एक्स्प्लोर
Jolly LLB 3 BO Collection Day 6: अक्षय, अरशदचा 'जॉली LLB 3' सुस्साट; शाहरुख-अजयच्या हिट फिल्म्सनाही पछाडलं, सहव्या दिवशी किती कमावले?
Jolly LLB 3 Box Office Collection Day 6: 'जॉली एलएलबी 3' दररोज नवनवे रेकॉर्ड बनवतोय. आता, सहाव्या दिवसाच्या कलेक्शनसह, या चित्रपटानं अजय देवगण आणि शाहरुख खानच्या चित्रपटांना मागे टाकलंय.

Jolly LLB 3 Box Office Collection Day 6
Source : ABP Majha
Jolly LLB 3 Box Office Collection Day 6: अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अर्शद वारसी (Arshad Warsi) यांचा 'जॉली एलएलबी 3' (Jolly LLB 3) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) एकामागून एक रेकॉर्ड मोडतोय. हा चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच जोरदार कलेक्शन करतंय. आता, सहाव्या दिवसाच्या कलेक्शनसह, त्यानं अनेक हिट चित्रपटांचे रेकॉर्ड मोडलेत. या यादीत अक्षय कुमारचे स्वतःचे चित्रपट आहेत, तर शाहरुख खान आणि अजय देवगणचे चित्रपट देखील 'जॉली एलएलबी 3'पासून वाचू शकलेले नाहीत. अक्षय, अर्शदच्या या सिनेमानं सर्वांना पछाडलं आहे.
- 'जॉली एलएलबी 3' 19 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि पहिल्या दिवशी 12.5 कोटी रुपये कमावले.
- सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'जॉली एलएलबी 3'नं दुसऱ्या दिवशी 20 कोटी रुपये आणि तिसऱ्या दिवशी 21 कोटी रुपये कमावले.
- चौथ्या दिवशी 'जॉली एलएलबी 3'नं 5.5 कोटी रुपये आणि पाचव्या दिवशी 6.5 कोटी रुपये कमावले.
- आता, चित्रपटाच्या सहाव्या दिवसाच्या कलेक्शनचे सुरुवातीचे आकडे जाहीर झाले आहेत.
- अक्षय कुमार आणि अर्शद वारसी स्टारर या चित्रपटानं आतापर्यंत (रात्री 11 वाजेपर्यंत) 4.25 कोटी रुपये कमावले आहेत.
- देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 'जॉली एलएलबी 3'चं एकूण कलेक्शन आता 69.75 कोटी रुपये झालं आहे.
'जॉली एलएलबी 3'चं सहा दिवसांचं कलेक्शन
| दिवस |
'जॉली LLB 3'चं कलेक्शन |
| पहिला दिवस | 12.5 कोटी |
| दुसरा दिवस | 20 कोटी |
| तिसरा दिवस | 21 कोटी |
| चौथा दिवस | 5.5 कोटी |
| पाचवा दिवस | 6.5 कोटी |
| सहावा दिवस | 4.25 कोटी |
एकूण |
69.75 कोटी |
'जॉली एलएलबी 3'नं मोडलेत हिट फिल्म्सचे रेकॉर्ड्स
- सहा दिवसांच्या कमाईसह, 'जॉली एलएलबी 3'नं अक्षय कुमारच्या 17 वर्ष जुन्या 'सिंह इज किंग' चित्रपटाला मागे टाकले आहे.
- 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं भारतीय बॉक्स ऑफिसवर 67.92 कोटींची कमाई केली होती.
- 'जॉली एलएलबी 3'नं शाहरुख खानच्या 'चक दे इंडिया' या हिट चित्रपटाच्या आयुष्यभराच्या कलेक्शनला (67.14 कोटी) मागे टाकलं आहे.
- या चित्रपटानं अजय देवगणच्या 'दृश्यम' या हिट चित्रपटाचा (67.14 कोटी) रेकॉर्डही मोडला आहे.
- 'जॉली एलएलबी 3'नं अक्षय कुमारच्या 'स्पेशल 26' (66.86 कोटी) कलेक्शनलाही मागे टाकलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
आणखी वाचा
Advertisement
Advertisement
























