15 मिनीटांच्या रोलसाठी 50 कोटी? 'रामायणम्'मध्ये यशचा स्क्रिन टाईम किती? किती मिनिटांसाठी बनणार रावण?
Ramayanam yash screen time : 'रामायण' या चित्रपटात यशचा स्क्रीन टाइम फक्त 15 मिनिटे असेल. नितेश तिवारीच्या या मेगा बजेट चित्रपटात यशला 100 कोटी रुपये मिळणार असल्याचं बोललं जातंय

Ramayanam yash screen time : रणबीर कपूर आणि यश यांच्या ‘रामायणम्’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. जेव्हापासून या चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे, तेव्हापासून प्रेक्षकांच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या आहेत. नितेश तिवारी यांच्या या मेगा बजेटच्या ‘रामायणम्’ चित्रपटासंबंधी एक नवी अपडेट समोर आली आहे, जो ऐकून प्रेक्षकांना अक्षरशः 440 वोल्टचा धक्का बसेल. कारण ‘रामायणम्’ मध्ये यशचा स्क्रीनटाईम किती असेल, ही माहिती आता उघड झाली आहे. चला जाणून घेऊया सविस्तर माहिती.
यशचा स्क्रीनटाईम केवळ 15 मिनिटं
‘टेली चक्कर’च्या रिपोर्टनुसार, ‘रामायणम्’ मध्ये यशचा स्क्रीनटाईम केवळ 15 मिनिटांचा असणार आहे. ‘रामायणम्’ हा चित्रपट दोन भागांमध्ये तयार केला जात आहे. पहिल्या भागामध्ये यश रावणाच्या भूमिकेत फक्त 15 मिनिटांसाठी दिसणार आहे. ही बातमी ऐकून प्रेक्षक आश्चर्यचकित झाले आहेत, कारण इतकी मोठी फी घेणारा यश पूर्ण चित्रपटात केवळ 15 मिनिटांसाठीच दिसणार आहे. मात्र हे किती सत्य आहे आणि किती अफवा, हे निर्मात्यांच्या अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होईल.
‘रामायणम्’साठी यशला मिळणारी फी
नितेश तिवारी यांचा ‘रामायणम्’ हा ड्रीम प्रोजेक्ट आहे, जो ते दोन भागांमध्ये बनवत आहेत. या चित्रपटात रामाच्या भूमिकेत रणबीर कपूर, लक्ष्मणाच्या भूमिकेत रवि दुबे, हनुमानाच्या भूमिकेत सनी देओल, आणि सीतेच्या भूमिकेत सई पल्लवी झळकणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यशला ‘रामायणम्’साठी एकूण 100 कोटी रुपये फी मिळत आहे — पहिल्या भागासाठी 50 कोटी आणि दुसऱ्या भागासाठी 50 कोटी. म्हणजेच केवळ 15 मिनिटांच्या भूमिकेसाठी यशला एवढी मोठी रक्कम दिली जात आहे.
‘रामायणम्’ची स्टारकास्ट
‘रामायणम्’ मध्ये रणबीर कपूर आणि यश व्यतिरिक्त रवी दुबे, सनी देओल, काजल अग्रवाल, अरुण गोविल, इंदिरा कृष्णन, लारा दत्ता, रकुल प्रीत सिंह आणि शीबा चड्ढा यांसारखे कलाकारही दिसणार आहेत. त्यामुळे चाहते देखील उत्सुकता आहे.
View this post on Instagram
इतर महत्त्वाच्या बातम्या
शेवटच्या क्षणापर्यंत खिळवून ठेवणारा सिनेमा, व्हिलन कोण? शेवटच्या सीनला समजतं; IMDb वर 7.8 रेटिंग
























