एक्स्प्लोर

Dhurandhar 2: धुरंधरमध्ये वापरलं 40 वर्ष जुनं पाकिस्तानी गाणं; संजय दत्तच्या फक्त 2 मिनिटांसाठी गायकाला दिले तब्बल 45 लाख रुपये

धुरंधर’च्या प्रचंड यशानंतर आता ‘धुरंधर द रिवेंज’ हा चित्रपट 19 मार्चला रिलीज होणार आहे. या चित्रपटात संजय दत्त, रणवीर सिंह, आर. माधवन आणि अर्जुन रामपाल महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

Dhurandhar 2: धुरंधर’ (Dhurandhar) या चित्रपटाने केवळ कथा, कलाकार किंवा अ‍ॅक्शनमुळेच नाही तर गाण्यांमुळेही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटात बॉलिवूड गाण्यांसोबतच आंतरराष्ट्रीय ट्रॅक्सचाही समावेश करण्यात आला होता. विशेष म्हणजे या चित्रपटात एका पाकिस्तानी गाण्याचाही वापर करण्यात आला आहे. चित्रपटात रणवीर सिंहवर चित्रित करण्यात आलेलं ‘रंभा हो’ हे जुनं गाणं आणि अक्षय खन्नावर चित्रित झालेलं बहरीनमधील ‘FA9LA’ हे गाणं प्रेक्षकांना प्रचंड आवडलं. मात्र सर्वाधिक चर्चा झाली ती संजय दत्तच्या एंट्री सीनमध्ये वापरण्यात आलेल्या ‘हवा हवा’ या गाण्याची. जवळपास 38 वर्ष जुनं असलेलं हे गाणं पुन्हा एकदा चर्चेत आलं.

पाकिस्तानी गायकाचं गाणं ‘धुरंधर’मध्ये

‘हवा हवा’ हे गाणं पाकिस्तानी गायक हसन जहांगीर यांनी गायलेलं आहे. संजय दत्तच्या एंट्री सीनमध्ये हे गाणं वापरण्यात आलं असून प्रेक्षकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे या जवळपास दोन मिनिटांच्या गाण्यासाठी ‘धुरंधर’च्या निर्मात्यांनी गायकाला तब्बल 50 हजार डॉलर सुमारे 45 लाख रुपये दिले होते.

गाण्यासाठी घेतलेली अधिकृत परवानगी

अलीकडेच हसन जहांगीर यांनी ARY डिजिटलच्या रमजान स्पेशल कार्यक्रम ‘शान-ए-सहूर’ मध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी ‘धुरंधर’मध्ये त्यांच्या 1987 मधील हिट गाण्याचा वापर कसा झाला याबद्दल खुलासा केला. त्यांनी सांगितलं की, “हो, निर्मात्यांनी मला 50 हजार डॉलर दिले होते. त्यांनी आधी परवानगीही घेतली. पूर्वी कॉपीराइटची व्यवस्था नव्हती, पण आता माझं गाणं वापरण्यापूर्वी लोक परवानगी घेतात आणि पैसेही देतात. ‘हवा हवा’ मी 1986 मध्ये रेकॉर्ड केलं होतं आणि 1987 मध्ये ते रिलीज झालं.” ‘धुरंधर’च्या प्रचंड यशानंतर आता ‘धुरंधर द रिवेंज’ हा चित्रपट 19 मार्चला रिलीज होणार आहे. या चित्रपटात संजय दत्त, रणवीर सिंह, आर. माधवन आणि अर्जुन रामपाल महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. या चित्रपटातही काही जुन्या गाण्यांचा वापर करण्यात आला असून त्याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Thalapathy Vijays Jana Nayagan: 'जना नायगन'चा शनिवारीही जलवा; हॉलिवूडच्या 'स्पायडर - मॅन'ला दिली टक्कर, किती कोटी कमावले?
'जना नायगन'चा शनिवारीही जलवा; हॉलिवूडच्या 'स्पायडर - मॅन'ला दिली टक्कर, किती कोटी कमावले?
Sai Pallavi Sita Sister Actress: साई पल्लवीपेक्षा मागे उभारलेल्या 'या' अभिनेत्रीची चर्चा ; सीतेपेक्षा जास्त भाव खाऊन गेली, कोण आहे ही अभिनेत्री?
साई पल्लवीपेक्षा मागे उभारलेल्या 'या' अभिनेत्रीची चर्चा ; सीतेपेक्षा जास्त भाव खाऊन गेली, कोण आहे ही अभिनेत्री?
OTT Free webseries: प्राइम व्हिडीओवर मोफत उपलब्ध 'या' 7 वेब सीरिज चुकवू नका; क्राइम, कॉमेडी, रोमान्स सगळंच आहे!
प्राइम व्हिडीओवर मोफत उपलब्ध 'या' 7 वेब सीरिज चुकवू नका; क्राइम, कॉमेडी, रोमान्स सगळंच आहे!
Cocktail 2 OTT Release: थिएटरनंतर आता OTT वर धुमाकूळ! शाहिद कपूर-कृती सेननचा 'कॉकटेल 2' कधी आणि कुठे रिलीज होणार?
थिएटरनंतर आता OTT वर धुमाकूळ! शाहिद कपूर-कृती सेननचा 'कॉकटेल 2' कधी आणि कुठे रिलीज होणार?

व्हिडीओ

Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Jantar Mantar protests: जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
Pune Crime News: जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
Ethanol Blended Petrol : ...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
Embed widget