Katrina Kaif Mangalsutra : कतरिनाच्या मंगळसूत्राची किंमत ऐकून व्हाल थक्क; पाहा काय आहे खास
Katrina Kaif Mangalsutra: कतरिनाच्या मंगळसूत्राने अनेकांचे लक्ष वेधले होते.
![Katrina Kaif Mangalsutra : कतरिनाच्या मंगळसूत्राची किंमत ऐकून व्हाल थक्क; पाहा काय आहे खास katrina-kaif-mangalsutra-price share photo on social media Katrina Kaif Mangalsutra : कतरिनाच्या मंगळसूत्राची किंमत ऐकून व्हाल थक्क; पाहा काय आहे खास](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/10/0ed9a1365acb1ed2dc22500624794485_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Katrina Kaif Mangalsutra: अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) यांचा विवाह सोहळा काही दिवसांपूर्वी पार पडला. कतरिना आणि विकी एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करतात. काही दिवसांपूर्वी कतरिनाने एक खास फोटो शेअर केला होता. या फोटोमधील तिच्या मंगळसूत्राने अनेकांचे लक्ष वेधले. जाणून घेऊयात कतरिनाच्या या मंगळसूत्राची किंमत...
रिपोर्टनुसार, कतरिनाच्या या डिझायनर मंगळसूत्राची किंमत पाच लाख रूपये आहे. हे हिऱ्यांनी तयार केलेले मंगळसूत्र डिझाईनर सब्यसाची यांच्या बंगाल टायगर कलेक्शनमधील आहे. हे मंगळसूत्र काळ्या आणि सोनेरी अशा मोत्यांनी बनलेले आहे ज्यामध्ये खाली दोन हिरे लावले आहेत.
View this post on Instagram
राजस्थानच्या बरवारा येथील सिक्स सेन्सेस फोर्टमध्ये कतरिना आणि विकीने लग्नगाठ बांधली. त्यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो कतरिना आणि विकीने सोशल मीडियावर शेअर केले होते. एका रिपोर्टनुसार, लग्नानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफ त्यांच्या नवीन घरात शिफ्ट झाले आहेत. कतरिना 'मेरी ख्रिसमस' आणि 'टायगर 3' या तिच्या आगामी चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
संबंधित बातम्या
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)