Kaali Poster Controversy : भारताच्या आक्षेपानंतर काली चित्रपटाच्या पोस्टरवर कॅनडाच्या म्युझियमची प्रतिक्रिया, काय म्हटलं जाणून घ्या...
Kaali Poster Controversy : टोरंटोस्थित चित्रपट निर्मात्या लीना मणिमेकलाई (Leena Manimekalai) यांच्या ‘काली’ (Kaali) या लघुपटाच्या वादग्रस्त पोस्टरमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
Canadian Museum Reacted on 'Kaali' Poster : टोरंटोमधील चित्रपट निर्मात्या लीना मणिमेकलाई (Leena Manimekalai) यांच्या ‘काली’ (Kaali) या शॉर्ट फिल्मच्या पोस्टमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या पोस्टरवर आता कॅनडाच्या म्युझियमने प्रतिक्रिया दिली आहे. टोरंटो स्थित आगा खान संग्रहालयाने (Aga Khan Museum) हिंदू आणि इतर धर्मांचा अनावधानाने अपमान केल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे. भारतीयांनी 'काली'च्या पोस्टरवर आक्षेप नोंदवला होता.
म्युझियमने एका निवेदनात म्हटलं आहे की, टोरंटो मेट्रोपॉलिटन युनिव्हर्सिटीच्या 'अंडर द टेंट' प्रकल्पाअंतर्गत आगा खान संग्रहालयाने कलेच्या माध्यमातून विविध देशांमधील संस्कृती एकत्र आणत चालना देण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सर्व धर्मांचा आणि संस्कृतीचा आदर करणं हा अविभाज्य भाग आहे. यादरम्यान अजाणतेपणी एका पोस्टमुळए हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे आम्हाला खेद आहे.'
आगा खान संग्रहालयाने 'अंडर द टेंट' या प्रकल्पांचं आयोजन केलं होतं, यामध्ये आंतरसामाजिक संस्कृतींचा मेळ घाल्यण्याचा उद्देश होता. यासाठी 18 लहान व्हिडीओ एकत्र करण्यात आले होते. यासंबंधित एका 'काली' शॉर्ट फिल्मच्या पोस्टमध्ये हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या गेल्याने संग्रहालयाने खंत व्यक्त केली आहे.
संग्रहालयाचा कलेच्या माध्यमातून विविध संस्कृतींची पार्श्वभूमीवर एकत्र आणण्याचा प्रयत्न होता, असं म्युझियमन निवेदनात सांगितलंय. यामध्ये प्रत्येक धर्माचा आणि श्रद्धेचा आदर करणं एक भाग होता. मात्र अनावधानानं हिंदू धर्माचा अपमान केल्यानं म्युझियमनं खंत व्यक्त केली आहे. याआधी भारतीय उच्चालयाने 'काली' या लघुपटासंबंधित सर्व आक्षेपार्ह साहित्य काढून टाकण्याचे आवाहन कॅनडाच्या अधिकाऱ्यांना दिले होते. हिंदू धर्मियांकडून पोस्टरच्या निषेधार्थ प्रदर्शन करण्यात आलं. भारतीयांनी 'काली'च्या पोस्टरवर आक्षेप नोंदवला होता.
नेमकं प्रकरण काय?
निर्मात्या लीना मणिमेकलाई यांच्या या माहितीपटाचे नाव ‘काली’ आहे. या पोस्टरमध्ये माँ कालीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सिगारेट ओढताना दाखवण्यात आली असून, माँ कालीच्या वेशभूषेत ही अभिनेत्री एका हातात त्रिशूळ आणि एका हातात LGBTQ समुदायाचा ध्वज घेऊन दिसत आहे. हे पोस्टर हिंदू समाजाच्या भावना आणि श्रद्धा दुखावत असल्याचे म्हणत सोशल मीडियावरील यूजर्स संतापले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Kaali Poster Controversy : हिंदू देवतेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीच्या हातात सिगारेट अन् LGBTQचा झेंडा, ‘काली’ डॉक्युमेंट्रीचं पोस्टर पाहून संतापले नेटकरी!
- FIR Against Kaali Makers : ‘काली’ डॉक्युमेंट्री पोस्टर वाद, लीना मणिमेकलाईसह आणखी दोन जणांविरोधात एफआयआर दाखल
- Kaali Poster Controversy : ‘याची किंमत माझा जीव असेल तर...’, ‘काली’च्या पोस्टर वादादरम्यान निर्मातीच ट्वीट चर्चेत!