National Film Awards 2023: 'अनेक अडचणी येऊनही तो डगमगला नाही...'; निखिल महाजनने राष्ट्रीय पुरस्कार पटकावल्यानंतर जितेंद्र जोशीची खास पोस्ट
National Film Awards 2023: निखिल महाजनला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर करण्यात आल्यानंतर जितेंद्र जोशीनं एक खास पोस्ट शेअर करुन त्याचं अभिनंदन केलं.
National Film Awards 2023: 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची (National Film Awards 2023) घोषणा काल (24 ऑगस्ट) करण्यात आली आहे. अनेक भाषांमधील चित्रपटांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर नाव कोरलं आहे. काही मराठी चित्रपटांनी देखील राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावला आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन या श्रेणीतील राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार निखिल महाजनला गोदावरी या चित्रपटासाठी जाहीर करण्यात आला आहे. निखिल महाजनला (Nikhil Mahajan) राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर करण्यात आल्यानंतर जितेंद्र जोशीनं (Jitendra Joshi) एक खास पोस्ट शेअर करुन त्याचं अभिनंदन केलं.
जितेंद्र जोशीची पोस्ट
जितेंद्र जोशीनं इन्स्टाग्रामवर निखिल महाजनचे काही फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'अनेक अडचणी येऊनही तो डगमगला नाही. अयशस्वी झाल्यावर त्याने हार मानली नाही. ज्यांना सिनेमा हे माध्यम आवडते आणि त्याबद्दल प्रेम आहे ते हार मानत नाहीत कारण त्यांना माहित आहे की, ही अशी प्रक्रिया आहे जी त्यांच्यासाठी एकजुटीवर विश्वास ठेवणार्या उत्कट लोकांसह वाट पाहत आहे.'
पुढे त्यानं पोस्टमध्ये लिहिलं, 'उमेश कुलकर्णी,सुहृद गोडबोले, रंगा गोडबोले pune52 ची निर्मिती करून तुम्ही त्याला डेब्यू करण्याची संधी दिली. असे बरेच लोक आहेत ज्यांची मला माहिती नाहीत. त्याच्या प्रवासात त्याला प्रेरणा देणारे सर्व लोक आणि समीक्षक सर्वांचे आभार. प्राजक्त देशमुख तुम्ही त्याच्यासोबत लिहिले आहे आणि तुमचा सहवास दीर्घकाळ टिकेल अशी माझी इच्छा आहे. गोदावरी कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचाही हे कष्ट आहेत. तुम्हा सर्वांचे आभार. चियर्स निखिल महाजन, तेरे को मिला मतलब मेरे को मिला Faqra se Seena tann gayaa'
View this post on Instagram
गोदावरी या चित्रपटात अभिनेता जितेंद्र जोशीसोबतच (Jitendra Joshi) विक्रम गोखले, नीना कुळकर्णी, संजय मोने, प्रियदर्शन जाधव, गौरी नलावडे (Gauri Nalawade) या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. अनेकांनी या चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाचं तसेच या चित्रपटाच्या कथानकाचं कौतुक केलं.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: