Top Actors OTT In 2022 : कार्तिक आर्यनपासून ते कुणाल खेमूपर्यंत 'या' कलाकारांनी ओटीटीवर धुमाकूळ घातला; येथे आहे संपूर्ण यादी
Top Actors OTT In 2022 : यावर्षी ओटीटीवर रिलीज होणाऱ्या अनेक उत्कृष्ट प्रोजेक्टसह, चित्रपटातील कलाकारांच्या कामालाही प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले.
Top Actors OTT In 2022 : यावर्षी, कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि कुणाल खेमूने (Kunal Khemu) OTT वर प्रदर्शित केलेल्या त्यांच्या चित्रपटांमधून जबरदस्त काम करून चाहत्यांना खूश करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. या अभिनेत्यांसह इतर अनेक कलाकारांनीही ओटीटीवर आपला दबदबा निर्माण केला आहे. कार्तिक आर्यन, कुणाल खेमूशिवाय यावर्षी इतर कोणते अभिनेते प्रेक्षकांना खूप आवडले ते जाणून घ्या.
कुणाल खेमू (Kunal Khemu)
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमू, ज्याने 'कलयुग'मध्ये आपल्या दमदार अभिनयाची झलक दाखवली, त्याला या वर्षी OTT प्लॅटफॉर्म G5 वर आलेल्या 'अभय 3' (Abhay 3) मधील 'अभय प्रताप सिंह' या भूमिकेसाठी लोकांनी प्रचंड पसंती दिली. यामध्ये कुणाल खेमूबरोबर इतर अनेक कलाकारांनीही आपल्या अप्रतिम अभिनयाची चुणूक दाखवली.
कार्तिक आर्यन (Kartik Aaryan)
कार्तिक आर्यन, बॉलीवूडमधील त्याच्या वेगळ्या धाटणीच्या सिनेमांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. हा चित्रपट क्षेत्रातील एक अतिशय अनुभवी अभिनेता आहे. कार्तिक आर्यनने यावर्षी नेटफ्लिक्सवर 'धमाका' आणि डिस्ने + हॉटस्टारवर रिलीज झालेल्या 'फ्रेडी'ने प्रेक्षकांची मने जिंकली. याचबरोबर कार्तिकच्या अभिनयाचेही खूप कौतुक झाले आहे.
झैन दुर्रानी झैन दुर्रानी (Zain Durrani)
चित्रपटसृष्टीत दिसणारा झैन दुर्रानी झैन दुर्रानी हासुद्धा एक चांगला अभिनेता आहे. या वर्षी, झैन दुर्रानीने ZEE5 वर प्रसारित होणाऱ्या 'मुखबीर' मध्ये त्याच्या दमदार कामाने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
इश्वाक सिंग (Ishwak Singh)
'पाताल लोक' या प्रसिद्ध वेब सीरिजमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेला इश्वाक सिंग याला सोनी लिव्हवर (Sony Liv) प्रदर्शित झालेल्या 'रॉकेट बॉईज' आणि 'होमी जहांगीर भाभा' या चित्रपटातील त्याच्या उत्कृष्ट अभिनयामुळे खूप पसंती मिळाली होती.
ताहिर राज भसीन (Tahir Raj Bhasin)
या वर्षी नेटफ्लिक्सवर प्रसारित झालेल्या 'ये काली काली आंखे' मधील ताहिर राज भसीनच्या पात्राने चाहत्यांची मने जिंकण्यात कोणतीही कसर सोडली नाही. त्याच्या आकर्षक अभिनयाला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. या चित्रपटाने ताहिरला एक नावाजलेला चेहरा बनवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :