1500 कोटींच्या बजेट अन् सिनेमाने 8 दिवसांत कमावले 3000 कोटी, भारतातही सिनेमाची छप्परफाड कमाई
Jurassic World Rebirth Box Office Collection : हा सायन्स फिक्शन थ्रिलर आठ दिवसांपूर्वी म्हणजे 2 जुलै रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने जगभरात सुमारे 3000 कोटी रुपये कमावले आहेत. त्याचे बजेट सुमारे 1500 कोटी रुपये आहे. भारतातही हा चित्रपट उत्तम कमाई करत आहे.

Jurassic World Rebirth Box Office Collection : ज्युरासिक वर्ल्ड फ्रँचायझी आणि युनिव्हर्सल पिक्चर्स इंडियाची नविनतम फिल्म ‘ज्युरासिक वर्ल्ड: रिबर्थ’ने जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. निर्मात्यांना प्रेक्षकांना पुन्हा एकदा डायनासोरच्या जगात खेचून आणण्यात यश मिळाले आहे. ‘ज्युरासिक वर्ल्ड: रिबर्थ’ने रिलीज झाल्यानंतर आठ दिवसांत 349 दशलक्ष डॉलर (सुमारे 2989 कोटी रुपये) इतका गल्ला जमवला आहे. या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री स्कारलेट जोहानसन हिने हॉलीवूडमधील सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री बनण्याचा मान मिळवला आहे. तिच्या सर्व चित्रपटांनी आतापर्यंत जगभरात 14.8 अब्ज डॉलरची कमाई केली आहे, जी सॅम्युएल एल. जॅक्सन आणि रॉबर्ट डाऊनी जूनियरसारख्या मार्व्हल स्टार्सच्या कमाईपेक्षा अधिक आहे.
‘ज्युरासिक वर्ल्ड: रिबर्थ’ – भारतीय बॉक्स ऑफिस कलेक्शन
‘ज्युरासिक वर्ल्ड: रिबर्थ’ भारतीय बॉक्स ऑफिसवर देखील जोरदार कामगिरी करत आहे. या चित्रपटासोबत प्रदर्शित झालेला बॉलिवूड चित्रपट ‘मेट्रो...इन दिनों’ मात्र बॉक्स ऑफिसवर फारसा गती घेताना दिसत नाही. भारतात ‘ज्युरासिक वर्ल्ड: रिबर्थ’ने सहा दिवसांत सुमारे 57.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. अशा पद्धतीने हा चित्रपट हळूहळू 100 कोटींच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.
‘ज्युरासिक वर्ल्ड: रिबर्थ’ – जागतिक कमाई
‘ज्युरासिक वर्ल्ड: रिबर्थ’ने जगभरात कंटेंटच्या ताकदीचा प्रत्यय दिला आहे. विशेष म्हणजे दररोजच्या कलेक्शनसह चित्रपटाची कमाई वाढतच आहे. म्हणूनच त्याने 2989 कोटी रुपयांचा जादुई आकडा गाठला आहे. ‘ज्युरासिक वर्ल्ड: रिबर्थ’ 2 जुलै रोजी प्रदर्शित झाला आणि त्याची जागतिक कलेक्शनची आकडेवारी 8 जुलैपर्यंतची उपलब्ध आहे.
‘ज्युरासिक वर्ल्ड: रिबर्थ’ – बजेट
स्कारलेट जोहानसनच्या या चित्रपटाचा अंदाजे बजेट सुमारे 1541 कोटी रुपये होते आणि आता हा चित्रपट त्याच्या बजेटच्या जवळपास दुप्पट कमाई करत आहे. जगभरात या चित्रपटाची चर्चा सुरु असून येत्या काळात तो अनेक कमाईचे विक्रम करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
स्कारलेट जोहानसनचा ऐतिहासिक विक्रम
40 वर्षीय स्कारलेट जोहानसनने या चित्रपटात जोरा बेनेट ही भूमिका साकारली असून, हिच्या माध्यमातून ती ज्युरासिक फ्रँचायझीत सामील झाली आहे. त्यांच्या सर्व चित्रपटांनी आतापर्यंत एकत्रितपणे 14.8 अब्ज डॉलरची कमाई केली आहे, आणि ती फक्त 36 चित्रपटांतून. त्यांच्या मार्व्हल फ्रँचायझीतील विशेषतः ‘अॅव्हेंजर्स’ चित्रपटांनी 8.7 अब्ज डॉलरहून अधिक कमाई केली आहे.
‘ज्युरासिक वर्ल्ड: रिबर्थ’ ची स्टोरी काय?
‘ज्युरासिक वर्ल्ड: रिबर्थ’ हा एक सायन्स-फिक्शन थ्रिलर चित्रपट असून, त्याचे दिग्दर्शन गेरेथ एडवर्ड्स यांनी केले आहे. या चित्रपटात स्कारलेट जोहानसन जोरा बेनेटच्या भूमिकेत आहे, जी तीन विशाल डायनासोरांचे जनुकीय पदार्थ मिळवण्यासाठी एका मिशनवर जाते. ज्युरासिक फ्रँचायझीमध्ये नेहमीप्रमाणे सुरुवात छान होते, पण नंतर घडतात अनपेक्षित घटना आणि सुरू होतो थरार. या चित्रपटातही तसंच काहीसं घडताना दिसणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
15 मिनीटांच्या रोलसाठी 50 कोटी? 'रामायणम्'मध्ये यशचा स्क्रिन टाईम किती? किती मिनिटांसाठी बनणार रावण?























