एक्स्प्लोर

Jhund : विजय बोरसे कोण? त्यांनी असं काय केलं की नागराज मंजुळेंना बिग बींना घेऊन झुंड बनवावा वाटला...

Jhund Movie : नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित झुंड हा चित्रपट नागपुरातील नावाजलेले फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे (Vijay Barse) यांच्या आयुष्यावर आधारित आहे.

Jhund Movie : आज बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन (Big B Amitabh Bachchan) यांची प्रमुख भूमिका असलेला "झुंड" (Jhund Hindi Cinema) चित्रपट प्रदर्शित होत आहे. नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित हा चित्रपट नागपुरातील नावाजलेले फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे (Vijay Barse) यांच्या आयुष्यावर आधारित आहे. आज सर्वत्र झुंडची चर्चा होत असताना विजय बारसे नेमके आहेत तरी कोण असा देखील सवाल अनेकांना पडला आहे. विजय बारसे यांनी 21 वर्षांपूर्वी नागपुरात "स्लम सॉकर" (Slum Soccer) अर्थात झोपडपट्टी फुटबॉलची सुरुवात केली होती. 

झोपडपट्टीतील वातावरणात वाईट सवयी, अमली पदार्थांच्या आहारी जाऊन अनेक मुले गुन्हेगारी विश्वात जात असल्याचे विजय बारसे यांच्या लक्षात आले. त्यानंतर विजय बारसे यांनी वर्ष 2000 मध्ये स्लम सॉकरची संकल्पना मांडली. फुटबॉल या क्रीडा प्रकाराच्या माध्यमातून झोपडपट्टीतील मुलांना शिस्तबद्ध फुटबॉलपटू तर बनवता येईल. शिवाय त्यांच्या जीवनाला योग्य वळण लावत गरीब कुटुंबातील मुलांना प्रगतीची नवी संधी ही उपलब्ध करून देता येईल असे विजय बारसे यांचे उद्दिष्ट होते.

त्यासाठी विजय बारसे यांनी नागपुरातील बोखारा भागात झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉलचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण तसेच जवळच्या शाळेत त्यांच्या शिक्षणाची सोय करत अशी निवासी अकॅडमी सुरू केली. क्रीडा आणि अभ्यास दोन्ही प्रकारात गरीब मुलांना संधी उपलब्ध करून दिली की ते प्रगतीची वाट स्वतः निर्माण करतील असा विजय बारसे यांचा विश्वास होता.

 हळू हळू स्लम सॉकरचा आकार वाढत गेला. आधी नागपूर, नंतर विदर्भ आणि हळू हळू महाराष्ट्राच्या सर्वच जिल्ह्यात तसेच देशाच्या 24 राज्यात स्लम सॉकर पसरले. गेले दोन दशके दरवर्षी देशभर होणाऱ्या स्लम सॉकर स्पर्धांमध्ये 4 लाख मुले खेळलेली आहे.

विजय बारसे यांच्या प्रेरणेने झोपडपट्टी फुटबॉलसह जोडले गेलेले अनेक मुलांनी क्रीडा विश्वात तर प्रगती केलीच शिवाय अनेकांनी शिक्षणात चांगली प्रगती करत आपले जीवन घडवले. वंचित घटकातील हजारो मुलांसाठी विजय बारसेंनी केलेली मेहनत आणि त्यांच्या गेल्या दोन दशकातील संघर्ष "झुंड" चित्रपट माध्यमातून नागराज मंजुळे यांनी सर्वांसमोर मांडलं आहे. 

संबंधित बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sangli Crime : कोण होणार सांगलीचा खासदार? पैज लावणं आलं अंगलट; गाड्यांची पैज लावणाऱ्या 'त्या' दोघांवर गुन्हा दाखल!
कोण होणार सांगलीचा खासदार? पैज लावणं आलं अंगलट; गाड्यांची पैज लावणाऱ्या 'त्या' दोघांवर गुन्हा दाखल!
Nashik : 'पुरातत्व'च्या तेजस गर्गेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, दीड लाखांच्या लाचेत होता हिस्सा
'पुरातत्व'च्या तेजस गर्गेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, दीड लाखांच्या लाचेत होता हिस्सा
Balumamachya Navan Changbhala : 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'; उलगडणार बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा
'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'; उलगडणार बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा
Akola News : अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात बिबट्याचा मुक्त संचार; वन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात बिबट्याचा मुक्त संचार; वन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 AM : 19 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 80 : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 19 May 2024 : ABP MajhaMaitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रींच्या प्रवचनाची पर्वणी,आध्यात्मिक अनुभव :19 मे 2024TOP 70 : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 19 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Crime : कोण होणार सांगलीचा खासदार? पैज लावणं आलं अंगलट; गाड्यांची पैज लावणाऱ्या 'त्या' दोघांवर गुन्हा दाखल!
कोण होणार सांगलीचा खासदार? पैज लावणं आलं अंगलट; गाड्यांची पैज लावणाऱ्या 'त्या' दोघांवर गुन्हा दाखल!
Nashik : 'पुरातत्व'च्या तेजस गर्गेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, दीड लाखांच्या लाचेत होता हिस्सा
'पुरातत्व'च्या तेजस गर्गेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, दीड लाखांच्या लाचेत होता हिस्सा
Balumamachya Navan Changbhala : 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'; उलगडणार बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा
'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'; उलगडणार बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा
Akola News : अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात बिबट्याचा मुक्त संचार; वन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात बिबट्याचा मुक्त संचार; वन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
Rohit Pawar: ईव्हीएम मशीनवर मतदान करताना 'त्या' व्यक्तीकडून नागरिकांवर दबाव, रोहित पवारांचा भाजपवर आरोप
ईव्हीएम मशीनवर मतदान करताना 'त्या' व्यक्तीकडून नागरिकांवर दबाव, रोहित पवारांचा भाजपवर आरोप
Weather Update : सावध रहा! आज तापमान 47 अंशांवर पोहोचू शकते; 'या' राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी
हवामान अपडेट: सावध रहा! आज तापमान 47 अंशांवर पोहोचू शकते; 'या' राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी
Pune Khed Gas Cylinder Blast : गॅस चोरीचा गोरखधंदा सुरुच; गॅस चोरी करताना एकामोगामाग एक भीषण स्फोट, खेड तालुक्यातील धक्कादायक घटना
गॅस चोरीचा गोरखधंदा सुरुच; गॅस चोरी करताना एकामोगामाग एक भीषण स्फोट, खेड तालुक्यातील धक्कादायक घटना
84 वर्षांच्या म्हाताऱ्याचं एक वाक्य अन् अख्खी यंत्रणा हलवली, तरुण तडफदार IAS अधिकाऱ्याने काय केलं पाहा!
84 वर्षांच्या म्हाताऱ्याचं एक वाक्य अन् अख्खी यंत्रणा हलवली, तरुण तडफदार IAS अधिकाऱ्याने काय केलं पाहा!
Embed widget