![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Katrina Kaif, Vicky Kaushal : कतरिनानं शेअर केले मालदीवमधील फोटो; नेटकरी म्हणाले, 'विकी कुठंय?'
Katrina Kaif : नुकतीच कतरिनानं एक पोस्ट शेअर केली आहे.या पोस्टला अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.
![Katrina Kaif, Vicky Kaushal : कतरिनानं शेअर केले मालदीवमधील फोटो; नेटकरी म्हणाले, 'विकी कुठंय?' katrina kaif finally shares her pics from maldives fans want to know where is Vicky Kaushal Katrina Kaif, Vicky Kaushal : कतरिनानं शेअर केले मालदीवमधील फोटो; नेटकरी म्हणाले, 'विकी कुठंय?'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/25/939df8582a4c39bc35bd6e46a3664319_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Katrina Kaif,Vicky Kaushal : अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) यांचा विवाह सोहळा काही दिवसांपूर्वी पार पडला. कतरिना आणि विकी एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करतात. नुकताच कतरिनानं तिचा मालदीवमधील फोटो शेअर केला. या फोटोवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.
कतरिनाने तिचा मालदीवमधील फोटो शेअर करून त्याला कॅप्शन दिले, 'माय हॅप्पी प्लेस'. या फोटोमध्ये कतरिना डार्क ग्रीन कलरचा शर्ट आणि व्हाईट प्रिंटेड शॉर्ट्स अशा लूकमध्ये दिसत आहे. या फोटोला अनेक नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'हनिमूनच्या फोटोमध्ये विकी कुठंय? ' तर दुसऱ्यानं कमेंट केली, 'क्विन ऑफ मिलियन हार्ट्स'
राजस्थानच्या बरवारा येथील सिक्स सेन्सेस फोर्टमध्ये कतरिना आणि विकीने लग्नगाठ बांधली. त्यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो कतरिना आणि विकीने सोशल मीडियावर शेअर केले होते. विकी आणि कतरिनाच्या लग्नाला नेहा धुपिया, अंगद बेदी, कबीर खान, मिनी माथूर, गुरदास मान आणि शर्वरी वाघ या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. कतरिना लवकरच 'मेरी ख्रिसमस' आणि 'टायगर 3' या तिच्या आगामी चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
View this post on Instagram
संबंधित बातम्या
Money Heist चा जगभरात डंका; नेटफ्लिक्सवर 670 कोटी तास पाहण्यात आलेली सीरिज
Katrina Kaif Mangalsutra : कतरिनाच्या मंगळसूत्राची किंमत ऐकून व्हाल थक्क; पाहा काय आहे खास
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)