लग्न नाही, बायको नाही, तरी 'ही' टेक्निक वापरून 2 मुलांचा बाप, करण जोहर 'सिंगल पॅरेन्ट' कसा झाला? थक्क करणारी कहाणी!
Karan Johar : करण जोहर हा दोन मुलांचा पालक आहे. त्याच्या मुलाचे वय यस तर मुलीचे वय रुही असे आहे. मात्र त्याने लग्न केलेलं नाही.
मुंबई : चित्रपट निर्मात आणि दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) याला संपूर्ण भारत ओळखतो. त्याने भारतीय सिनेसृष्टीला अनेक हिट चित्रपट दिलेले आहेत. त्याचा 'कॉफी विथ करण' हा कार्यक्रमही चांगलाच प्रसिद्ध आहे. तो या कार्यक्रमात अनेक दिग्गज अभिनेते-अभिनेत्रींशी चर्चा करतो. तो आज कोट्यवधीचा मालक आहे. मात्र अजूनही त्याने लग्न केलेले नाही. पण लग्न न करताही तो दोन मुलांचा पालक आहे. म्हणजेच तो सिंगल पॅरेन्ट आहे. दरम्यान, त्याची ही दोन्ही मुलं मोठी झाली असली तरी तो लग्न न करता, पत्नी नसताना वडील कसा झाला? असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे.
2017 साली घेतला वडील होण्याचा निर्णय
करण जोहर हा 50 च्या पुढे गेला आहे. अजूनही त्याने लग्न केलेले नाही. पण त्याला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन आपत्यं आहेत. 2017 मध्ये सरोगसी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्याला ही दोन आपत्यं झालेली आहेत. करण जोहरच्या मुलाचे वय यश आहे. तर त्याच्या मुलीचे नाव रुही आहे. दोघांचाही तो मोठ्या आनंदाने सांभाळ करतो.
सिंगल पॅरेन्ट होण्याचा निर्णय का घेतला?
करण जोहर त्याच्या आईसोबत या दोन्ही मुलांचा सांभाळ करतो. त्याने सिंगल पॅरेन्ट होण्याचा निर्णय का घेतला? याबाबत सविस्तर सांगितले आहे. मी 40 वर्षांचा असताना माझ्या आईने मला काही प्रश्न विचारले. लग्नाबाबत सध्याच विचार नसल्यामुळे तू तुझ्या आयुष्याबाबत काय विचार करतोय? तुझे आयुष्याची प्लॅनिंग काय आहे? असे माझ्या आईने मला विचारले.त्यानंतर मला खरंच मुलं हवी आहेत. मला मुलं असावीत असं वाटतंय, असं मी माझ्या आईला सांगितले. सरोगसीविषयी माझी आई उत्सुक होती. पण मीच थोडा वेळ घेत होतो," अशी माहिती करण जोहरने दिली.
Karan Johar Kids :
View this post on Instagram
दिग्गजांसोबत केलंय काम
दरम्यान, करण जोहरने सलमान खान, शाहरुख खान, आलीया भट्ट, करिना कपूर अशा बॉलिवूडमधील मोठ्या चेहऱ्यांसोबत काम केलेले आहे. त्याने दिग्दर्शित केलेल्या कभी खुशी कभी गम या चित्रपटाला नुकतेच 23 वर्षे पूर्ण झाली आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, शाहरुख खान, करिना कपूर, काजल, ऋतिक रोशन अशा बड्या अभित्यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली होती. हा चित्रपट आजही अनेकजण आवडीने पाहतात.
हेही वाचा :
Taapsee Pannu Pics: अभिनेत्री तापसी पन्नूचा बॉसी लूक; फोटो पाहून चाहते घायाळ!