Kanika Kapoor Wedding : बेबी डॉल गर्ल कनिका कपूर दुसऱ्यांदा चढली बोहल्यावर; विवाह सोहळ्याचे फोटो व्हायरल
कनिका (Kanika Kapoor) आणि गौतम यांचा विवाह सोहळा लंडन येथे पार पडला.
![Kanika Kapoor Wedding : बेबी डॉल गर्ल कनिका कपूर दुसऱ्यांदा चढली बोहल्यावर; विवाह सोहळ्याचे फोटो व्हायरल kanika kapoor gautam wedding bride looks photo viral on social media Kanika Kapoor Wedding : बेबी डॉल गर्ल कनिका कपूर दुसऱ्यांदा चढली बोहल्यावर; विवाह सोहळ्याचे फोटो व्हायरल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/21/c570b885d8b7dec7b8a4dd8c4cfe65fe_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kanika Kapoor Wedding : प्रसिद्ध गायिका कनिका कपूरचा (Kanika Kapoor) नुकताच विवाह सोहळा पार पडला आहे. कनिकानं गौतम हथिरामानीसोबत (Gautam Hathiramani ) शुक्रवारी (20 मे)लग्नगाठ बांधली. कनिका आणि गौतम यांचा विवाह सोहळा लंडन येथे पार पडला. त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो नुकतेच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
कनिका ही 43 वर्षाची आहे. राज चंदोक या पहिल्या पतीसोबत किनकानं 2012 साली घटस्फोट घेतला. कनिका आणि राजला तीन मुलं आहेत. त्यानंतर कनिकता मुंबईमध्ये आली. तिचं 'जुगनी जी' हे गाणं रिलीज झालं. कनिकाच्या गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत होती. बेबी डॉल या गाण्यामुळे कनिकाला विशेष लोकप्रियता मिळाली.
गेली काही वर्ष कनिका ही गौतम हथिरामानीला डेट करत होती. गौतम हा एक बिझनेसमॅन आहे. संगीतकार मनमीत सिंहनं कनिका आणि गौतम यांच्या लग्न सोहळ्याला हजेरी लावली होती. या सोहळ्यामधील फोटो शेअर करुन मनमीतनं कनिकाला शुभेच्छा दिल्या. त्यानं फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिले, 'तुमचा हा नवा प्रवास चांगला असेल. तुम्हाला शुभेच्छा. ' कनिकानं पिंक लेहेंगा आणि गोल्डन ज्वेलरी असा रॉयल लूक लग्न सोहळ्यासाठी केला होता.
View this post on Instagram
किनकाच्या चिट्टींया कलाईयां, टुकूर टुकूर, गेंदा फूल या गाण्यांना देखील विशेष पसंती मिळाली.
हेही वाचा :
- Entertainment News Live Updates 19 May: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
- Jr NTR : ज्युनियर एनटीआरच्या बिग बजेट चित्रपटाची घोषणा! धमाकेदार मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला!
- Cannes Film Festival 2022 : ती गुलाबी परी जणू... ‘कान्स चित्रपट महोत्सवात’ ऐश्वर्या रायच्या सौंदर्याचा जलवा!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)