International Emmy Awards:आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड्समध्ये भारत रिकाम्या हातानेच परतला, पण रचला एक अनोखा इतिहास, पहा विजेत्यांची संपूर्ण यादी
International Emmy Awards: यंदा नामांकन मिळालं पण हा अवॉर्ड भारताच्या हातातून निसटला .इंटरनॅशनल एमी अवॉर्ड्स 2024 (International Emmy Awards) च्या संपूर्ण विजेत्यांच्या यादीवर एक नजर टाकूया .
International Emmy Awards: जगभरातील चाहत्यांचं लक्ष असणाऱ्या एमी अवॉर्ड्सचा सोहळा सोमवारी रात्री न्यूयॉर्कमध्ये पार पडला .अमेरिकेबाहेरच्या उत्कृष्ट कलाकृतींना या सोहळ्यात विविध श्रेण्यांमध्ये पुरस्कार दिला जातो . आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड्सचा 53 वा सोहळ्यात यंदा भारताला मात्र रिकाम्या हाती परतावा लागलं आहे . भारतासाठी त्यातल्या त्यात अभिमानाचा क्षण म्हणजे भारतीय कॉमेडियन आणि अभिनेता वीर दासनं इतिहास रचला . वीर दास हा एमी अवॉर्ड्स पोस्ट करणारा पहिला भारतीय ठरला . एमी अवॉर्ड्स मिळवणं हे प्रत्येकासाठी अतिशय मानाचं समजलं जातं .यंदा नामांकन मिळालं पण हा अवॉर्ड भारताच्या हातातून निसटला .इंटरनॅशनल एमी अवॉर्ड्स 2024 (International Emmy Awards) च्या संपूर्ण विजेत्यांच्या यादीवर एक नजर टाकूया .
भारताकडून या चित्रपटाला होतं नामांकन
भारतानं एमी ॲवॉर्ड्ससाठी आदित्य रॉय कपूर अनिल कपूर आणि शोभिता धुलिपाला यांच्यासह अनेक दर्जेदार कलाकार असणाऱ्या द नाईट मॅनेजर या मालिकेला ड्रामा मालिका श्रेणीत नामांकन मिळाले होते. पण यासाठी भारताला पुरस्कार न मिळाल्यानं भारत रिकाम्या हातानंच परतावं लागलंय.
वीर दासनं रचला इतिहास
सोमवारी रात्री पार पडलेल्या एमी पुरस्कार सोहळ्यात भारतासाठी एक इतिहास रचला गेला. जगभरातील मनोरंजनसृष्टीतील चाहते, जाणकार ज्या पुरस्काराची आतुरतेनं वाट पहात असतात त्या एमी ॲवॉर्ड्समध्ये भारताचा कॉमेडियन आणि अभिनेता वीर दासचं टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत झालं. एमी पुरस्कार सोहळा होस्ट करणारा वीर दास पहिला अभिनेता ठरला.त्याच्या विनोदी आणि खट्याळ शैलीनं न्यूयॉर्ककरांना आणि सिनेसृष्टीतल्या सर्वांचं मन वीर दासनं जिंकलं. या भारतीय विनोदकाराने गेल्या वर्षी त्याचा पहिला एमी पुरस्कार जिंकला होता. न्यू यॉर्क शहरात होस्ट करताना वीर दासनं घातलेला लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे., हा प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता शुभांगी बाजपेयी यांनी डिझाईन केलेल्या देशी आणि भारतीय फॅशन लेबलच्या औपचारिक पोशाखात दिसला.
एमी पुरस्कार विजेत्यांची यादी
ड्रामा श्रेणी
- सर्वोत्तम ड्रामा मालिका: ड्रॉप्स ऑफ गॉड (जपान)
- सर्वोत्तम अभिनेता: टिमोथी स्पॉल – द सिक्स्थ कमांडमेंट
- सर्वोत्तम अभिनेत्री: चुटिमॉन चुआंगचारोन्सुकियिंग – हंगर
कॉमेडी श्रेणी
- सर्वोत्तम कॉमेडी मालिका: डिव्हिजन पालेर्मो (अर्जेंटिना)
माहितीपट आणि डॉक्युमेंटरी श्रेणी
- सर्वोत्तम माहितीपट: ऑटो बॅक्स्टर – नॉट अ F**किंग हॉरर स्टोरी (युनायटेड किंगडम)
- सर्वोत्तम क्रीडा माहितीपट: ब्रॉन: द इम्पॉसिबल फॉर्म्युला १ स्टोरी (युनायटेड किंगडम)
- सर्वोत्तम कला कार्यक्रम: पियानोफोर्टे (पोलंड)
टीव्ही मालिका/मिनी-सिरीज श्रेणी
- सर्वोत्तम टीव्ही मूव्ही/मिनी-सिरीज: डिअर चाइल्ड (जर्मनी)
- सर्वोत्तम लघु-फॉर्म सिरीज: पॉइंट ऑफ नो रिटर्न (स्पेन)
टेलेनोवेला श्रेणी
- सर्वोत्तम टेलेनोवेला: द वाऊ (स्पेन)
मुलांच्या श्रेणी
- सर्वोत्तम ॲनिमेशन कार्यक्रम: टॅबी मॅकटॅट (युनायटेड किंगडम)
- सर्वोत्तम फॅक्ट्युअल कार्यक्रम: द सीक्रेट लाइफ ऑफ युअर माइंड (मेक्सिको)
- सर्वोत्तम लाइव्ह-अॅक्शन कार्यक्रम: वन ऑफ द बॉईज (डेन्मार्क)
नॉन-स्क्रिप्टेड एंटरटेनमेंट श्रेणी
- सर्वोत्तम नॉन-स्क्रिप्टेड एंटरटेनमेंट: रेस्टॉरंट मिसव्हरस्टँड – सिझन २ (बेल्जियम)