्पा पलात यांच्या 'द केस दॅट शूक द एम्पायर' या पुस्तकापासून प्रेरित आहे. चित्रपटाची कथा अक्षय कुमारनं साकारलेल्या वकील सी शंकरन यांच्याभोवती फिरते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























