एक्स्प्लोर

Jai Jai Swami Samarth Colours Marathi Serial Track: 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये अनुभवा महासोहळा स्वामींच्या गुरुरुप दर्शनाचा, पाच आठवडे, साक्षात्कार पाच दिव्य गुरुरुपांचा

Jai Jai Swami Samarth Colours Marathi Serial Track: स्वामी ज्याच्या भाग्यातलं त्याला मिळवून देतातच, स्वामी भक्तांसाठी ही एक अभूतपूर्व आध्यात्मिक पर्वणी ठरणार आहे, ज्यामध्ये स्वामींच्या प्रत्येक दर्शनासोबत मालिकेची मुख्य कथा अत्यंत रंजक पद्धतीनं पुढे सरकणार आहे. 

Jai Jai Swami Samarth Colours Marathi Serial Track: कलर्स मराठीवरील (Colours Marathi) जय जय स्वामी समर्थ (Jai Jai Swami Samarth) मालिकेत गुरुपौर्णिमेचे (Guru Purnima) औचित्य साधून जुलै महिना हा 'गुरुदर्शनाचा महिना' म्हणून साजरा केला जाणार आहे. जुलैच्या महिन्यात सुरू होणारा हा विशेष प्रवास थेट गुरुपौर्णिमा महासोहळ्यापर्यंत रंगणार आहे. या संपूर्ण महिन्यात प्रेक्षकांना स्वामी समर्थांच्या तब्बल पाच दिव्य गुरुरुपांचे अद्भूत दर्शन घडणार आहे. यामध्ये माहुर येथे 'श्री दत्तात्रेय', गाणगापूर येथे 'श्री नृसिंह सरस्वती', तसेच शिर्डीचे 'श्री साईबाबा', कुरवपूरचे 'श्री श्रीपाद श्रीवल्लभ' आणि अखेर अक्कलकोटचे स्वतः 'श्री स्वामी समर्थ' अशा पाच दिव्य रुपांचा साक्षात्कार होणार आहे. या महिन्याच्या स्टोरीमधून भक्तांना स्वामी सांगू पाहतात, कुणालाही कुणाचं नशीब चोरता येत नाही… स्वामी ज्याच्या भाग्यातलं त्याला मिळवून देतातच, स्वामी भक्तांसाठी ही एक अभूतपूर्व आध्यात्मिक पर्वणी ठरणार आहे, ज्यामध्ये स्वामींच्या प्रत्येक दर्शनासोबत मालिकेची मुख्य कथा अत्यंत रंजक पद्धतीनं पुढे सरकणार आहे. 

कावेरी ही स्वामींची निस्सीम भक्त आहे, जिचं या जगात स्वामींशिवाय दुसरं कोणीही नाही. 18 वर्षांपूर्वी तिचे चोरले गेलेले हक्काचे नशीब तिला परत देण्यासाठी खुद्द स्वामींनी तिला अक्कलकोटला येण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, परिस्थितीच्या जाळ्यात अडकलेली कावेरी या प्रवासाला कशी निघणार, हा मोठा प्रश्न आहे. या प्रवासादरम्यान तिची घुसमट संपवण्यासाठी स्वामी तिला वेगवेगळ्या माध्यमांतून मार्गदर्शन करतात. अक्कलकोटच्या दिशेने सुरू होणाऱ्या या प्रवासात कावेरीला पावलोपावली स्वामींच्या वेगवेगळ्या दिव्य गुरुरुपांचे साक्षात्कार होणार आहेत आणि प्रत्येक रुपाकडून तिला गुरुमंत्राचे एकेक अक्षर प्राप्त होणार आहे, जे तिचे जीवन बदलून टाकणार आहे.

एकीकडे अनाथ कावेरीला तिचे हक्काचे नशीब मिळवून देण्यासाठी स्वामींनी अक्कलकोटला बोलावले आहे, तर दुसरीकडे तिच्या या प्रवासात अनेक अडचणी आणि मानवी स्वार्थाचे अडथळे उभे ठाकणार आहेत. अहंकार विरुद्ध श्रद्धा असा चॅलेंज आपल्याला पाहायला मिळणार. कावेरीला दत्तक घेऊन लहानचं मोठं करणाऱ्या आणि स्वार्थी वृत्ती असलेल्या वंदनाच्या जाचातून सुटून कावेरी अखेर अक्कलकोटला कशी पोहोचणार? आणि गुरुपौर्णिमेच्या महासोहळ्यात स्वामींच्या 'विश्वरूप दर्शनाने' कोणते नवे सत्य समोर येणार? या सर्व गूढ प्रश्नांची उत्तरे आणि भक्तीचा हा अनोखा सोहळा येत्या जुलै महिन्यात प्रेक्षकांसाठी उलगडणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Veen Doghantli Hi Tutena Marathi Serial Track: 'I Love You राजवाडे...'; अखेर स्वानंदीकडून प्रेमाची कबुली, समरचं वटपौर्णिमेचं व्रत फळाला, 'वीण दोघांतली ही तुटेना'चा प्रोमो पाहून नेटकरीही खूश

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मिथिला पालकरचा 'असा' अवतार कधीच पाहिला नसेल; क्राईम थ्रिलरचा टीझर पाहिलात?
मिथिला पालकरचा 'असा' अवतार कधीच पाहिला नसेल; क्राईम थ्रिलरचा टीझर पाहिलात?
Genelia Deshmukh Riteish Deshmukh: रितेश भाऊंनी जिनेलिया वहिनींना पहिला मराठी सिनेमा कोणता दाखवला? अभिनेत्रीने सांगितला खास किस्सा
रितेश भाऊंनी जिनेलिया वहिनींना पहिला मराठी सिनेमा कोणता दाखवला? अभिनेत्रीने सांगितला खास किस्सा
Ramayan Yash Ravan: 4000 कोटींच्या रामायणमध्ये रावण साकारताना अभिनेता सेटवर करायचा 'ही' एक गोष्ट; वजनदार मुकूट चढवून...
4000 कोटींच्या रामायणमध्ये रावण साकारताना अभिनेता सेटवर करायचा 'ही' एक गोष्ट; वजनदार मुकूट चढवून...
Manasi Kulkarni share screen with daughter: रुपेरी पडद्यावर मायलेकीची जुगलबंदी; 'द्विधा'मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री मानसी कुलकर्णीसोबत तिची लेकही झळकणार
रुपेरी पडद्यावर मायलेकीची जुगलबंदी; 'द्विधा'मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री मानसी कुलकर्णीसोबत तिची लेकही झळकणार
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
NEET Paper Leak: नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिल्या सुनावणीत काय घडलं? सुनावणी थेट 3 ऑगस्टला होणार,नेमकं कारण काय?
नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिली सुनावणी लांबणीवर, नेमकं कारण काय?
Indigo Flight Emergency Landing: दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Cockroach Janata Party: तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
Rohit Pawar: MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवार अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात; तुकाराम मुंढे काय म्हणाले?
MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवार अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात; तुकाराम मुंढे काय म्हणाले?
पुष्पास्टाईल चोरी... भाजीपाल्याच्या गाडीतून खैराची तस्करी, वन विभागाकडून लाकडासह टेम्पो जप्त
पुष्पास्टाईल चोरी... भाजीपाल्याच्या गाडीतून खैराची तस्करी, वन विभागाकडून लाकडासह टेम्पो जप्त
Embed widget