एक्स्प्लोर

KBC 17 Kid Ishit Bhatt May Facing Mental Illness: केबीसीमधला उद्धट मुलगा मानसिक आजारानं ग्रस्त? सुप्रसिद्ध मराठमोळ्या संगीतकाराच्या पोस्टनं वेधलं लक्ष...

KBC 17 Kid Ishit Bhatt May Facing Mental Illness: इशित गुजरातच्या गांधीनगरचा आहे. शोमध्ये येणापूर्वी कुणीच विचार केलेला नव्हता की, फक्त पाचवीत शिकणारा हा लहान मुलगा उर्मट आणि उद्धट असेल.

KBC 17 Kid Ishit Bhatt May Facing Mental Illness: टेलिव्हिजनवरचा प्रसिद्ध शो 'कौन बनेगा करोडपती'च्या (Kaun Banega Crorepati) एका एपिसोडमध्ये इशित भट्ट (Ishit Bhatt) हा पाचवीत शिकणारा मुलगा हॉटसीटवर आला होता. पण, सध्या तो सर्वांच्या चर्चेचा विषय ठरतोय. हॉटसीटवर आल्यानंतर त्या मुलाचं वागणं, बॉलिवूडच्या महानायकांशी अत्यंत उद्धट, उर्मटपणे बोलणं यामुळे तो साऱ्यांच्या नजरेत आला. तो ज्या पद्धतीनं बिग बींना उत्तरं देत होता, त्यावर अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. तर कित्येकांनी त्याच्या आई-वडिलांच्या (KBC Child Misbehavior) संस्कारांवर प्रश्न उपस्थित केले. पण, कदाचित त्याच्या वागण्याला इतरही काही गोष्टी कारणीभूत असू शकतात, याचा विचारच कुणी केला नाही. सध्या एका मराठमोळ्या संगीतकाराची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. ही पोस्ट जबरदस्त व्हायरल झाली आहे. 

इशित गुजरातच्या गांधीनगरचा आहे. शोमध्ये येणापूर्वी कुणीच विचार केलेला नव्हता की, फक्त पाचवीत शिकणारा हा लहान मुलगा उर्मट आणि उद्धट असेल. अमिताभ बच्चन यांच्यासोबत तो ज्या पद्धतीनं वागत होता, ते पाहून त्याच्या पालकांवर, त्यांच्या संस्कारांवर सर्वजण प्रश्न उपस्थित केले गेले. सोशल मीडियावर याचा हा उद्धटपणा पाहून सर्वजण जोरदार ट्रोलिंग केलं.  व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वांचा राग अनावर झाला. सोशल मीडियावर या व्हिडीओवर जोरदार प्रतिक्रिया आल्या. मात्र प्रसिद्ध मराठी संगीतकारानं या घटनेतला एक वेगळा पैली सर्वांसमोर आणला आहे. 

संगीतकार कौशल इनामदार यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.  इनामदार यांची पत्नी सुचित्रा एक मानसशास्त्रज्ञ आहे. कौशल इनामदारांनी सांगितल्यानुसार, त्यांनी हा व्हिडिओ पत्नीला दाखवला, त्यावर मुलाला ADHD म्हणजेच Attention Deficit Hyperactivity Disorder असावा अशी शक्यता व्यक्त केली. हा विकार साधारपणे बालवयापासून सुरू होतो. त्यानंतरही अनेक वर्षांपासून या मानसिक विकाराची लक्षणं राहतात. ज्यामध्ये मुल हायपर अॅक्टिव्ह असतं. वागणुकीत संतुलन राहत नाही.

संगीतकार कौशल इनामदारांची पोस्ट जशीच्या तशी 

"इंटरनेट कधीही विसरत नाही."

या उक्तीमध्ये एक करडं शहाणपण लपलंय. अशित भट्ट आणि त्याच्या आई-वडिलांना हे तथ्य पुढचा बराच काळ टोचत राहणार आहे. आत्ता इंटरनेटवर लगेचच याच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. 

'कौन बनेगा करोड़पती' या कार्यक्रमात अनेक लहान मुलांबरोबर गुजरातचा अशित भट हा सहावीतला मुलगाही सहभागी झाला होता. प्रश्न ऐकायच्या आधीच हा मुलगा काहीशा आगाऊपणे आणि उर्मटपणे उत्तरं देत होता. त्याच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर त्यांच्या मुलाचं कौतुक झळकत होतं. शेवटी एका प्रश्नाचं उत्तर त्याने असंच वरवर पाहता आत्मविश्वास वाटेल अशा उत्साहात दिलं आणि ते साफ चुकलं. हा त्याचा व्यवहार व्हायरल झाला आहे आणि फेसबुक, ट्विटरवरही अनेक लोकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. या दहा वर्षाच्या मुलाला उर्मट, obnoxious, privileged, म्हणण्यापासून त्याला आणि त्याच्या आई-वडिलांना अर्वाच्य शिव्या घालण्यापर्यंत लोकांनी हर तऱ्हेच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याच्या मीम्सही तयार झाल्या आहेत.

मी पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहिला तेव्हा राग आणि अस्वस्थता यांच्या मधली भावना जाणवली. अमिताभ बच्चन यांच्या लौकिकाचा राहु द्या परंतु त्यांच्या वयाचा तरी मान राखला जावा असं सतत वाटत होतं. 

माझी पत्नी सुचित्रा, जी एक सुविख्यात मानसशास्त्रज्ञ आहे, तिला ही क्लिप दाखवली. ती संपूर्ण क्लिप अतिशय शांतपणे तिने पाहिली आणि म्हणाली, "या मुलाला अतिशय तीव्र असा ADHD (Attention Deficit Hyperactivity Disorder) असावा."
तिच्या या उत्तरामुळे मी ती क्लिप पुन्हा एकदा पाहिली. या वेळी जरा अधिक लक्षपूर्वक आणि अधिक संवेदनशीलतेने. या विचारांती काही निरीक्षणं मनातल्या मनात नोंदवली ती आता तुमच्यापुढे मांडतो. 

या वीस वर्षांत काळ जितक्या झपाट्याने बदलला आहे तितका गेल्या दोनशे वर्षांतही बदलला नव्हता. आपल्या आयुष्याची गती, असलेली व्यवधानं यात प्रचंड वाढ झाली आहे. विशेषतः शहरांमधली परिस्थिती फार झपाट्याने बदलत गेली. घाई is the new normal. निवांतपणा is a myth. ट्रॅफिक, गर्दी, राग, चिडचिड, अधीरता, हे सगळंच वाढत गेलं. आधी मिडिया आणि नंतर सोशल मिडिया यांच्या वाढीमुळे ‘विचाराआधी अभिव्यक्ती’ आणि ‘सिद्धी आधी प्रसिद्धी’ अशी झाली. यांचा क्रम आणि hierarchy दोन्ही बदलू लागले. 

जितकं आयुष्य आपल्या हातातून निसटत चाललंय अशी भावना होते, तितकं ते आपल्या ताब्यात असल्याचा आभास आपण स्वतःच तयार करत राहतो. यातलीच एक गोष्ट म्हणजे ‘पेरेंटिंग’. आमच्या लहानपणी हे क्रियापद नव्हतं. Parenthood म्हणजे पालकत्व असं नाम होतं पण ही काही वेगळी क्रिया आहे असं नव्हतं. या पेरेंटिंगच्या नावाखाली जो सावळा गोंधळ घातला जातो त्याला तोड नाही असं माझं  गेल्या काही वर्षांतलं निरीक्षण आहे. सततचं स्टिम्युलेशन असलेल्या स्क्रीनच्या खुराकावर लहान लहान मुलं जेवत असतात; वाचन, खेळ यांचा अभाव. विभक्त कुटुंब असल्यामुळे मोठ्यांशी कसं वागावं याचा वस्तुपाठच या मुलांना मिळत नाही. कुठलीही ॲक्टिव्हिटी ही कुठल्यातरी वर्गाला, क्लासला, शिबिराला आउटसोर्स केलेली; कुटुंबाबरोबर गप्पा मारणं नाही - अशा नीरस आणि अस्वस्थ वातावरणात अनेक मुलं वाढत आहेत.  कुठल्याही प्रकारच्या ठहरावाचीही सवय करावी लागते. त्यात प्रत्येक पालकाला आपलं पोर प्रसिद्धीच्या झोतात आल्याशिवाय गत्यंतर नाही अशा समजात स्वतःची आणि त्या पोराची फरफट करत असतात. 

‘सारेगमप’ लिट्ल चॅम्प्सची निवड करत असताना मला असे पालक भेटायचेच पण एरवीही माझ्या कार्यशाळेत "आमचा राजू /राणी स्टेजवर कधी गाईल?" याची मुलांपेक्षा पालकांना घाई असते. आणि असंही नाही की या क्षेत्रात काही देदिप्यमान अथवा सखोल करावं अशी त्यांची इच्छा असते - केवळ स्पर्धेत टिकून रहावं याचसाठी ही खटपट. 

परवा कुणीतरी मला सांगत होतं की पुढच्या पिढीमध्ये ADHD, ऑटिझम, ॲस्पर्जस सिंड्रोम, डिप्रेशन आणि इतर मानसिक विकारांचं प्रमाण प्रचंड वाढणार आहे.  इशित भट्ट दहा वर्षांचा आहे. त्याची क्लिप नीट पाहिली तर लक्षात येतं की इतका टोकाचा आगाऊपणा आणि उर्मटपणा स्वभावात येण्यासाठी जे अनुभव यावे लागतात ते त्याने घेतलेही नाहीएत. मी अशी अनेक मुलं पाहिलेली आहेत.

त्याचा आगाऊपणा हा एक प्रकारचा डिफेन्स मेकॅनिझ्म आहे. तो मुलगा अतिशय घाबरलेला असावा आतून. तो आत्मविश्वाचा आव आणतोय पण आतून तो भेदरून गेला आहे. त्याचं हे असं वागणं ही कदाचित मदतीसाठी हाक असावी. शिव्या अनेकजण देतीलच पण कुणीतरी अशा सगळ्या आई-बापांना जाऊन सांगणं गरजेचं आहे की ही कृत्रिम प्रसिद्धी आहे. इशितला थेरपीची गरज आहे आणि तुम्हाला थोड्या धीराची. 

जे लोक या मुलावर किंवा त्याच्या आई-वडिलांवर तोंडसुख घेत आहेत त्यांनाही माझं जरा असं सांगणं आहे की टाइप करण्यापूर्वी उलटे शंभर आकडे मोजा.  आपलं फ्रस्ट्रेशन बाहेर काढण्याचे इतर अनेक मार्ग आहेत. सगळ्यांनी जरा दमाने घेण्याची आतोनात गरज आहे.

प्रसिद्धीचा प्रकाश झोत पचवण्याकरिता डोळ्यांना अंधाराची तपश्चर्या करावी लागते. नाहीतर डोळे मिटले तरी या प्रखर झोताचे अवशेष डोळ्यांना आणि मनाला बोचत राहतात. 'सर्वांना चांगली बुद्धी दे' ही प्रार्थना मला या काळात अतिशय सुयोग्य वाटते.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Disha Pardeshi Shared Screenshot: 'महाराष्ट्रात राहायची लायकी नाही…', मराठी अभिनेत्रीच्या बिकनीतल्या फोटोंवर ट्रोलरच्या घाणेरड्या कमेंट्स, स्क्रीनशॉट शेअर करत म्हणाली...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Ward Reservation: नाशिक महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर; दिग्गज नेत्यांचं टेन्शन मिटलं, पण शिंदे गटात गेलेल्यांना दणका, कुणाकुणाला फटका?
नाशिक महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर; दिग्गज नेत्यांचं टेन्शन मिटलं, पण शिंदे गटात गेलेल्यांना दणका, कुणाकुणाला फटका?
Dharmendra News: केवळ मैत्रीखातर सुपरस्टार धर्मेंद्रने मराठी चित्रपटासाठी ते गाणं शूट केलं, विक्रम गोखलेंसोबत अभिनय, कोणता होता 'तो' चित्रपट?
केवळ मैत्रीखातर सुपरस्टार धर्मेंद्रने मराठी चित्रपटासाठी ते गाणं शूट केलं, विक्रम गोखलेंसोबत अभिनय, कोणता होता 'तो' चित्रपट?
Video: एकनाथ शिंदेंचा सुनील राऊतांना फोन, संजय राऊतांच्या प्रकृतीची विचारपूस, म्हणाले, लवकर बरे व्हा
Video: एकनाथ शिंदेंचा सुनील राऊतांना फोन, संजय राऊतांच्या प्रकृतीची विचारपूस, म्हणाले, लवकर बरे व्हा
Jayant Patil: निवडणुका जाहीर होताच जयंत पाटलांनी मोठा डाव टाकला; सांगलीतील भाजपचे निष्ठावंत गळाला लावले, शरद पवार गटाची ताकद वाढली
निवडणुका जाहीर होताच जयंत पाटलांनी मोठा डाव टाकला; सांगलीतील भाजपचे निष्ठावंत गळाला लावले, शरद पवार गटाची ताकद वाढली
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Delhi Car Blast: दिल्ली स्फोटातील त्या कारचा प्रवास कसा झाला?
Delhi Blast Car: दिल्ली स्फोट प्रकरणातील डॉक्टर उमरचा कारचा सीसीटीव्ही समोर
Delhi Blast Probe: दिल्ली स्फोटाचा तपास NIA कडे, Amit Shah यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक
Delhi Blast Probe: दिल्ली स्फोटाचा तपास NIA कडे, गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय.
TOP 100 Headlines : टॉप 100 बातम्यांचा आढावा : 11 NOV 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Ward Reservation: नाशिक महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर; दिग्गज नेत्यांचं टेन्शन मिटलं, पण शिंदे गटात गेलेल्यांना दणका, कुणाकुणाला फटका?
नाशिक महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर; दिग्गज नेत्यांचं टेन्शन मिटलं, पण शिंदे गटात गेलेल्यांना दणका, कुणाकुणाला फटका?
Dharmendra News: केवळ मैत्रीखातर सुपरस्टार धर्मेंद्रने मराठी चित्रपटासाठी ते गाणं शूट केलं, विक्रम गोखलेंसोबत अभिनय, कोणता होता 'तो' चित्रपट?
केवळ मैत्रीखातर सुपरस्टार धर्मेंद्रने मराठी चित्रपटासाठी ते गाणं शूट केलं, विक्रम गोखलेंसोबत अभिनय, कोणता होता 'तो' चित्रपट?
Video: एकनाथ शिंदेंचा सुनील राऊतांना फोन, संजय राऊतांच्या प्रकृतीची विचारपूस, म्हणाले, लवकर बरे व्हा
Video: एकनाथ शिंदेंचा सुनील राऊतांना फोन, संजय राऊतांच्या प्रकृतीची विचारपूस, म्हणाले, लवकर बरे व्हा
Jayant Patil: निवडणुका जाहीर होताच जयंत पाटलांनी मोठा डाव टाकला; सांगलीतील भाजपचे निष्ठावंत गळाला लावले, शरद पवार गटाची ताकद वाढली
निवडणुका जाहीर होताच जयंत पाटलांनी मोठा डाव टाकला; सांगलीतील भाजपचे निष्ठावंत गळाला लावले, शरद पवार गटाची ताकद वाढली
सिंचन घोटाळ्यातून फडणवीसांनी तुम्हाला बाहेर काढलं, पार्थ पवार जमिनीप्रकरणात अंजंली दमानिया गौप्यस्फोट करणार
सिंचन घोटाळ्यातून फडणवीसांनी तुम्हाला बाहेर काढलं, पार्थ पवार जमिनीप्रकरणात अंजली दमानिया गौप्यस्फोट करणार
BMC Election 2025 Uddhav Thackeray Eknath Shinde: देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेत एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंचे किती नगरसेवक?; A टू Z माहिती
देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेत एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंचे किती नगरसेवक?; A टू Z माहिती
परभणी महापालिकेसाठी आरक्षण सोडत, दिग्गजांना धक्का; 65 पैकी 33 जागांवर महिलांना संधी
परभणी महापालिकेसाठी आरक्षण सोडत, दिग्गजांना धक्का; 65 पैकी 33 जागांवर महिलांना संधी
मी नशिबवान, अजित दादांचा कार्यकर्ता हे पद माझ्यासाठी सर्वोच्च; अमोल मिटकरी म्हणाले हकालपट्टी नाही
मी नशिबवान, अजित दादांचा कार्यकर्ता हे पद माझ्यासाठी सर्वोच्च; अमोल मिटकरी म्हणाले हकालपट्टी नाही
Embed widget