एक्स्प्लोर

Kedar Shinde On Bharat Jadhav: 'समोरुन जायचो, ना तो माझ्याकडे पाहायचा, ना मी त्याच्याकडे... '; केदार शिंदेंचं भरत जाधवांसोबतच्या अबोल्यावर भाष्य

Kedar Shinde On Bharat Jadhav: एकमेकांचे अत्यंत जवळचे, घनिष्ठ मित्र म्हणून ओळखले जाणारे भरत जाधव आणि केदार शिंदे दोघेही तब्बल 9 महिने एकमेकांशी बोलले नाहीत, एकमेकांची तोंडही पाहिली नाहीत, का? नेमकं काय झालेलं?

Kedar Shinde On Bharat Jadhav: मराठी सिनेसृष्टीत (Marathi Movies) असो वा मराठी रंगभूमी (Marathi Theatre), अनेक जोड्यांनी धुमाकूळ घातला आणि प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. त्यातील काही जोड्या अभिनेता आणि अभिनेत्रीच्या होत्या. तर काही, सुपरस्टार अभिनेता आणि दिग्दर्शकाची... आज आम्ही तुम्हाला सांगतोय मराठी सिनेसृष्टी, मराठी मालिकाविश्व आणि मराठी रंगभूमीवर धुमाकूळ घालणाऱ्या दिग्दर्शकाच्या आणि एका यशस्वी सर्वसामान्यांना भावलेल्या नटाच्या जोडीबाबत. ही जोडी म्हणजे, मराठीतले प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) आणि अभिनेते भरत जाधव (Bharat jadhav). 

केदार शिंदे आणि भरत जाधव, ही जोडगोळी मराठीतली ही सर्वात यशस्वी जोडी म्हणून प्रसिद्ध आहे. दोघांनी अनेक प्रोजेक्ट्स एकत्र केलेत. त्यांनी अनेक लोकप्रिय चित्रपट, नाटकं आणि मालिकांमध्ये एकत्र काम केलं.  अनेक सुपरहिट सिनेमे, नाटकं केल्यानंतर दोघांमध्ये मिठाचा खडा पडलाच. एकमेकांचे अत्यंत जवळचे, घनिष्ठ मित्र म्हणून ओळखले जाणारे दोघेही तब्बल 9 महिने एकमेकांशी बोलले नाहीत, एकमेकांची तोंडही पाहिली नाहीत. पण झालेलं काय? दोघांमध्ये नेमकं कुठे बिनसलेलं?  याबाबत आता स्वतः दिग्दर्शक केदार शिंदेंनी सांगितलं आहे. एका मुलाखतीत बोलताना आपल्या जवळच्या मित्रासोबतच्या 9 महिन्यांच्या अबोल्यावर त्यांनी आपलं मन मोकळं केलं आहे. 

भरत जाधव यांच्यासोबतच्या अबोल्यावर केदार शिंदे काय म्हणाले? 

केदार शिंदे यांनी नुकतीच 'मुक्कामपोस्ट मनोरंजनला'ला मुलाखत दिली. यावेळी त्यांना अंकुश चौधरी, भरत जाधव आणि त्यांच्या मैत्रीविषयी विचारलं गेलं. त्यावेळी दिग्दर्शक केदार शिंदे भरत जाधव यांच्यासोबतच्या अबोल्यावर बोलताना म्हणाले की, "असं अंकुश चौधरीबरोबर झालं नाही. गेली 50 वर्षे आम्ही एकत्र होतो, अजूनही आहोत आणि यापुढेही 50 वर्ष एकत्र राहण्याची इच्छा आहे. जो काही वाद किंवा संवाद झाला होता, तो भरत जाधवबरोबर झाला होता. हे  मी ना मंजूर करणार नाही. मैत्रीत या गोष्टीसुद्धा घडतात".

"भरत माझ्याच बिल्डिंगमध्ये राहायचा. मी आठव्या मजल्यावर आणि भरत दहाव्या मजल्यावर राहत होता. ही 'सही रे सही' नाटकाच्या आधीची म्हणजेच, 2000 सालची गोष्ट आहे. आमच्या दोघांमध्ये काही मतभेद आणि गैरसमज झाले होते. आम्ही दोघे एकमेकांसमोर यायचो, मी त्याच्या समोरून जाताना त्याच्याकडे बघत नव्हतो आणि तोसुद्धा माझ्याकडे बघत नसायचा. आमचं कुटुंब एकमेकांबरोबर बोलायचे, माझी बायको आणि त्याची बायको एकमेकींबरोबर बोलत होत्या. पण मी भरतशी बोलत नव्हतो आणि तो माझ्याशी बोलत नव्हता.", असं केदार शिंदे म्हणाले. 

"मग आठ-नऊ महिन्यांनी अशी गोष्ट घडली की, आम्हालाही कळलं नाही आणि आम्ही पुन्हा बोलायला लागलो. त्यानंतर आम्ही परत एकत्र आलो. तर तेव्हा काय झालं होतं हे आता मला आठवत नाहीये आणि मला वाटतं भरतलासुद्धा ते आठवणार नाही. कुठल्या तरी गोष्टीमुळे गैरसमज झाले असतील", असं केदार शिंदे म्हणाले. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Cult Film Ashi Hi Banwa Banwi Shooting Kissa: 'अशी ही बनवाबनवी'चं शुटिंग कुठे झालेलं? लीलाबाई काळभोर यांचा बंगला नेमका आहे तरी कुठे?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Raj Thackeray Sena Bhavan हाकेच्या अंतरावर सेनाभवन,जायला 20 वर्ष, राज ठाकरे भावूक Special Report
Thackeray Brothers Vachanam Special Report ठाकरे बंधूंचा मुंबई महापालिकेसाठी वचननामा,सेनाभाजपची टीका
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Amit Thackeray on Balasaheb Sarvade MNS Solapur : बाळासाहेबांच्या हत्येप्रकरणी अमित ठाकरे आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
Embed widget