IPL 2025 Final, RCB vs PBKS: '11 वर्ष झालीत, ती सतत...'; विराट कोहलीनं आरसीबीच्या विजयाचं श्रेय अनुष्का शर्माला दिलं
IPL 2025 Final, RCB vs PBKS: अनुष्कानं मिठी मारताच विराट ढसाढसा रडू लागला, अनुष्का शर्मानंही तिच्या पतीचा विजय साजरा केला, खेळाडूंना विजयाबद्दल अभिनंदन करताना अनुष्का दिसली.

IPL 2025 Final, RCB vs PBKS: रजत पाटीदारच्या (Rajat Patidar) नेतृत्वात खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं (Royal Challengers Bengaluru) पंजाबचा पराभव करुन पहिल्यांदाच आयपीएलचं (IPL 2025) विजेतेपद पटकावलंय. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात बंगळुरुनं पंजाबचा 6 धावांनी पराभव केला. बंगळुरुनं दिलेल्या 191 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबला 184 धावांचीच मजल मारता आली. या विजयासह बंगळुरुचं आणि या संघाचा गेली 18 वर्ष भाग असणाऱ्या विराट कोहलीचं स्वप्न साकार झालं.
मंगळवारी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) नं पंजाब किंग्जचा (Punjab Kings) पराभव करून IPL 2025 ट्रॉफी जिंकली आणि इतिहास रचला. विराट कोहलीचा संघ आरसीबीनं ट्रॉफी पटकावताच अनुष्काच्या आनंदाला पारावार उरला नाही. सामना जिंकताच विराट कोहली हमसून हमसून रडू लागला. त्यानंतर त्यानं धावत जाऊन पत्नी अनुष्काला कडकडून मिठी मारली.
विजयाचं श्रेय अनुष्काला; विराट कोहलीची प्रतिक्रिया व्हायरल
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं 18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आयपीएल ट्रॉफी जिंकली. तसेच, विराट कोहली या विजयी क्षणी भावुक झाला आणि या विजयाचं श्रेय त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माला देत म्हणाला की, "ती 2014 पासून इथे येतेय आणि RCB ला सपोर्ट करतेय, म्हणून तिलाही 11 वर्ष झाली आहेत. ती सतत तिथे असायची - न चुकता सामने पाहायला येणं, कठीण सामने पाहणं, आम्हाला हरताना पाहाणं. तुमचा लाईफ पार्टनर तुमच्या खेळासाठी काय करतोय, त्याग करण्यासाठी, वचनबद्धतेसाठी आणि प्रत्येक कठीण काळात तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी काय करतो? हे असं काहीतरी आहे, जे तुम्ही शब्दांत वर्णन करू शकत नाही."
कुछ पल बेहद खास होते हैं… pic.twitter.com/YsfwHrLcac
— LP Pant (@pantlp) June 3, 2025
अनुष्कानं इमोशनली संघर्ष केलाय
लीगच्या सुरुवातीपासूनच आरसीबीचा चेहरा असलेला कोहलीनं अनुष्कासारख्या जोडीदारांना पडद्यामागे येणाऱ्या, पण कोणालाही दिसून न येणाऱ्या संघर्षांबद्दल पुढे सांगितलं. विराट कोहली म्हणाला की, "जेव्हा तुम्ही प्रोफेशनली खेळता, तेव्हाच तुम्हाला समजतं की, पडद्यामागे किती गोष्टी घडतात आणि त्याकाळात कशातून जातात. अनुष्कानं माझा वाईट काळ पाहिलाय, माझ्यासोबतचे सर्व चढ-उतार तिनं अनुभवले आहेत. तिनं सर्वकाही अनुभवलंय... वेदना आणि बरंच काही. ती बंगळुरूशी जोडलेली आहे. ती बंगळुरूचीच आहे. रसीबीशी तिचं नातं मजबूत आहे. त्यामुळे तिच्यासाठीही हे इनक्रेडिबली स्पेशल आहे. तिला खूप अभिमान वाटेल,"
IPL ट्रॉफी जिंकताच अनुष्काला मिठी मारुन रडला विराट
2017 मध्ये लग्न झालेल्या या जोडप्यानं अनेकदा एकमेकांच्या कारकिर्दीला पाठिंबा दिला आणि त्यांचं कौतुक केलं. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पंजाब किंग्ज विरुद्धच्या रोमांचक आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात अनुष्का स्टँडमध्ये उपस्थित होती. पंजाब किंग्जचा पराभव होताच, विराट कोहलीच्या डोळ्यांत पाणी आलं. त्यानं अनुष्का शर्माला मिठी मारली आणि ढसाढसा रडला. विजयानंतर विराटच्या डोळ्यांत आनंदअश्रू तराळले. अनुष्कासुद्धा विराट आणि आरसीबीला चिअर करताना दिसली. तिनं विराटला कडकडून मिठी मारली आणि 18 वर्षांनी आयपीएलमध्ये विजय मिळवल्याबद्दल त्याचं अभिनंदन केलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























