Karisma Kapoor Sunjay Kapoor Divorce Reason: शारीरिक हिंसाचार, मित्रांसोबत बायकोचा सौदा; हादरवणाऱ्या कारणांमुळे करिष्मानं संजय कपूर यांना दिलेला घटस्फोट
Karisma Kapoor-Sunjay Kapoor Divorce Reason: संजय कपूरनं 2003 मध्ये करिश्मा कपूरशी लग्न केलं. पण, 13 वर्षांच्या सुखी संसारानंतर दोघांचा घटस्फोट झाला. करिश्मानं संजय कपूर यांच्यावर खूप गंभीर आरोप केलेले.

Karisma Kapoor-Sunjay Kapoor Divorce Reason: बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचे (Bollywood Actress Karisma Kapoor) एक्स-हजबँड बिझनेसमन संजय कपूर (Businessman Sanjay Kapoor) यांचं निधन झालंय. युकेमध्ये पोलो खेळताना संजय कपूर (Sanjay Kapoor) यांना हृदय विकाराचा झटका (Heart Attack) आल्यामुळे त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती मिळत आहे. वयाच्या 53व्या वर्षी संजय कपूर यांनी जग सोडलं. संजय कपूर आणि करिष्मा कपूर यांनी 2003 मध्ये लग्न केलेलं. पण, लग्नाच्या 13 वर्षांनी 2016 मध्ये दोघांनीही नात्याचा दी एन्ड करण्याचा निर्णय घेतला. दोघांनाही दोन मुलं आहेत. पण, घटस्फोटानंतर दोन्ही मुलांची कस्टडी करिष्मा कपूरला मिळाली.
करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचा विवाहसोहळा मुंबईत मोठ्या थाटामाटात पार पडला. तब्बल 13 वर्ष दोघांनीही संसाराचा गाडा लोटला, पण त्यानंतर मात्र त्यांच्या नात्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या. अखेर अभिनेत्रीनं घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. घटस्फोटावेळी करिष्मानं संजय कपूर यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते, ज्यात शारीरिक हिंसाचारापासून ते अगदी तिचा सौदा करण्यापर्यंतचे अनेक खळबळजनक आरोप करिष्मानं बिझनेस टायकून संजय कपूर यांच्यावर केले होते.
करिश्मा कपूरचे संजय कपूर यांच्यावर गंभीर आरोप
मीडिया रिपोर्ट्सनुसार, करिश्मा कपूरनं संजय कपूर यांच्यावर खळबळजनक आरोप केला होता की, त्या व्यावसायिकानं हनिमूनवर अभिनेत्रीचा 'लिलाव' केला होता. अभिनेत्रीनं असाही दावा केलेला की, संजय कपूर यांनी तिला त्यांच्या मित्रासोबत झोपण्यास भाग पाडलं होतं, ज्यासाठी त्याच्या मित्रांनी बोली लावली होती. 2016 मध्ये, करिश्मानं संजय आणि त्यांच्या आईविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा खटलाही दाखल केला होता.
अनेक खळबळजनक आणि हादरवणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर त्यांच्या दोन्ही मुलांची कस्टडी करिश्मा कपूरला मिळाली.
अभिनेत्रीला मिळालेला दोन्ही मुलांचा ताबा
करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांना दोन मुलं आहेत. लग्नानंतर दोन वर्षांनी, 2005 मध्ये, त्यांना समायरा नावाची मुलगी झाली. 2011 मध्ये करिश्मा आणि संजय यांना कियान नावाचा मुलगा झाला. करिश्मानं घटस्फोटाचा अर्ज दाखल केला, त्यावेळी तिनं मुलांचा ताबाही मागितला. न्यायालयानं अभिनेत्रीच्या बाजूनं निकाल दिला आणि दोन्ही मुलांचा ताबा तिच्याकडे सोपवला.
करिश्मापासून घटस्फोट घेतल्यानंतर संजय कपूर यांनी तिसरं लग्न केलं
संजय कपूर यांच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर, करिश्मा कपूरनं पुन्हा लग्न केलं नाही. ती तिच्या दोन्ही मुलांचा सांभाळ सिंगल मदत म्हणून करत आहे. घटस्फोटानंतर फक्त एका वर्षातच संजय कपूर यांनी प्रिया सचदेवासोबत तिसरं लग्न केलं. करिश्मा कपूरशी लग्न करण्यापूर्वी संजय कपूर यांनी फॅशन डिझायनर नंदिता महतानीशी लग्न केलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Sunjay Kapur Death: करिष्मा कपूरचे एक्स हसबँड बिझनेसमन संजय कपूर यांचं निधन; हार्ट अटॅकनं निधन























