Web series : अॅक्शन, ड्रामा आणि थ्रीलची मेजवानी; 'या' धमाकेदार वेब सीरिज येणार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस
Web series on OTT : ओटीटीवरील या वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहेत.
Web series on OTT : ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या वेब सीरिजला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. वेगवेगळ्या विषयांवर अधारीत असलेल्या वेब सीरिज प्रेक्षकांचे नेहमी मनोरंजन करतात. लवकरच काही वेब सीरिज या प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
रूद्रा (Rudra)
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण रूद्रा या वेब सीरिजमधून ओटीटीवर पदार्पण करणार आहे. या सीरिजमध्ये अजयसोबतच अभिनेत्री ईशा देओल देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. लवकरच ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून अजय आणि ईशाची जोडी या सीरिजमध्ये पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
कौन बनेगी शिखरवती (Kaun Banegi Shikharwati)
ही वेब सीरिज झी 5 या ओटीटी प्लॅटफोर्मवर 7 जानेवारीला प्रदर्शित झाली. या सीरिजमध्ये नसीरुद्दीन शाह, सोहा अली खान, लारा दत्ता, कृतिका कामरा आणि रघुबीर यादव यांसारख्ये अनेक प्रसिद्ध कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारणारली आहे.
Finding Anamika
अजय देवगण प्रमाणेच आता माधुरी दिक्षीत देखील ओटीटीवर पदार्पण करणार आहे. Finding Anamika या सीरिजमध्ये माधुरीसोबतच संजय कपूर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.नेटफ्लिक्सवर ही वेब सीरिज प्रदर्शित होणार आहे.
Ye Kali Kali Aankhen
या वेब सीरिजमध्ये ताहिरा राज आणि श्वेता त्रिपाठी प्रमुख भूमिका साकरणार आहेत. ही एक सायकोलॉजी थ्रिलर वेब सीरिज असणार आहे, 14 जानेवारीला ही सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजच्या टिझरला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.
संबंधित बातम्या
Best 5 Psychological Thriller Movies : आवर्जून पाहावेत असे सायकोलॉजिकल थ्रिलर टॉप 5 सिनेमे!
OTT Releases in January : या महिन्यात ओटीटीवर प्रदर्शित होणार 'हे' सिनेमे आणि वेबसीरिज
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha